आमचे गाव आमची माणसं..!
" बालमित्रांची अंगत-पंगत "
===============================
आम्ही ,डावीकडून डॉ.गणेश वाणी,हा मजकूर लेखक इसम,आण्णासाहेब म्हस्के(औरंगाबाद),सदाशिव मुलमुले(शिक्षक) व आमचा बालमित्र व वर्गमित्र नंदकिशोर जाधव पा. .!
काल दिनांक २४ डिसेंबर २०१७ रोजी उशिरा संध्याकाळी नंदूच्या पालखेड येथील घरी अंगत..पंगत जेवण केले..! हक्काने आम्ही एकमेकांच्या घरी ,अगदी थेट स्वयंपाक घरात जाऊन जेवण करणारी व आजकाल " अल्पसंख्यांक " होत चाललेल्या या अल्पसंख्यांक मानवी जमाती पैकी आम्ही मोजके..!
आमसूल टाकून केलेले वरण..! आहाहा..! व्वा..!खूपच रुचकर..! माझी स्व.आई,अगदी असेच वरण करत असे..! आईची यावेळी खूप आठवण आली..! वर्षाताईंना तसे बोलूनही दाखविले..!स्वयंपाक खूपच रुचकर झाला होता..!अर्थात याचे संपूर्ण श्रेय आमची जन्मभूमी पालखेडच्या सरपंच वर्षाताई नंदकिशोर जाधव यांच्या सुगरण पाक कौशल्याला द्यावे लागेल..!त्या बाबतीत दोन कौतुकाचे शब्द वर्षा ताईंना म्हणालो सुध्दा..! वास्तविक मी वैयक्तीक दुपारी जर तीन,चार पोळ्या जरी खाल्या तरी रात्री जेवण करत नाही,पण आजची जेवणाची मैफिल आणि त्यातील रंगत काही औरच होती..!त्यामुळे माझी ती जेवणाची दिनचर्या आज अपवाद ठरली..!धन्यवाद वर्षाताई..!!
आजकाल बऱ्याच भारतीय संस्कृती नष्ट होत चालल्या आहेत.त्यापैकी ही एक. " बालमित्रांच्या घरी ,थेट स्वयंपाक घरात जेवण करणे " ही होय..!आम्ही मात्र ही भारतीय संस्कृती नष्ट न होऊ देण्यासाठी छोटासा का होईना पण प्रामाणिक प्रयत्न अधून मधून नक्कीच करत असतो..!
एकमेकांच्या घरी जाऊन हक्काने घरगुती जेवण करणे या पात्रतेची आजकाल बालमैत्री निर्माण होत नाही का..?
त्या विश्वासाची नाती आजच्या मुलांमध्ये निर्माण होत नाही का..?
मानवी संस्कृतीला बाधक ठरणाऱ्या जातीपातीच्या भयंकर भिंती त्या आड येत आहेत का..?
आजचे अती प्रगत तंत्रज्ञान यास कारणीभूत आहे का..?
आजकाल फक्त व्यक्ती भेटतात..!माणूस भेटत नाही का..?
आमच्या सारख्या अनेकांचे आयुष्य असच मन मोकळे व्यतीत झाले आहे.आजचे धकाधकीचे अन् प्रत्यक्ष न भेटणारे अनेक आयुष्य पाहिले की,माझ्या सारख्या अनेकांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते..!आमच्या मनातील ही निर्माण होणारी अस्वस्थता आजच्या समाजव्यवस्थेवर उगारलेला आसूड असतो..! कारण आज माझी मुलं काय किंवा माझ्या समकालीन मित्रांची मुलं काय बहुतांशी एकमेकांना भेटतात पण त्या भेटीत एकमेकांच्या घरातील स्वयंपाक घर काही भेटत नाही अन् इथंच आजच्या मुलांच्या आयुष्याची दुर्दैवी मेख आहे..!
आम्ही उपस्थित व अनेक अनुपस्थित बालमित्र या वरील अनेक गंभीर व आत्मचिंतन करायला लावणाऱ्या प्रश्नांना नक्कीच अपवाद आहोत..!
आम्ही खरंच नशीबवान आहोत..!
खूप खूप धन्यवाद मित्रा नंदू..!
वंदे मातरम्..!
ता.क.: आम्हा बालमित्रांच्या आयुष्यातील अनेक रंगतदार किस्से आहेत,ज्यावर भविष्यात मी लेखन करणारच आहे..!
कारण आमच्या सारखे आम्हीच होतो आमच्या गावात..!😀
या अंगती-पंगतीतील एक इसम व लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव, पालखेड वाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
फेसबुकवर लिखाण दिनांक: २५ डिसेंबर २०१७ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २५ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा