आमचे गाव आमची माणसं..!
" प्रिय बालमित्र नाना अन् त्याचा बुक्का..! '😊
=================================
=================================
संजय भाऊसाहेब भाडाईत उपाख्य नाना..!
विशेष काही लिहिण्यासारखे नाही,पण हा आमच्या सर्व वर्गमित्रांमध्ये सर्वांचा मित्र होता.याच्या एका हातात लई ताकद असल्याने आम्ही सगळे बालमित्र याच्याशी सहसा हुज्जत घालण्याचे टाळत असायचो..! याचा नेमका उजवा का डावा हात हे आज नेमकं लक्षात नाही..! नाहीतरी मला " हात " असलेल्या काही बाबी जेंव्हा पासून माझे वय वर्ष १८ पूर्ण झाले तेंव्हा पासून आवडतच नाही..!😊
आम्ही इयत्ता ६ वीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालखेड येथे शिकत होतो.त्यावेळी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते आदरणीय मुळे सर..! सरांची तब्येत जेमतेम होती.स्वभाव देखील अती सौम्य होता.
एकदा मधल्या सुट्टीत या नानाचे अन् आमच्याच वर्गातील कुणाचे तरी भांडण झाले. आम्ही काही मित्र जे की तब्येतीनं दीन अन् दुबळे होतो,ते आम्ही काहीजण दुरून ही भांडणं पाहत होतो..! हा नाना,त्या समोरच्याला त्याच्या ज्या एका हातात जास्त ताकद होती,त्याच हाताने बदड बदड बदडत होता..! आम्ही दुरून आमच्या काळातील घातक चित्रपट पाहत होतो.त्यात जसा तो काशी ( सनी देओल) त्या काथ्याला ( डँनी ) झोडपतो तसाच हा नाना,आमच्याच वर्गातील दुसऱ्या एका मित्राला झोडपत होता..!मी अन् माझ्या सोबत उभ्या असलेल्या मित्रात ते भांडण सोडविण्याची क्षमता नव्हती अन् हिम्मत तर अजिबात नव्हती..! माझ्या सोबत डॉ.गणेश वाणी,विजय गायकवाड ( ह. मु.वैजापूर) उभे होते.आम्ही त्याकाळचे एकदम लुकडे..लाकडे जिवंत पात्रं होतो..!त्यामुळे शारीरिक क्षमता अन् हिम्मत याचा आमच्याशी दूरदूरचा संबंध नव्हता..!😊
नानाचे अन् त्या मित्राचे भांडण ऐन रंगात आले होते.बाजूलाच शाळेचे मुख्याध्यापक कार्यालय होते.आज ती मुख्याध्यापक वर्गाखोली शाळेच्या इमारतीत उत्तर दिशेला ऐन मधोमध सुस्थितीत आहे..!त्याच्या उत्तर दिशेला मोकळ्या जागेत नानाचे अन् त्या मित्राचे हातघाईवर सुरू असलेलं युद्ध सुरू होते.थोड्या वेळाने या भांडणाचा अन् आमच्या सारख्या तब्येतीनं दिन..दुबळ्या प्रेक्षकाच्या गोंगाटाने आदरणीय मुळे सरांना अंदाज आला की,कुणाचे तरी भांडण सुरू आहे म्हणुन..!
इतक्यात आदरणीय मुळे सर तावातावाने ओरडत आले.त्यांनी नानाला अन् दुसऱ्या मित्राला भांडणापासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागले..! माणसांच्या भांडणाचा एक मानसशास्त्रीय नियम आहे..अन् तो म्हणजे त्याला भांडणात कुणी आवरायला लागले की,त्याला अजून जास्त चेव येतो..!😊 इथेही हा माणसांच्या भांडणाचा एक मानसशास्त्रीय नियम लागू पडू लागला होता.आदरणीय मुळे सर ,त्या दोघांची भांडणं सोडू लागली तसतसे त्यांच्या अंगात चेव येऊ लागला होता.
इतक्यात...........
नानाचे अन् त्या दुसऱ्या मित्राचे भांडण सोडायला गेलेले
आदरणीय मुळे सर ऐन दोघांच्या मधोमध आले.एवढ्यात नानाचा एक जोराचा बुक्का त्या मित्राला मारताना तो मित्र ऐनवेळी मटकन खाली बसला अन् नानाचा तो जोराचा बुक्का नेमका आदरणीय मुळे सरांच्या छातीत बसला..! नानाने नेमका त्याच हाताने तो जोराचा बुक्का हाणला होता,ज्यात सर्वात जास्त ताकद होती..! मुळे सर एकदम जमिनीवर पडले.एकतर त्यांची तब्येत जेमतेम अन् त्यात नानाच्या जास्त ताकदीचा ठोसा..! त्यामुळे मुळे सर एकाच बुक्क्यात जमिनीवर पडले..! आपल्या सरांना चुकून मार लागला हे पाहून ते दोघेही भांडणं करणारे भानावर आले.त्यांनी एकत्रितपणे सरांना उठवायला लागले.बाजूलाच आम्ही जे तब्येतीनं जी दिन..दुबळी मित्रमंडळी उभी होतो,आम्ही लगेच सरांना प्यायला पाणी घेऊन आलो.सरांच्या तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारले. मुळे सर थोड्या वेळाने सावध अवस्थेत आले.नानाने आदरणीय मुळे सरांना मुद्दामहून बुक्का हाणला नव्हता,पण सर,नानाच्या अन् त्या दुसऱ्या मित्राच्या ऐन तडाख्यात सापडले होते,त्यामुळे असे घडले होते..!

आदरणीय मुळे सर सावध स्थितीत आल्यावर आम्हाला वाटले होते की,सर आता यांना लई हाणतील..पण सरांनी त्या दोघांनाही अशी भांडणं यापुढे करू नका असे प्रेमाने समजावून सांगितले.सरांच्या त्या प्रेमळ सल्ल्यामुळे त्यापुढे आमच्या वर्गात तिथून पुढे कधीही कुणाचेही भांडणं झाली नाहीत हे विशेष..! प्रेमात अशीही ताकद असते हे आम्हाला आमच्या आदरणीय मुळे सरांच्या त्या वर्तनातून दिसले होते.
असा हा आमचा प्रिय बालमित्र संजू उपाख्य नाना भाडाईत..! हा सध्या पालखेड गावात स्वतच्या व्यवसायात सुखी आहे.आजही जेंव्हा कधी याची अन् माझी भेट होते तेंव्हा तेंव्हा त्याच्या त्याकाळातील त्या बुक्क्याचा विषय हमखास निघतो..!😊
असा आमचा प्रिय बालमित्र नाना अन् त्याचा बुक्का..!😊
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक:१५ डिसेंबर २०१९, रविवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा