" अंश...एक..रूपे दोन..! "
=================================
प्रत्येक जण आपापल्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करत असतो..!
जसे प्रभू रामचंद्र यांनी त्यांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व केले..तर..
भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व केले..!
दोघेही एकाचेच अंश होते...पण..दोघांचे आचरण..उच्चारण..उपदेशन..भिन्न..भिन्न होते..!
कारण ,असे भिन्न भिन्न असणे..ही त्या कालखंडाची मागणी होती..!
प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण दोघेही एकच आचरण...उच्चारण... उपदेशन करून त्या त्या कालखंडात जगले असते तर..तो त्या कालखंडावर अन्याय झाला असता..!
नियतीने असे...एकाच्याच अंशाला.. असे भिन्न...भिन्न वर्तन करायला भाग पाडले..! असे इतिहासात अनेक उदाहरणे आहेत की,जे एकाचेच अंश होते पण वर्तन भिन्न..भिन्न..!
असे असण्याचे एकमेव कारण म्हणजे..त्या..त्या कालखंडाचे ते अपत्य असणे होय..!
अन् या भारतमातेच्या सुपुत्रांनी ती आपल्या कृतीने ,युक्तीने पूर्ण केली..! तीच त्यांची कायमची ओळख बनून गेली.प्रत्येकजण स्वतंत्र असतो.एकाचाच जरी अंश असला तरी...तो स्वतंत्र असतो..! असे प्रत्येकाचे स्वतंत्र असणे..त्या..त्या कालखंडातील स्वातंत्र्याची, समाजमनाची मागणी असते..इच्छा असते...! नव्हे .नव्हे..असे प्रत्येकाचे स्वतंत्र असणे हे त्या कालखंडाचे लाडके अपत्य असते..भिन्न..भिन्न आचरण..उच्चारण... उपदेशनाचे..!
" अटलजी तुम्ही नरेंद्र होता..तुमच्या कालखंडाचे |
भिन्न..भिन्न नरेंद्र असतात.. त्या..त्या कालखंडाचे |"
तुम्ही प्रभू रामासारखे जगले |
कुणी भगवान श्रीकृष्णा सारखे जगत आहे..|
नीती दोघांची भिन्न..भिन्न |
पण उद्देश मात्र एकच आहे |
माझा देश अग्रेसर व्हावा | "
आज अटलजींचा जन्मदिन..!
त्यानिमित्त विनम्र वंदन...अटलजींना...!
ता.क.: वरील मजकुरात उपमा अलंकार उपयोगात आणला आहे..! तुलना केलेली नाही..हे कृपया वाचकांनी नम्रपूर्वक समजून घ्यावे ..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २५ डिसेंबर २०१९, बुधवार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा