" चलो साब , पुना.. पूना..! शिरीफ ढाई घंटे मे छोड देंगे..!!"
_______________________________________________
नेहमप्रमाणे आज दिनांक ३/११/२०१८ रोजी औरंगाबाद बस स्थानकाच्या बाहेर आलो होतो.तेच नेहमीचे कार,ट्रॅव्हल्सवाले एजंट माझ्याकडे धावत...धावत आले.त्यातील एकजण मला म्हणाला....
" चलो,साब.. पूना.. पुना..! शिरीफ ढाई घंटे मे छोड देंगे...! "
मी त्या भाऊला बाजूला घेतले अन् प्रेमाने म्हणालो...
" का..हो..मी तुम्हाला..दररोज सकाळी येथे दिसतो.तरी तुम्ही मला..वरील प्रमाणे विचारपूस करता..मी काय दररोज पुण्याला जातोय का..?"
यावर तो प्रवासी सीट भरणारा एजंट काही पुरुष जसे लाजतात अगदी तसाच लाजला अन् म्हणाला...
" वो..क्या...हैं साब....
असे म्हणत असतानाच त्याला मध्येच अडवून मी म्हणालो..
" भाऊ,मराठीत बोला राव..! तुम्ही लई भारी मराठी बोलता मला माहीत आहे..!"
( वास्तविक मला काहीच माहीत नव्हते की,तो इसम मराठी अस्खलित बोलतो किंवा नाही..!😂 पण त्याला बोलते करण्यासाठी त्याच्या मराठीच्या झोपलेल्या अस्मिता शाब्दिक चिमटा घेऊन जागृत करणे योग्य वाटले म्हणून..असे म्हणालो..!😂)
यावर त्याचे डोळे विस्फारले अन् मला तो एजंट म्हणाला...
" तुम्ही बरोबर ओळखले साहेब, मी मराठीच माणूस आहे..पण.. धंद्या निमित्त हिंदीत बोलावे लागते...!"
मी- " अहो ,ठीक आहे.. बोला हिंदीत...पण..माझ्या सारख्या दिसणाऱ्या अनेक मराठी माणसा बरोबर तरी मराठीत बोलशाल की नाही..?"
प्रवासी एजंट- " तुम्ही म्हणत्या ते पण बरोबर आहे म्हणा..!"
मी- " आता हा चेहरा लक्षात ठेवा..संग्राम भाऊ..! हा चेहरा दिसला की, मस्त मराठीत बोला..! अन् सर्वात महत्त्वाचे..मला पुण्याला नका घेऊन जाऊ..! 😂 मी आपला अंधारी नावाच्या एका खेड्याला जाणारा गुरुजी आहे..! ते..साब...साहेब...पण नका म्हणू...! लई अवघडल्या सारखं होतं..!"
प्रवासी एजंट-" साहेब..अर्र...चुकले..! ( त्याने त्याचीच जीभ त्याच्याच दाताखाली दाबली अन् पुढे म्हणाला..)
गुरुजी..तुम्ही " लई भारी पिक्चर मधला डायलॉग चांगला मारला राव..! आता तुमचा हा चेहरा लक्षात ठेवीन बरं का..!"
मी - " एक काळजी घे पण..याच चेहऱ्यावर कधी दाढी असते तर कधी दाढी नसते..! नाहीतर..बिगर दाढीवाल्या चेहऱ्याला पुन्हा म्हणशाल.....
" चलो साब, पुना... पूना...! शिरिफ ढाई घंटे मे छोड देंगे..!"😂
प्रवासी एजंट- " गुरुजी... हा चेहरा चांगला लक्षात राहिला आता..!"
मी- " पण, भाऊ...हा चेहरा आज शेवट दिसेल तुला..कारण आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस.दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे.आता हा चेहरा तुला थेट २६ नोव्हेंबर रोजीच दिलेलं..! तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा..आणि हो .तुझ्या व्यावसायिक बंधूंना पण नक्की सांग..!"
तो इसम हसला अन् म्हणाला..
" नक्कीच गुरुजी..!"
असे म्हणून तो प्रवासी एजंट निघून गेला..पुन्हा कुणाला तरी माणूस पाहून म्हणायला..." साब, पुना.. पूना.. शिरीफ ढाई घंटे मे..!"😂
ता.क.: मी औरंगाबाद येथे वास्तव्यास आल्या पासून माझे हिंदी सुधारतेय वाटतं..!😂
पण मी समोरच्या कृत्रिम हिंदी आवरण चढवलेल्या मराठी माणसा बरोबर मराठीतच बोलण्याचा आग्रह धरतो..!😂
वंदे मातरम्..!
एक प्रवासी लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ३ नोव्हेंबर २०१८
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ३ नोव्हेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा