मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" आईच्या मायेचा मायाळू मित्र,कल्याणराव डमाळे सर..! "
====================================
माझ्या वैयक्तिक आयुष्यात बरीच माणसं या ना त्या निमित्ताने आली..!त्यात प्रत्येकाचे येणं काहीतरी निमित्तानं ठरलेलं होतं अन् आहे..!सगळ्याच चवीची माणसं भेटली..!☺ पण मला सर्वात जास्त आवडणाऱ्या गुळाच्या चवी सारखा अन् आईच्या मायेसारखा एक मित्र शिक्षकी आयुष्याच्या प्रवासात एकमेव भेटला..!
त्यांचे नाव कल्याणराव डमाळे सर..!
मी जून २०११ मध्ये एकलहेरा,ता.गंगापूर येथे ,वैजापूर तालुक्यातील १७ वर्ष सेवा आटोपून हजर झालो होतो.तिथं मी अन् कल्याणराव सोबतच हजर झालो होतो.ते अमळनेर वस्ती, ता.गंगापूर येथून आले होते.
कल्याणराव ,दिसायला एकदम गोरे गोमटे..! आनंद आणि दुःख झाल्यावर लालबुंद होणारे व्यक्तिमत्त्व..! त्यांना मी कधीही राग आलेला पाहिलं नव्हत..! त्यामुळे कल्याणराव यांना रागात लालबुंद झालेलं पाहण्याचा आमच्या तब्बल ७ वर्षाच्या सहवासाता कधी लालबुंद योग आलाच नाही..!☺ जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे त्यांच्या प्रेमळ अन् मायाळू स्वभावाचा पदर आम्हाला जाणवू लागला..!
मी जेंव्हा जेंव्हा भावूकपणे आम्हा शिक्षक मित्रांमध्ये एखादा भावूक विषय चर्चेला घ्यायचो,त्यावेळी प्रिय कल्याणराव यांच्या शरीरावर बऱ्याचदा " काटे " रोमांच आलेले पहायचो..! मला त्याचवेळी जाणवलं होतं की,कल्याणराव खरचं खुप भावूक अन् संवेदनशील मनाचे व्यक्तिमत्त्व आहे..!मला अशी माणसं पहिल्यापासून खूप खूप भावून जातात, अशांच्या आकंठ प्रेमात मी होतो आणि आहे..!कारण भावना अन् भावुकता माणसाला एक माणूस म्हणून जगायला पुरेशी असते..! बाकी भावनाशून्य माणसांचा पार उताडा आहे..!☺
प्रिय कल्याणराव ,यांच्यातील आईची माया नेहमी जाणवायची..!मी लासूर स्टेशन येथून शाळेत कधी बसने तर कधी दुचाकीवर येणे जाणे करायचो. जून २०११ पासून ते १ मे २०१८ पर्यंत असा एकही दिवस गेला नाही की,त्यादिवशी प्रिय कल्याणराव सरांनी मला निघताना " सर,दम्मानं जा..!" असं म्हणाले नसेल..!
अगदी न चुकता प्रिय डमाळे सर " सर,दम्मानं जा..!" असे म्हणायचेच..! त्यांच्या अशा आईच्या मायेनं म्हणण्यानं मी आतून खूप गहिवरून जात असे..! मला त्यावेळी माझ्या मायाळू आईची खूप खूप आठवण यायची..!
शाळेत कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांना मार लागला किंवा अचानक कुणी आजारी पडलं तर प्रिय कल्याणराव पटकन स्वतच्या गाडीवर त्या विद्यार्थांना बजाजनगर किंवा अंबेलोहळ येथे दवाखान्यात घेऊन जायचे..ते पण स्वतच्या खिशातून दवाखान्याचा खर्च करायचे..!
एकलहेरा येथील आम्ही जो पर्यंत सोबत होतो तो पर्यंत मी आणि नंदलाल सलामपुरे सरांना आळस , नैराश्य किंवा मन उदिंग्न व्ह्यायला लागलेच तर आम्हाला पुन्हा टवटवीत करायला याच डमाळे सरांच्या वर्गात जिवंत औषध भेटायचे..!😂 ते जिवंत औषधं होते त्या वर्गातील खूप चुणचुणीत अन् खोडकर मुलं..!😂 माझ्या व प्रिय सलामपुरे सरांच्या मनाला सतत संजीवनी देणारा हा वर्ग..! त्या वर्गाचा मॉनिटर होता चिरंजीव भावेश संतोष औसरमल..अन् त्याला मदतनीस म्हणून काम पहायचा चिरंजीव अनिकेत पंडित..!😂 मी या वर्गात गेल्यानंतर एक शिक्षक म्हणून राहतच नसे..! अगदी बालवयातील नंदन होऊन यांच्यात मिसळत असे..!
मी आणि सलामपुरे सर,जो पर्यंत एकलहेरा येथे सोबत एकत्र होतो, तो पर्यंत कधी मधी मुद्दामहून डमाळे त्यांच्या मुलांना कसे रागावतात हे आवर्जून गुपचूप पहायचो..!( हे आता पर्यंत डमाळे सरांना पण माहित नव्हते ,आज माहीत होईल..!😂)
सर,त्यांच्या मुलांना रागवायचे देखील प्रेमाने..!☺ मुळात सरांचा स्वभावच खूप मायाळू असल्याने असे होत होते.
मागील दोन महिन्यापूर्वी एकलहेरा येथे रात्री एका मंगलमय कार्यक्रमाला जाण्याचा योग आला होता.त्यावेळी मी आमच्या तत्कालीन शिक्षिका भगिनी ,व प्रिय नंदलाल सलामपुरे सरांच्या समक्ष डमाळे सरांची गळाभेट घेतांना म्हणालो होतो की,
" आपली आई भेटली भो..! बस ,आता कुणाची भेट नाही झाली तरी चालेल..!"
माया अन् ममता याचा सुंदर मिलाप असलेला आमचा आईच्या मायेचा मायाळू मित्र...आदरणीय कल्याणराव डमाळे सर...!
वंदे मातरम्...!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक: ३१ ऑगस्ट २०१९



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा