मला प्रवासात भेटलेली माणसं..!
"आम्हाला एकमेकांना भूतकाळ भेटला..!"
=================================
मी आज दिनांक १६/१२/२०१८ रोजी रविवारी भल्या सकाळी औरंगाबाद शहराकडे निघालो होतो.जाताना गोलवाडी फाट्यावर सैनिकी क्षेत्रात काहीजण रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ठिकाणी झाडे ,इतर सामान घेऊन जमलेले दिसले.औरंगाबाद शहरातून लगेच काम आटोपून ८:३० पर्यंत त्याच ठिकाणी परत आलो.
मला येथे माझा लासूर स्टेशन येथील भूतकाळ भेटल्या सारखा वाटत होता..पण नवीन माणसं असल्याने कशी विचारपूस करावी हे समजेना..! अखेर त्यांच्यातील एक प्रमुख असल्या सारखे दिसणाऱ्या एका इसमाकडे गेलो..अन् म्हणालो....
" साहेब,मी नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव, मी गुरुजी आहे..मी येथे काम करू शकतो का..?"
" अहो, असं काय विचारता राव..! आम्हाला असेच माणसं हवी आहेत..!" यांचे नाव प्रशांत भाऊ गिरे आहे हे नंतर समजले.
वृक्षारोपण करण्याचे महान काम करणाऱ्या " जन सहयोग संस्थेचे ते सर्व स्वयंसेवक होते.
मग काय...काही वर्षापूर्वी आम्ही हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन येथील स्वयंसेवकांनी जे कार्य लासूर स्टेशन ते लासूरगाव रोड वरील कार्यात झोकून दिले.. ते सतत भेटत होते.! प्रत्येक टिकाव, कुदळ त्या सर्व स्वयंसेवकांची आठवण करून देत होते. पुन्हा एकदा माझा भूतकाळ मला भेटला होता..! मी जून २०१८ मध्ये येथे राहायला आल्यापासून त्याच भूतकाळाच्या शोधात होतो...अन् नियतीने तो असा पुढे आणून उभा केला..! यांच्या मध्ये मला हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन चे स्वयंसेवक दिसत होते..!
खूप दिवसानंतर झाडे लावण्यासाठी टिकाव हाती घेतले होते..पाच सहा खड्डे झाल्यावर एका बाजूला उभा राहिलो..इतक्यात एक मुलगा माझ्याकडे आला..अन् म्हणाला..
" काका, पाणी आणून देऊ का...?"
" नको रे दादा..! कुठला आहेस तू.. नाव काय. तुझे..? "
मुलगा - "मी म्हसल्याचा आहे.. माझे नाव शुभम संतोष गोराडे..!"
मी हे गावाचे नाव माझ्या शाळेतील मुलांकडून ऐकले होते.मी त्या मुलाला म्हणालो...
" अरे,छोट्या...मी तुझ्याच गावाकडील आहे... अंधारी चा...!मी तिथे गुरुजी आहे..!"
मी असं म्हणल्या बरोबर. तो मुलगा माझ्या खूप जवळ आला.
माणसाला दूर गावी ,आपल्या गावाकडचा माणूस भेटला की खूप आनंद होतो अगदी तेच भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर मला जाणवले..! त्याला जवळ घेऊन विचारपूस केली तर समजले की,आज वृक्षारोपण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज सैनिक शाळा ,कांचनवाडी येथील काही विद्यार्थी आपल्या गुरुजी सोबत आलेले होते.त्याच शाळेत हा शुभम शिकतो अन् तिथेच वसतिगृहात राहतो.मी तिथून माझे पूर्ण काम करून निघे पर्यंत हा शुभम सतत..माझ्या सोबतच होता..!
मी त्याला म्हणालो...
" तुझ्या वडिलांशी बोल.. बरं वाटेल त्यांना.! काय नंबर आहे..?"
त्याच्या वडिलांशी बोलणे झाले. मी ही बोललो .त्याला त्याच्या गावचा माणूस भेटल्याचा खूप आनंद वाटत होता..तसा तो बोलला सुध्दा..
" सर,तुम्ही माझ्या गावाकडचे आहात..लई चांगलं वाटलं ..! मी गावाकडे आलो का...तुम्हाला शाळेत भेटायला नक्की येईल..!
माणूस,नेहमी त्याच्या वर्तमानात ,त्याचा भूतकाळ शोधत असतो.मग तो कधी माणसांच्या रुपात शोधत असतो..तर कधी विविध प्रतीकांचा रुपात..! मात्र एक नक्की..की....आपला भूतकाळ सतत आपल्याला या..ना..त्या मार्गाने भेटत असतो..! फक्त आपण त्या भूतकाळाला ,सध्याच्या वर्तमानकाळात ओळखायला हवे अन् त्याच्या जवळ स्वतः हून जायला हवे...! बरच हलके हलके वाटते....मनातून..!
जसे आज,त्या शुभम ला..त्याच्या गावाकडच्या भूतकाळातीलआठवणी माझ्या रूपातून भेटल्या...! अन् मला माझ्या लासूर स्टेशन येथील आम्ही जवळ...जवळ १०० वृक्षांच्या स्वतच्या लेकरा सारखी काळजी घेतल्याच्या आठवणी भेटल्या...!
धन्यवाद भूतकाळ...तू आज वर्तमानात भेटला आम्हाला..!
तू आता भेटत राहणार...!
खूप खूप धन्यवाद अन् ग्रेट सँल्युट जन सहयोग परिवार औरंगाबाद..!
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १६ डिसेंबर २०१८
व माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १६/१२/२०१९, सोमवार




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा