शनिवार, ३० मे, २०२०

" जागतिक तंबाखू_सेवन विरोधी दिन..! "








चिंतन

" जागतिक तंबाखू_सेवन विरोधी दिन..! "

====================================
आज दिनांक ३१ मे २०१७

जागतिक तंबाखू_सेवन विरोधी दिन..!
त्यानिमित्त तंबाखू न खाणाऱ्या माणसांना शुभेच्छा...व अभिनंदन..! आणि तंबाखू आवडीने खाणाऱ्या माणसांना सावधगिरीचा मैत्रीपूर्ण धोक्याचा इशारा..!

तंबाखू...!
काळानुरूप ,नावात व चवीत  नेहमी " कात "  टाकणारा धूम्रपान श्रेणीतील बहुसंख्य व सुरुवातीला खातांना कमी आर्थिक  झळ पोहचविणारा  पदार्थ..! मात्र तंबाखू खाणारे जसजसे बहुसंख्य होत जातात,तसतसे तंबाखूप्रेमींना प्रचंड आर्थिक व शारीरिक झळ देणारा पदार्थ..! काळानुरूप हिच्या नावात " तंबाखु खवय्यांनी " भर टाकली..! कुणी,हिला खर्डा नावाने ओळखते ,कुणी मावा , तर ..कुणी सांख्यिकीय भाषेत  देखील हिला ओळखते..!पान टपरीवर ही सांख्यिकीय भाषा बऱ्याचदा ऐकायला मिळते..!

२१व्या शतकात हीचे " गुटखा " हे नामकरण झालेले आहे..! हिचा व्यापार करणारे काही व्यापारी सुरुवातीला हिला ,हिच्या खवय्यांपर्यंत सायकलवर घेवून पोहोच करायचे..! बघता-बघता सायकलवर गुटख्याचा व्यापार करणारे विमानातून प्रवास करू लागले,अन् " तंबाखू खवय्ये " फक्त स्वतचे हात चोळीत बसले..! तंबाखूचा देखील विशिष्ट लोकांना विशिष्ट Brand आवडतो..! मात्र सर्रास आढळणारा व अर्थिक झळ (खरेदी करतांना) कमी असणारा .....छाप हा पदार्थ..! विशेष म्हणजे तंबाखू खाण्याच्या बाबतीत स्री अन् पुरुष असा तथाकथित लिंगभेद समाजात अजिबात मान्य नाही..! तंबाखू खाणारे स्री अन् पुरुष , ' एकमेका साहाय्य करू अवघे धरू कुपंथ ' या उक्तीनुसार आपली विकृत मानसिकता वाढविण्यास मोलाचे योगदान देत राहिलेले आहेत..!

या तंबाखू खवय्यांची गंमतच लई भारी..! " तंबाखू खवय्ये " मंडळी एकमेकांना अनोळखी ठिकाणी पटकन ओळखतात..!  हळूच हाताने किंवा हाताच्या कोपा-याने तंबाखू खवय्यांना डूळका मारून स्वतच्या डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताची तर्जनी घासून मागे-पुढे करून सांकेतिक मागणी करतात..! मग काय... तंबाखू चोळीत-चोळीत मस्त गप्पांचा फड रंगतो..! वर्णद्वेषाचा कूणी आरोप करू नये म्हणून काळ्या-तपकिरी रंगाच्या तंबाखूत " पांढरा शुभ्र चुना " मिसळतात..! " हम सब एक है " या सामाजिक  वैचारिक सिद्धांतानुसार  चोळून झाल्यावर उजव्या हाताची थाप मळलेल्या पदार्थावर मारून उजव्या हाताच्या अंगठा व तरजीमध्ये कुणी-कूणी मध्यमाचा देखील उपयोग करून तो मलिदा उचलून अलगदपणे तोंडात ,लहान बाळाला झोळीत अलगदपणे टाकावे अगदी तसे ठेवतात...! हा मलिदा तोंडात गेल्यावर या मंडळींना मोठमोठ्याने बोलण्यासाठी व फिदीफिदी हसण्यावर प्रचंड मर्यादा येतात..! यानंतर या मंडळींचे  बोलणे,हसणे एखाद्या जूण्या हिंदी/मराठी चित्रपटातील नट,नटींच्या संभाषण कौशल्यासारखे ,सगळंच जपून-जपून होत..! यांनी जर मनमुरादपणे हसणे,बोलणे केलेच तर....." तंबाखू मिश्रित दुर्गंधीयुक्त थुंकी " समोर असणा-यावर पडून एक प्रकारचा धूम्रपान जलाचा शिडकावाच होतो..!

कालांतराने या मंडळींचे दात  उर्जाचे प्रतीक असलेल्या पिवळ्या रंगासारखे  पडतात..! दिवसामागून दिवस जातात.. पिवळ्या रंगाचं प्राबल्य वाढत जाते.हळूहळू हसणे,बोलणे ,आहार यावर मर्यादा येत जातात..!  " घरची मंडळीही " यांना ❤️  तोंडाजवळ घेत नाही.😊  बळजबरीने ही माणसं जर जवळ गेलीच तर  यांना तिथून हाकलून दिल्यासारखे झिडकारल्या सारखे केल्या जाते..! माझे तर स्पष्ट मत असे आहे की, जे कुणी पुरुष तंबाखूजन्य पदार्थ खातात, किंवा तत्सम द्रवयुक्त धुम्रपानाच्या पदार्थांचे सेवन करतात अशी माणसं एक प्रकारे त्यांच्या निर्व्यसनी पत्नीवर मौखिक स्वरूपातील बलात्कारच करतात..! त्या बिचाऱ्या माऊली, सगळा मौखिक दुर्गंध निमूटपणे सहन करतात..नाईलाजाने..! हा एक प्रकारचा मौखिक बलात्कारच असतो..!

तोंडाचा नको,नको तो रोग निर्माण व्हायला सुरुवात होते..! तो पर्यंत बरीच वेळ निघून गेलेली असते..! तंबाखू खवय्ये मंडळी दीर्घ अनुभव संपन्न झाल्यावर तोंडात तंबाखू नसली तरी तंबाखूचा दर्प ,कास्तुरिमृगाच्या पोटातील सुगंधी कस्तुरी सारखा सतत सोबत असतो..! असतो फक्त दुर्गंधीयुक्त दर्पाच्या रूपात...!

तर ... मित्रांनो,असे आहे तंबाखू खवय्या व्यक्तीविशेषांचे व्यक्तीनिरीक्षण..! आता ज्याने-त्याने ठरवावे की,आजचा दिनविशेष " जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन " निमित्त शुभेच्छा घेऊन अभिनंदन स्वीकारायचे ...की  सावधपूर्ण धोक्याचा इशारा समजुन वेळीच सावध व्हायचे..!!

ता.क. - मृत्यू व आजार तर, माझ्यासह प्रत्येकालाच आहे,फक्त आपल्या मृत्यूच्या व आजाराच्या कारणाला स्वत:हून निमंत्रण दिलेली धुम्रपानांनी युक्त कारणे चिकटलेली नकोत अशी प्रेमळ अपेक्षा..! 🙏😊                       
 

वंदे मातरम् ...!🙏🇮🇳🙏
                                     
कोणत्याही प्रकारच्या धूम्रपानाचा प्रखर विरोध करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ३१ मे २०१७

बुधवार, २७ मे, २०२०

" अभिष्टचिंतन ..माझी हिरो होंडा स्प्लेंडर..!😊🌹"






#मला प्रवासात भेटलेली माणसं.©️

" अभिष्टचिंतन ..आमची हिरो होंडा स्प्लेंडर..!😊🌹"

===================================

आज दिनांक २८ मे २०१७ रोजी माझ्या Hero Honda Splendor गाडीचा वाढदिवस...! 
आज गाडीचे वय १८ वर्ष पूर्ण व १९ वे वर्ष प्रारंभ झाले.

निर्जीव वस्तू मध्ये देखील सजीवत्त्व देवपण शोधणारी आपली हिंदू संस्कृती..! ' हिंदू ' शब्दोच्चार केल्यामुळे काहीजण लगेच कामाला लागतील. माझ्या मते ' हिंदू ' हा शब्दोच्चार भौगोलिक अर्थाने काळाच्या ओघात विकसित होऊन तिथल्या भूप्रदेशातील वास्तव्य करणाऱ्या  समस्त लोकांच्या ओळखीचा शब्दोच्चार आहे. काळाच्या ओघात त्याच्याशी अनेकानेक श्रद्धेय बाबी जुळत गेल्या. त्यात अनेकानेक बदल होत गेले, मात्र  ' हिंदू ' शब्दोच्चाराचे मूळ भौगोलिक महत्त्व अबाधित राहिले. याच हिंदू संस्कृतीत अनेक पंथ उदयाला आलेत. सजीवांचे पूजन अथवा इतर श्रद्धेय कृती तर अनेकजण करतात, मात्र निर्जीव वस्तू त्यात मग मूर्ती , वाहन अथवा तत्सम इतर निर्जीव वस्तू आल्यात त्यांना श्रद्धेच्या देव्हाऱ्यात ठेवून पूजन करणारी एकमेव संस्कृती याच आपल्या भारतवर्षात बहरली , वृध्दिंगत होत गेली. त्याच श्रध्देचा भाग म्हणून आम्ही आमच्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी गाडीचा वाढदिवस अन् त्यानिमित्त पूजन नेहमी करत असतो.

अगदी बरोबर २८ मे १९९९ रोजी  साई बाईक्स, साईं कॉर्नर, कोपरगांव येथून खरेदी केली होती. हिच्या बुकिंग करिता सोबत होता,माझा जिवलग बालमित्र विजय वैजिनाथ गायकवाड..! (ह.मु. वैजापूर) अन् हिला कोपरगाव इथून घरी आणण्यासाठी सोबत होता माझ्या जिवलग बालमित्र डॉ. संजय सखाराम राऊत याचा धाकटा भाऊ म्हणजेच माझाही धाकटा भाऊ प्रिय बबलू उपाख्य डॉ.प्रमोद सखाराम राऊत..! तब्बल १८ वर्षाच्या सेवेत गाडीने खूप सहकार्य केले आहे. या दीड तपाच्या कालावधीत माझ्या सरकारी सेवेत येणे-जाणे  अथवा कुठे इतरत्र जाण्यायेण्यासाठी या गाडीने जीवापाड साथ आजतागायत  दिली आहे. माझ्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण क्षणांची ही गाडी " मुक साक्षीदार " आहे. याच हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीचा माझ्या आई वडिलांची सेवा / शुश्रुषा करण्यासाठी एक प्रवासी माध्यम म्हणून उपयोग झाला. या अशा अनेकानेक भावूक आठवणी या दुचाकी वाहनाशी निगडित असल्यामुळे तिचं आमच्या कुटुंबात खूपच सन्मानाचे अन् मायेचे स्थान आहे. याचं कारणांमुळे आमच्या या दुचाकीला विकण्याचे आमच्या स्वप्नात देखील येत नाही.थोडक्यात सजीव अन् निर्जीव यांचे एकमेकांवर निस्सीम प्रेम असल्याने आमचे नाते संजीवन नात्यात घट्ट झाले आहे.

आजही Splendor गाडीची तब्येत ठणठणीत आहे. ती कधी मधी मुकहट्ट करते,पण मी तिच्या मुक भावना समजून घेऊन त्या वेळोवेळी पूर्ण करत आलेलो आहे.  नवीन गाडी घेऊ शकलो असतो,परंतु ज्या वाहनाने आजतागायत कोणताही मोठा यांत्रीक त्रास (पंक्चर वगळता) दिलाय नाही तिला विकून नवीन गाडी  खरेदी करणे म्हणजे एक प्रकारे या Splendor गाडी विषयी तो " कृतघ्नपणा " ठरला असता. माझ्या कित्येक मित्रांच्या गाड्या आल्या अन् गेल्या सुध्दा..! पण माझी हिरो होंडा स्प्लेंडर अजूनही माझ्या सहवासात सुखाने नांदत आहे. निर्जीव किंवा सजीव यांना निव्वळ माया लावली,तर प्रतुत्तर दाखल भेटणारे प्रेम चिरंजीव असते,हे माझ्या हिरो होंडा स्प्लेंडर गाडीवर असणाऱ्या माझ्या मायेचं फलित आहे.

ज्या तारूण्याने त्याच्या ऐन तरूणपणी आपली काळजी घेतली ते तारुण्य , वार्धक्यात आले म्हणजे त्यांना न विसरणे ही आपली भारतीय संस्कृती. मग ते तारुण्य व वार्धक्य  सजीव असो अथवा निर्जीव..! त्यांच्याविषयी आपण " कृतज्ञपणा " दाखवायलाच हवा.

पुनश्च एकदा " Hero Honda Splendor  " गाडीचे माझ्या कुटुंबाकडून खूप-खूप आभार, तिने दिलेल्या  विनम्र सेवेबद्दल..! आज सकाळी गाडीचे हिंदू धर्मातील प्रथेनुसार आमचे तीर्थरूप वडील, माझी पत्नी, मूलं आणि मी स्वतः पूजन केले. आज त्या निमित्त माझ्या प्रेमळ गाडीला माझा आवडता गोड पदार्थ   " गूळ " प्रसाद म्हणून दिला.

ता.क.:  कृतार्थ जीवन जगायचे असेल तर कृतज्ञता बाळगायला हवी..छोटछोट्या गोष्टीत..!                        

|| वंदे मातरम् ||

हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचा मालक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

स्थळ : लासूर स्टेशन येथील आमच्या घराच्या समोरील परिसर..!

दिनांक: २८ मे २०१७




मंगळवार, २६ मे, २०२०

" फक्त आपलाच जाणवणारा, प्रिय संतोष गायकवाड..! "






मला प्रवासात भेटलेली माणसं..!

"  फक्त आपलाच जाणवणारा, प्रिय संतोष गायकवाड..! "

====================================

ज्यावेळी एखादा,त्याच्या पेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या असणाऱ्या माणसाजवळ आपले सर्व मनोभाव सहजपणे व्यक्त करत असतो,तेंव्हा ते नाते..भावनिक दृष्ट्या खूप प्रगल्भ असते.अर्थात..ते मनोभाव..खूप रमणीय,भावूक,सामाजिक भान असणारे,आपल्याला आवडणाऱ्या सर्व क्षेत्रांवर  निस्सीम प्रेम करणारे असले तरच.. अशी रक्ताची नसलेली...पण...रक्ताच्या नात्यालाही लाजवेल अशी नाती अजरामर झालेली आहे..!

याच उपरोक्त नात्यांच्या प्रेमळ गुंतागुंतीत माझ्या आयुष्यात गुंफलेला
" फक्त आमचा  प्रिय सखा संतोष पंडीतराव गायकवाड "  रा.लासूरगाव, ता. वैजापूर हा आहे..!
"फक्त आमचा "असे विशेषण लावण्याचे कारण..............
या संतोषवर मी, माझे प्रिय मित्र..रामेश्वर राऊत सर( ह.मु.लासूर स्टेशन),नितीन पगार सर ( ह.मु.नाशिक)व मधुकर शेवाळे( ह.मु.,मालेगाव नाशिक) यांनी भरभरून निस्सीम प्रेम केले,करत आहोत व करत राहणार..! या यादीत अजुन काही शिक्षक मित्र असतील कदाचित पण आम्ही जरा जास्तच..प्रेम केलं आमच्या संतोषवर..!

या निस्सीम मैत्रीचा प्रारंभ होतो.. इ.स.१९९५ साली..!
( कृपया " साली " याचा येथे अर्थ वर्ष अभिप्रेत आहे. हल्ली महाराष्ट्रात काही प्रादेशिक ,नात्यांच्या शब्दावरून नाहक कल्लोळ माजवून राजकीय तव्यावर पोळी भाजून घेणारे खूप आहेत..म्हणून त्यांच्याकरीता नम्रपुर्वक खुलासा सादर..! खुलासा नाही करावा तर..मी ही यांचे नाहक लक्ष्य होऊ शकतो..!😂)

आम्ही नुकतेच जून १९९५ ला लासूरगाव केंद्रात रुजू झालो होतो.त्यावेळी केंद्रीय शाळेवर शिपाई मामा म्हणून गायकवाड मामा होते.त्यांचाच मुलगा हा संतोष..! त्यावेळी संतोष माध्यमिक वर्गात होता. मामांमूळे संतोष व आमच्या खूप प्रेमाचे नाते वृद्धिंगत होत गेले..!

आम्ही एकदम नवतरुण शिक्षक होतो,संतोष आमच्या प्रत्येक सुख,दुःखात सहभागी व्हायचा.आमच्या सर्वांच्या लग्नात मनमुरादपणे याच संतोषने आनंद लुटला..! शिक्षक म्हणून नोकरी करत असताना शिक्षकांसोबत मैत्री होणे स्वाभाविक आहे..पण .. आम्ही लासूरगाव केंद्रांतर्गत कार्यरत असताना शिक्षक मित्र मंडळी सोडून दोन असे गोड मित्र आम्ही कमावले..की त्यांच्या मैत्रीची आठवण आजही क्षणोक्षणी येते...व त्यातील एक हा  प्रिय संतोष तर आजही नेहमी आमच्या सोबत असतोच..! त्या दोन मित्रांपैकी एक अतिशय जिव्हाळ्याचा व खूप माणुसकी असलेला आमचा प्रिय मित्र होता..स्वर्गीय मनोहर काळे ( ग्रामपंचायत सदस्य लासूरगाव)..! या आमच्या प्रिय मित्राला नियतीने  आपल्यातून हिरावून नेले...! प्रचंड दुःख झाले एक जिवलग मित्र गेल्याचे..!😔

आज आम्ही वरील उल्लेखित शिक्षक मित्रांपैकी मी, नितीन अन् शेवाळे, कोणीच लासूरगाव केंद्रांतर्गत कार्यरत नाही..! बहुदा पुन्हा तिथे कार्यरत होण्याची शक्यता देखील नाही..!कारण नितीन पगार व मधुकर शेवाळे त्यांच्या नाशिक जिल्ह्यात बदली करून निघून गेले अन् मी ही आता माझ्या मूळ वैजापूर तालुक्यात येण्याची शक्यता कमीच..! पण....स्व.मनोहर काळेंच्या गोड स्मृती सदैव आमच्या सोबत असेल,आणि सदैव सदाबहार असलेल्या आमच्या संतोषची खूप जिवाभावाची साथ आमच्या सोबत  आजही नक्कीच आहे..!

या आमच्या प्रिय मित्राला  संतोषला कला,संगीत,अभिनय, चित्रकला, गायन यांची लई जाम आवड..!कलेवर निस्सीम प्रेम करणारा आमचा प्रिय संतोष..! हा वेळोवेळी विविध गाण्यांचे अल्बम देखील काढतो..! याची शेरोशायरीवर खूप छान हुकूमत आहे..! नाना पाटेकर यांचा अभिनय करण्यात याचा खूप हातखंडा आहे..! संतोष मधील जेंव्हा नाना पाटेकर जागा होतो तेंव्हा नाना पाटेकर जरी प्रत्यक्ष उपस्थित असले तरी त्यांनाही आपल्या मूळ अभिनयात सुधारणा करावीशी वाटेल,एवढं सहजसुंदर अभिनय हाच संतोष करतो..! त्याच्या छंदाची आम्ही नेहमी आमची रसिक मनाची भूक भागवून घेत असतो..!😊 मी माझी जन्मभूमी पालखेड गाव सोडल्यानंतर  जिवाभावाचा,अगदी घरगुती मित्र कमावलेला आहे..अन् तो म्हणजे प्रिय संतोष..! अगदी हक्काने घरी येणार,आस्थेवाईकपणे सर्वांची चौकशी करणार..आमचे स्वयंपाक घर तर याला हक्काचे..! आमचं सर्व घर प्रिय संतोषच्या विश्वासावर बिनधास्तपणे सोपवून जावं,एवढा‌ विश्वास या आमच्या संतोषवर आहे..!

आमच्या प्रिय संतोषच्या आयुष्यात, आम्ही वर उल्लेख केलेल्या मित्रांनी नेहमी सहकार्याची,मार्गदर्शकाची, मोठ्या भावाची भूमिका नेहमी  निभावलेली आहे..व भविष्यात देखील निभावणारच यात शंकाच नाही..!

थोडक्यात आमचे संपूर्ण घर,कुटुंब,सदस्य या आमच्या प्रिय संतोषच्या विश्वासावर सोडून जाणारे आम्ही..! असा विश्वास, त्या विश्वासाला सार्थ ठरविणारे आमच्या प्रिय संतोष सारखे माणसं आजच्या जमान्यात लाभणे..हे आमचे नशीबच म्हणावे..!आम्हा काही मित्रांना आमच्या या प्रिय संतोष वर खूप विश्वास आहे.. !

ता.क.: मी माझ्या आयुष्यात एकमेव मराठी लघु चित्रपटात छोट्या भूमिकेत अभिनय केला आहे,त्यात मला प्रिय संतोषने खूप छान साथ दिलेली आहे..! तो मराठी लघु  चित्रपट आहे..." पर्याय..!"

वंदे मातरम्..!

प्रिय संतोषचा घरगुती स्नेही लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२२ मे २०१८

रविवार, २४ मे, २०२०

" आमची शिरखुर्म्यासारखी गोड कृतार्थ भेट..! "






मला प्रवासात भेटलेली माणसं..!

 " आमची शिरखुर्म्यासारखी गोड कृतार्थ भेट..! " 

===================================

आजचा १७ जून २०१८ चा दिवस  आम्ही सर्व बालमित्र आमच्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही ..! आज आम्ही एका आई सोबत..तिच्या मुलांनी रमजान ईद साजरी केली...!

माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येऊन जातात की,ते त्याच्या हृदयात कायमचे कोरले जातात..!
आज दिनांक १७ जून २०१८ रोजी सकाळी आम्ही बालमित्र आण्णासाहेब म्हस्के(सब मॅनेजर मराठवाडा ऑटो कंपनी,बजाजनगर), संजय उगले पा. दहेगावकर,ह.मु.औरंगाबाद(औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी) ,हंसराज भुजाडे पा.कन्नक सागजकर,ह.मु.औरंगाबाद ( माध्यमिक शिक्षक) व मजकूर लेखन करणारा इसम..आम्ही सर्वांनी ठरवले की,आज आपण आपला बालमित्र कंमु बेग मिर्जा राहणार जळगाव, ता.वैजापूर याच्या घरी जायचे व रमजान ईद निमित्त त्याच्या संपूर्ण परिवारास शुभेच्छा द्यायच्या..!

सकाळी ११ वा. निघालो..! जळगावला पोहचलो..! कम्मु ला खूप खूप आनंद झाला..!  आम्ही आल्याचे कळताच त्याची आई..ज्या की आज खूप थकल्या आहेत,त्या धावत आल्या..आपल्या या लेकरांना भेटण्यासाठी..! आईची माया जगात वेडी म्हणतात...ती यामुळेच..! त्या मायेला फक्त धावणे माहीत असते...आपल्या लेकरांच्या पाठीमागे..! दुसरं काहीही तिला माहीत नसते..! माझा आणि कम्मू च्या आईचा पूर्वीचा परिचय होताच..! आल्या... आल्या..मी म्हणालो..
" आई,पहचाना क्या...मुझे..?"
आई- " अरे, बेटा,तू जाधव सर है ना..!"
मी- " आई, मैं तेरे सामने  ,सर नही हुं..सिर्फ जाधव हुं..!"
हे ऐकल्यावर म्हातारीला खूप खूप बरं वाटलं..!आली..अन् माझ्याजवळच अगदी जवळ बसली..! मला माझ्या स्वर्गीय आईची यावेळी खूप गहिवरून आठवण आली पण मी ती मित्रांसमोर व्यक्त होऊ दिली नाही.. आतून खूप खूप भावूक झालो होतो..!

 कंमुबेग च्या पत्नीने ,आमच्या ताईंनी खूप स्वादिष्ट " शिरखुर्मा " बनवला होता..! त्या सोबत..गरमागरम गुलगुले..व भजे,पापड..! ताईंच्या हाताला खूप चव होती..! यथेच्छ ताव मारला..!
शेवटी आम्ही निघालो..औरंगाबादला..तर आई म्हणाली..
" बच्चो, आज मेरा दिल बहुत खुश हुआ ..तुम सब... इतने दूर से मेरे कमु के वास्ते आये..हमेशा उसके साथ रहणा.. यही दुआ हैं मेरी अल्ला से..!"
मी-" आई,हम सब कम्मु के साथ हमेशा थे... और रहेंगे..!"
यावर आई म्हणाली - " बच्चो, दूनियामे सबसे बडा वही होता है... जिसके दिलमे गरिबोके लिये प्यार होता है..! यह बात मेरी हमेशा ध्यान में रखना..!"

खरंच.. या वाक्यात त्या म्हातारीच्या आयुष्याचा अनुभव व्यक्त होत होता..!आम्ही सर्व मित्र तर..याच विचारधारेचा सन्मान करणारे होतो..! शेवटी निरोप घेतला..तेंव्हा आम्ही आईचे दर्शन घेतले. मी आईला  आग्रहाने म्हणालो..
" आई, वो...जो..चेहरे पर से जो हात घुमाते हैं...ना... वैसा घुमाओ ना..!"
 मी असं म्हणल्या बरोबर...म्हातारीनं..माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला..व तिच्या कानाजवळ तिच्याच हाताचे बोट मोडली..!
मला या कृतीमुळे माझ्या आईची खूप खूप आठवण आली..! ती बऱ्याचदा मला अशीच करायची..! आई.. ती सर्वत्र एकसारखीच असते..! तिला..जातपात,धर्म,पंथ कधीच बंधीस्त करूच शकत नाही..! याचा मी व माझे सर्व बालमित्र याची देही याचि डोळा अनुभव घेत होतो..!

आजचा दिवस कृतार्थ झाल्याचे समाधान आमच्या सर्वांच्या मनात होते..!
आम्ही कम्मुबेग च्या घरापासून दूर आलो होतो..निघण्यासाठी.....तर....आई..आम्हाला निरोप देण्यासाठी काठी टेकवत..टेकवत तिथपर्यंत आलीच होती..!
" आईची वेडी माया असते...ती अशी..!"
आज खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या मित्रा सोबत रमजान ईद साजरी केल्याचे आत्मिक समाधान आम्हाला..मिळाले होते..!

ता.क.: प्रत्येक धर्माच्या ,प्रत्येक सणामध्ये आईची माया जर सामावली...ना...तर..त्या सणांचा गोडवा...आईच्या माये सारखाच खूप...गोड...गोड..होईल...अगदी शिरखुर्म्यासारखा..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

प्रसंग स्थळ: जळगाव,ता.वैजापूर,जिल्हा:,औरंगाबाद

भेट दिनांक: १७ जून २०१८

शनिवार, २३ मे, २०२०

" ध्येयवेडा प्रिय अनिल पाटील वाणी..! "




आमचे गाव आमची माणसं

" ध्येयवेडा प्रिय अनिल पाटील वाणी..! "

=================================

भारतीय लोकशाहीच्या उज्वल परंपरेत अगदी गाव स्तरावरून ते थेट राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेकानेक थोर  मोठ्या लोकांनी आपल्या कर्मातून समिधा अर्पण केलेल्या आहेत..! त्या अनेकानेक थोर मोठ्या काही  माणसांना  कुणाचे तरी पाठबळ मिळाले होते, तर काहींनी स्वकर्तुत्वाने आपले नाव इतिहासात अजरामर केलेले आहे..! राजकीय क्षेत्रात ज्यांना  कुणाला  राजकीय वारसा ,हा  त्यांच्या घराण्यातून मिळत आलेला असतो, अशांना याच क्षेत्रात कार्य कर्तृत्व सिद्ध करायला सोपे जाते..! कारण सगळ्याच प्रकारची सोय अशांच्या पूर्वजांनी अगोदरच करून ठेवलेली असते..!😊 त्याच वंश परंपरागत पद्धतीने मिळालेल्या राजकीय वारसा हक्काच्या बळावर कित्येकजण कुणी आपापल्या कर्तुत्वाला समाजाच्या समोर प्रस्तुत करत असतात...! मात्र ज्यांना असा कोणताही राजकीय वारसा,वंश परंपरागत पद्धतीने लाभलेला नसतो,अशी राजकीय माणसं जर, समाजात आपलं ,एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत असतील,तर अशा मोजक्याच पण ग्रेट असणाऱ्या राजकीय माणसांना वंदन करावेच वाटते..!
कारण अशांच्या पूर्वजांनी , अशा माणसांसाठी सगळ्याच प्रकारची सोय अजिबात  करून ठेवलेली नसते..! अशा माणसांना,ज्यांना अजिबात राजकीय वारसा मिळालेला नसतो,त्यांना सगळं काही बे एक बे पासून सुरु करावे लागते..!

माझी जन्मभूमी पालखेड, ता. वैजापूर जि. औरंगाबाद येथील एक ध्येयवेडा तरुण याच अशा राजकीय लोकांच्या पंक्तीतील आहे,ज्यांना अजिबात राजकीय वारसा  आपल्या पूर्वजांकडून मिळालेला नाही..!या नवतरुण मित्राला देखील त्याच्या घराण्याकडून कोणताही राजकीय वारसा अजिबात लाभलेला नाही..! मात्र सगळं काही स्वतः च्या कार्य कर्तृत्वावर  या नवतरुण मित्राने राजकीय अन् सामाजिक क्षेत्रात स्वतचं स्थान निर्माण केले होते..! आमच्या पालखेड गावातील , सर्व सामान्य माणसात, मिसळणाऱ्या  असामान्य नवतरुणाचे नाव आहे अनिल गोरखनाथकाका पाटील वाणी..!

प्रिय अनिल....! ( सदरील फोटोत टी शर्ट घातलेला )

माझा खूप जिवलग बालमित्र डॉ.गणेश जगन्नाथ पा. वाणी याचा भाऊ..! अगदी नवतरुण राजकारण करणाऱ्या लोकांच्या वयोगटातील..! याचा स्वभाव खूप धडपड्या..!  दरवर्षी आमच्या पालखेड गावातील बळीराजाच्या बैल पोळा सणाच्या निमित्ताने गावातील सर्व शेतकऱ्यांच्या बैलांना स्व खर्चातून ,दुष्काळी भाग असूनही  अंघोळ घालणारा प्रिय अनिल..! आमच्या पालखेड गावाच्या कानाकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी स्व खर्चातून सिमेंटचे बाकडे बसविणारा  प्रिय अनिल..! राजकीय व्यक्ती कमी पण सर्व सामान्य मित्र जाणवणारा प्रिय अनिल..! कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी पुरविणारा प्रिय अनिल..! जो समाज आर्थिक,सामाजिक दृष्टया वंचित आहे,अशांच्या मदतीला धावून जाणारा प्रिय अनिल..!

प्रिय अनिल ,हा  मनाने हळवा देखील आहे अन् प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक दायित्व निभावणारा देखील आहे..! याचे एक उदाहरण, अशा अनेकांच्या मुस्काडात सणसणीत चपराक आहे, जे मुलींना अतिशय तुच्छतेने लेखतात किंवा मुलीच्या जन्माने ज्यांच्या कपाळावर आढ्या पडतात..! आमच्या प्रिय अनिलने, आर्थिक परिस्थिती सर्व सामान्य असणाऱ्या कुटुंबातून एक मुलगी दत्तक घेतली आहे अन् त्याच कन्येचे ,हाच प्रिय अनिल स्वतच्या सख्ख्या मुलांच्या पेक्षाही एक बाप म्हणून खूप खूप लाड पुरवत आहे..! प्रिय अनिल याच्या या सामाजिक दायित्वाला त्रिवार वंदन..!🙏🙏🙏

गेल्या काही दिवसांपूर्वी याच प्रिय अनिलने,अजुन एक अचाट कार्य केले आहे..! आमच्या पालखेड गावाच्या पंचक्रोशीत ,आमचे पालखेड गाव एक मोठी व्यापारी पेठ आहे.त्यामुळे आसपासच्या परिसरातील माणसांची खरेदी विक्री साठी पालखेड गावात येणे जाणे नेहमी सुरू असते. आमचे पालखेड गाव ते बल्लाळी सागज‌ या दोन्ही गावाच्या दरम्यान लोकांना ये - जा करण्यासाठी जो रस्ता होता तो अतिशय खराब झालेला होता.प्रिय अनिलने स्वखर्चातून लाखो रुपये खर्च करून जवळ जवळ दोन किलोमीटर रस्ता मुरूम, माती टाकून शेतकऱ्यांना,इतर लोकांना येण्याजाण्यासाठी व्यवस्थित करून दिला आहे..! विशेष म्हणजे प्रिय अनिल हा,कोणत्याही लोकनियुक्त पदावर नाही किंवा नव्हता..! तरी देखील एक सामाजिक दायित्व म्हणून त्याचं कार्य खरंच कौतुकास्पद आहे..!
( सदरील कामाची व्हिडिओ लिंक https://m.youtube.com/watch?v=7kE_NuV24rY&feature=youtu.be                       )

प्रिय अनिलच्या या अतिशय उच्च कोटीच्या सामाजिक कार्याबद्दल त्याला पुनश्च एकदा त्रिवार वंदन..!🙏🙏🙏

आजही ,कुठेही प्रिय अनिल भेटला की,अतिशय नम्रपणे अन् आस्थेवाईकपणे चौकशी करतो..! विशेषकरून माझ्या तीर्थरूप वडिलांची..! माझ्या वडिलांचा हा प्रिय अनिल,खूप आवडता,त्यामुळे वडिलांनाही याच्या कार्य कर्तृत्वाचा नेहमी अभिमान वाटतो..!

प्रिय अनिल गोरखनाथकाका पाटील वाणी, आपणास आपल्या पालखेड गावचे ग्रामदैवत श्री.पारेश्वर महादेवाच्या कृपा आशीर्वादाने सुख समृद्धी लाभो हीच प्रार्थना..!

वंदे मातरम्..!

लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक : २४ मे २०२०, रविवार.

प्राचीन भारत भाग क्र. ३४ 🔵 देवगिरीचे यादव 🔵



🛑 प्राचीन भारत, शेवटचा भाग क्रमांक ३४ 🛑

               🔵 देवगिरीचे यादव 🔵
         ===================================

🔶देवगिरीचे यादव,  आर्षकालीन भगवान श्री कृष्ण यांच्या यदु वंशाचे वंशज आहोत,असा दावा करतात.
🔶 इतिहास काळात यदु वंशाचे दोन राजघराणी आढळतात; एक - सेऊन देशाचे  यादव ( देवगिरीच्या सभोवतालचा प्रदेश ) आणि दुसरे - द्वारसमुद्रचे होयसळ ( हळेबीड - म्हैसूर ).

१) ♦️ भिल्लम  ( इ. स.११८५ - ११९३ )♦️

🔘 भिल्लमाने देवगिरीला स्वतः ची राजधानी वसविली आणि इथून पुढे हे राजघराणे देवगिरीचे यादव म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
🔘 भिल्लमाने चोल राजा कुलोत्तुंग तिसरा याचाही पराभव केला.उत्तरेकडील अनेक राज्यांवर विजय मिळविल्याचे श्रेय भिल्लम याला देण्यात येते.

२) ♦️जैत्रपाल उर्फ जैतुगी   ♦️
          ( इ. स.११९३ - १२०० )

🔘  भिल्लम यांच्या नंतर त्यांचा पुत्र जैत्रपाल उर्फ जैतुगी हा देवगिरीच्या गादीवर आला.
🔘 हा असाधारण योद्धा होता.याने दक्षिणेतील चोल, गंग आणि काकतीय राजांशी यशस्वी लढाया दिल्यात.

३) ♦️ सिंघण  ( इ. स.१२०० - १२४७ )♦️

🔘 जैत्रपाल उर्फ जैतुगी याचा पुत्र सिंघण  हा इ. स.१२०० मध्ये देवगिरीच्या गादीवर आला.
🔘 सिंघण हा यादव घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय.
🔘 सिंघण याने लाट प्रदेश ( गुजराथ ) यादव राज्यास जोडला.याने उत्तर भारतात माळव्याचा परमार,उत्तरेकडील मुस्लिम शासक, छत्तीसगड आणि त्रिपुरीचे कलचुरी यांचा पराभव केला.
🔘 सिंघण याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत देवगिरीच्या राज्याचे रूपांतर साम्राज्यात होऊन संपूर्ण दख्खन मध्ये पसरले.शिवाय कृष्णा नदीच्या पलीकडील दक्षिण भारतातील काही प्रदेश देखील यादव साम्राज्यात समावेश होत होता.

४)  ♦️ कृष्ण  ( इ. स.१२४७ - १२६०)♦️

🔘 यादव राजा सिंघण याच्या नातूचे नाव कृष्ण होते.
🔘 आपले पितृदत्त साम्राज्य याने अत्यंत चोखपणे सांभाळले.

५)   ♦️ महादेव  ( इ. स.१२६० - १२७१)♦️

🔘 सिंघण यांचा दुसरा नातू महादेव देवगिरी यादव घराण्यातील गादीवर आला.
🔘 महादेव याने देखील आपले पितृदत्त साम्राज्य याने अत्यंत चोखपणे सांभाळले. महादेव याने उत्तरेत व दक्षिणेत यादव साम्राज्याची प्रतिष्ठा व दरारा कायम राखला.
🔘 सुप्रसिध्द हेमाद्री पंडित महादेवाचा मंत्री होता.

६)  ♦️ रामचंद्रदेव  ♦️

🔘 महादेव यांच्या  नंतर देवगिरी गादीवर कृष्णाचा  मुलगा रामचंद्रदेव हा गादीवर आला.
🔘 रामचंद्रदेव हा यादव घराण्यातील शेवटचा स्वतंत्र राजा होय.
🔘 इ. स.१२९६ मध्ये अलाउद्दीन खिलजी देवगिरीच्या यादव राज्यावर कोसळला.
🔘 अलाउद्दीन खिलजी याने देवगिरीच्या पायथ्याशी असलेले शहर लुटले.यानंतर रामचंद्रदेव याने तहाची बोलणी सुरू केली.याच सुमारास रामचंद्रदेव यांचा मुलगा सिंघणदेव दक्षिणेतील मोहिमेवरून परतल्यामूळे तहाची बोलणी फिसकटली.
🔘 सिंघणदेव याने अलाउद्दीन खिलजी बरोबर अटीतटीचे युद्ध केले,पण त्यात तो पराभूत झाला.रामचंद्रदेव याला फार मोठी खंडणी देऊन आपल्या राज्याचा बचाव करावा लागला.
🔘 रामचंद्रदेव याने इ. स.१३०३ मध्ये अलाउद्दीन खिलजी  यास खंडणी देण्याचे थांबविले.
🔘 देवगिरीच्या  या आगळिकीमूळे संतप्त झालेल्या अलाउद्दीन खिलजीने मलिक काफूर हजार दिनारची इ.स.१३०७ मध्ये ससैन्य देवगिरी राज्यावर रवानगी केली.
🔘 रामचंद्रदेवास त्याच्या कुटुंबासह युद्धकैदी बनवून मलिक काफूर दिल्लीस घेऊन आला.
🔘 रामचंद्रदेव यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा सिंघणदेव याने अलाउद्दीन खिलजीला वार्षिक खंडणी देणे बंद केले.त्यामुळे अलाउद्दीन खिलजी याने मलिक काफूर याला इ. स.१३१३ मध्ये देवगिरी राज्यावर पाठविले.या युध्दात सिंघणदेव पराभूत झाला होऊन मारला गेला.
🔘 सिंघणदेव यांच्या मृत्यू नंतर  रामचंद्रदेव यांचा जावई हरपाळदेव यास मलिक काफूरने राजपद बहाल केले.हरपाळदेव याने दिल्लीच्या मुस्लिम सत्तेच्या विरुद्ध बंडाचे निशाण रोवले.हरपाळदेव यास बंदिवान करण्यात येऊन कठोर शिक्षा दिली.यानंतर दख्खनचा प्रदेश दिल्लीच्या मुस्लिम सत्तेचा एक प्रांत बनला.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  २० मे २०२०, बुधवार

🔴 " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य. या पुस्तकातील ठळक मुद्द्यांवर आधारीत अ.क्र. १ ते ३४ ही अनुलेखन लेखमाला समाप्त..!🙏😊🌹

प्राचीन भारत भाग क्र.३३ 🔵 महमूद गझनी आणि मुहम्मद घोरी- आक्रमणे 🔵



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक ३३ 🛑

 🔵 महमूद गझनी आणि मुहम्मद घोरी- आक्रमणे 🔵
         ===================================

♦️महमूद गझनीच्या स्वाऱ्या♦️

🔘 इ. स.९९९पर्यंत मध्य आशियात आपले स्थान स्थिर झाल्यावर महमूद गझनी याने पुढील सव्वीस वर्षात भारतावर सतरा स्वाऱ्या करून अगणित लूट लुटून आणि प्रचंड विध्वंस करून,पंजाबचा सुपीक प्रांत गझनी राज्यास जोडला.
🔘 असंख्य मंदिराची सुशोभित असलेले हजार राजवाड्याचे  असलेले मथुरा लुटले.
🔘 मथुराच्या लुटी पेक्षाही तिथला अधिक विध्वंसामूळे भारतीय संस्कृतीची पुन्हा कधी भरून न येणारी हानी झाली. भारतीय स्थापत्यकलेचे कायमचे नुकसान झाले.
🔘  मथुरेच्या पाठोपाठ ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वृंदावन चा महमूद गझनी ने विध्वंस केला.आर्थिक लुटी पेक्षाही स्थापत्यकलेचे नुकसान झाले,ते अधिक धक्कादायक व रानटीपणाचे द्दोतक होते.
🔘इ. स.१०२५ - २६ मधील सोरटी सोमनाथ  वरील स्वारी महमूद गझनीची नियोजनबध्द स्वारी होती.
🔘 अनेक शिखरांनी युक्त असलेले तेरा मजली उंच असलेले ;सोमनाथ मंदिर तत्कालीन भारतीय ऐश्र्वर्याचे प्रतीक होते.
🔘 सोमनाथचे लिंग भंग करण्यात आले.देवालयाचा विध्वंस झाला.
🔘एकट्या सोमनाथ मंदिराच्या लुटीत महमूद गझनी ला जी द्रव्य प्राप्ती झाली,तिचा शंभरावा भागही तत्कालीन कोणत्याही हिंदू राजाच्या खजिन्यात त्यावेळी नव्हता.सोमनाथ येथे महमूद गझनी पंधरा दिवस मुक्काम ठोकून होता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️ मुहम्मद घोरीच्या स्वाऱ्या♦️

🔘 गझनी व हिरातच्या दरम्यान सुर टोळीच्या अधिपत्याखालील घोर राज्य, महमूद गझनी याने इ. स.१०१० मध्ये जिंकून घेतले.
🔘 इ. स.११७८ मध्ये शाहबुद्दीन मुहम्मद घोरी याने गुजराथ वर आक्रमण केले. त्यावेळी चालुक्य राणी नाइकीने अल्पवयीन पुत्र मुलराज दुसरा याला सोबत घेऊन स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. अत्यंत शौर्याने शाहबुद्दीन मुहम्मद घोरी  याला माऊंट अबू जवळ झालेल्या युध्दात  पराभूत करून पिटाळून लावले.
🔘 इ. स.११९१ मध्ये मुहम्मद घोरी व पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा यांच्यात तराई येथे युद्ध झाले.यात मुहम्मद घोरी याचा पराभव झाला. या युध्दात कनोजचा गढवाल राजा जयचंद्र अलिप्त राहिला.
🔘 मुहम्मद घोरी याने पुन्हा इ. स.११९२ मध्ये पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याच्यावर चालून आला.याही वेळेस कनोजचा गढवाल राजा जयचंद्र अलिप्त राहिला.या युध्दात पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याचा पराभव झाला. अखेर पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा यांना पकडण्यात आले व त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
🔘 इ. स.११९४ मध्ये मुहम्मद घोरी याने कानोजच्या जयचंद्र राठोड वर हल्ला केला.यमुने जवळ चांद्वार या ठिकाणी दोन्ही सैन्यात धुमश्चक्री उडाली. मुहम्मद घोरी याने कानोजच्या जयचंद्र राठोडचा रणभूमी वरच शिरच्छेद केला.
🔘 या लढाई नंतर उत्तर भारतात मुहम्मद घोरी ला विरोध करणारा एकही प्रबळ राजा शिल्लक उरला नाही.
🔘 इ. स.१२०६  मध्ये  सिंधूच्या तीरावर गख्खरांनी मुहम्मद घोरीला ठार केले.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १९ मे २०२०, मंगळवार.

🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.३२ 🔵 शाकंभरी, अजमेर व‌ दिल्लीचे चाहमान घराणे 🔵




🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक ३२ 🛑

 🔵 शाकंभरी, अजमेर व‌ दिल्लीचे चाहमान  घराणे 🔵

             🔵 चौहान - चव्हान 🔵

===================================

🔶 चाहमान हे अग्निकुळातील राजपूत होय.
🔶 शाकंभरी ( आजचे सांभर ) हे जोधपूर,जयपूर दरम्यान असलेले शहर त्यांची राजधानी होती.

१) ♦️अजयराज ♦️

🔘‌ आक्रमक साम्राज्यवादी राजनीतीचा अवलंब करणारा अजयराज हा शाकंभरीचा पहिला चाहमान राजा होय.
🔘 अजयराज याने वसविलेल्या नवीन शहराला त्याच्या मृत्यू नंतर  ' अजयमेरू ' या नावाने ओळखण्यात येऊ लागले. कालांतराने अजयमेरूचे संक्षिप्त रुप  ' अजमेर‌ ' झाले.

२)  ♦️अर्णोराज ♦️

🔘 अजयराज यांच्या पुत्राचे नाव अर्णोराज होते.
🔘 अर्णोराज हा इ. स.११३३ मध्ये गादीवर आला.
🔘 इ. स.११५३ मध्ये अर्णोराज याची त्याच्याच मुलाने जयदेव याने हत्या केली.
🔘 शाकंभरी च्या‌ गादीवर जयदेव बसला खरा,परंतु थोड्याच दिवसात त्याचा लहान भाऊ विग्रहराज चौथा उर्फ विशालदेव याने जयदेव याला पदच्युत करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली.

३)   ♦️विग्रहराज चौथा उर्फ विशालदेव ♦️
       ( इ. स.११५३-६३)

🔘  विग्रहराज चौथा उर्फ विशालदेव  हा अत्यंत कुशल शासक होता.हा उच्च दर्जाचा लेखक होता.
🔘  विग्रहराज चौथा याने ' हरकेली - नाटक ' हे एक उत्तम नाटक असून त्याचा दगडावर कोरलेला काही अंश आजही अजमेर मध्ये अस्तित्वात आहे.
🔘  विग्रहराज चौथा याचा राजकवी सोमदेव याने आपल्या धन्याच्या सन्मानार्थ ' ललितविग्रहराज ' हे नाटक लिहिलेले असून याही नाटकाचा दगडावर कोरलेला अंश  अजमेर येथील मशिदीत सापडला आहे.
🔘 कुतुबुद्दीन ऐबकाने निर्माण केलेली ही मशीद ,
' ढाई दिन का झोपडा ' मुळात  विग्रहराज चौथा याने बांधलेली संस्कृत पाठशाळा होती.मशिदीतील पाठशाळेचे स्वरुप आजही कायम आहे.
🔘  विग्रहराज चौथा यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा अपर गांगेय  लवकर मरण पावला.त्यामुळे अर्णोराज याचा नातू पृथ्वीराज दुसरा राजा झाला.

४)   ♦️सोमेश्वर ♦️

🔘 पृथ्वीराज दुसरा यांच्या मृत्यू नंतर त्याचा चुलता सोमेश्वर गादीवर आला.
🔘सोमेश्वर याची कारकीर्द शांततामय मार्गाने व्यतीत झाली. इ. स.११७७ मध्ये सोमेश्वर यांचा मृत्यू झाला.
🔘 सोमेश्वर यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा पृथ्वीराज तिसरा गादीवर आला.भारतीय इतिहासात याच पृथ्वीराज तिसरा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

५) ♦️  पृथ्वीराज तिसरा / पृथ्वीराज चव्हाण♦️

🔘 पृथ्वीराज तिसरा / पृथ्वीराज चव्हाण हा उत्तर भारतातील शेवटचा हिंदू सम्राट होय.
🔘 इ. स.११७८ मध्ये पृथ्वीराज तिसरा याने सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतली.
🔘 कनोजचा गढवाल राजा जयचंद्र आणि पृथ्वीराज तिसरा यांच्यात हाडवैर होते.
🔘 याच काळात मुहम्मद घोरी इ. स.११७३ मध्ये गझनीचा सुभेदार बनला.
🔘 इ. स.११९१ मध्ये मुहम्मद घोरी व पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा यांच्यात तराई येथे युद्ध झाले.यात मुहम्मद घोरी याचा पराभव झाला. या युध्दात कनोजचा गढवाल राजा जयचंद्र अलिप्त राहिला.
🔘 मुहम्मद घोरी याने पुन्हा इ. स.११९२ मध्ये पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याच्यावर चालून आला.याही वेळेस कनोजचा गढवाल राजा जयचंद्र अलिप्त राहिला.या युध्दात पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याचा पराभव झाला. अखेर पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा यांना पकडण्यात आले व त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

६) ♦️ हरिराज ♦️

🔘 मुहम्मद घोरी याने अजमेर जिंकून घेतले.पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याचा मुलगा गोविंद याला अजमेर चा शासक नेमले.
🔘 थोड्याच दिवसात पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याचा धाकटा भाऊ हरिराज याने गोविंद याला पदच्युत केले अन् अजमेर चा राजा बनला.
🔘 कुतुबुद्दीन ऐबक याने अजमेर वर आक्रमण केले.कुतुबुद्दीन ऐबकाच्या पुढे शरणागती पत्करण्यापेक्षा  हरिराज याने कुटुंबासह अग्नीप्रवेश केला. अजमेर कुतुबुद्दीन ऐबक याच्या हाती पडले.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १७ मे २०२०, रविवार

🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.३१ 🔵 बंगालचे पाल व सेन घराणे 🔵



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक ३१🛑

 🔵 बंगालचे पाल व सेन घराणे 🔵

===================================

🔵 पाल घराणे 🔵

🔶 बंगालमधील सरंजामदारांनी इ.स. ७६५ च्या सुमारास गोपाल नावाच्या पराक्रमी व नेतृत्वगुण असलेल्या पुरुषाची आपला राजा म्हणून निवड केली.
🔶 गोपाल नंतर वारसा हक्काने गादीवर आलेल्यांना पाल घराणे असे म्हणतात.
🔶 पाल घराण्याने सुमारे ४०० वर्षे राज्य केले.
🔶 पाल राजे बौद्ध धर्माचे अनुयायी होते.

१)  ♦️गोपाल  ( इ. स.७६५ - ७७०)♦️

🔘 गोपाल राजाने संपूर्ण बंगाल व मगध वर आपली सत्ता स्थापन केली.
🔘 बौद्ध धर्माचा अनुयायी गोपाल याने नालंदा जवळ ओदंतपूर येथे बौद्ध विद्यापीठ स्थापन केले.
🔘 गोपाल इ. स.७७० मध्ये मरण पावला.

२) ♦️ धर्मपाल  ( इ. स.७७० ते ८१५)♦️

🔘 गोपाल याच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा धर्मपाल हा गादीवर आला.
🔘 बौद्ध धर्माचा अनुयायी धर्मपाल याने गंगेच्या काठी भागलपूर येथे विक्रमशिला बौद्ध विद्यापीठ स्थापन केले.
🔘 इ. स.८१५ मध्ये धर्मपाल याचा मृत्यू झाला.

३) ♦️  देवपाल  ( इ. स.८१५ ते ८५५)♦️

🔘 धर्मपाल यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा देवपाल गादीवर आला.हा अत्यंत पराक्रमी होता.
🔘 देवपाल याने ४० वर्षे राज्य केले.
🔘 ब्रह्मदेश, जावा,सुमात्रा या देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

४) ♦️ नारायणपाल  (इ.स.८५५ - ९१२)♦️

🔘 देवपाल यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा नारायणपाल गादीवर आला.
🔘 नारायणपाल हा पाल घराण्यातील एकमेव शैव पंथीय राजा होता.
🔘 याने मगध,उत्तर बिहार,उत्तर बंगाल प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली.

५)   ♦️राज्यपाल  ♦️

🔘 नारायणपाल यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा राज्यपाल हा गादीवर आला.

६)  ♦️महिपाल ♦️

🔘 महिपाल हा नारायणपाल याचा नातू होय.
🔘 महिपाल याच्या कारकिर्दीपासूनच पाल सत्तेचा  -हास व्हायला सुरुवात झाली.
🔘 शेवटचा पाल राजा इंद्रद्दुम्नपाल यांच्या कारकिर्दीत इ. स.११७५ मध्ये पाल सत्तेचा शेवट झाला.

🔴 बौद्ध धर्मास शेवटचा राजाश्रय पाल राजांनी दिल्यामुळे बाराव्या शतकाच्या अखेरीस पर्यंत बंगाल मध्ये बौद्ध धर्म टिकून होता.
🔴 पाल सत्तेच्या अस्ता बरोबरच बंगाल मधील बौद्ध धर्माचे सुध्दा उच्चाटन झाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔵 बंगाल मधील सेन घराणे 🔵

🔶सेन घराणे वैदिक धर्माचे संरक्षक होते.
🔶 सेन वंशाचा संस्थापक सामंतसेन आणि त्याचा मुलगा हेमंतसेन दोघेही कल्याणीच्या चालुक्यांचे सामंत होते.

♦️ विजयसेन‌ ( इ.स.१०९५ ते ११५८)♦️

🔘 हेमंतसेन यांच्या मुलाचे नाव विजयसेन‌ होय.
🔘 विजयसेन‌ पराक्रमी ,महत्वकांक्षी राजा होता.
🔘 ६४ वर्षाच्या कारकर्दीत विजयसेन‌ बंगाल प्रांतात शांतता, सुव्यवस्था ,संपन्नता व समृध्दी नांदत होती

♦️ बल्लाळसेन‌ ( इ.स.११५८ ते ११७८)♦️

🔘 विजयसेन‌ यांच्या नंतर त्याचा पुत्र  बल्लाळसेन‌ गादीवर आला.
🔘  बल्लाळसेन‌ यांच्या काळात शैव पंथाचा जोरदार प्रसार झाला.
🔘  बल्लाळसेन‌ याने 'दानसागर ' व  ' अदभुतसागर ' हे दोन ग्रंथ लिहिले.

♦️लक्ष्मणसेन  (इ.स.११७८ ते १२०५) ♦️

🔘  बल्लाळसेन‌ यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा लक्ष्मणसेन गादीवर आला.
🔘 लक्ष्मणसेन वैष्णव पंथी होता.
🔘 इ. स.१२०५ पर्यंत तो बंगालच्या छोट्याशा प्रदेशावर राज्य करत होता.विश्वरुपसेन आणि केशवसेन यांनी आपले अस्तित्व टिकवून धरले होते.त्यांच्या नंतर सेन वंश पूर्णपणे विलय पावला.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १६ मे २०२०, शनिवार

🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.३० 🔵 गुर्जर प्रतिहार घराणे 🔵



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक ३०🛑

 🔵 गुर्जर प्रतिहार घराणे 🔵

===================================

गुर्जर प्रतिहार वंशाच्या शाखा जोधपूर,नंदिपुर,भडोच आणि उज्जयिनी येथे अस्तित्वात होत्या.

१) ♦️नागभट्ट पहिला ( इ.स.७३० ते ७५६)♦️

🔘  उज्जयिनी येथील राजा नागभट्टा पहिला याने प्रतिहारांच्या घराण्याचा विस्तार केला.
🔘 नागभट्टा पहिला याच्यानंतर सत्तेत आलेल्या कक्कुक आणि देवराज यांनी कोणतीही महत्त्वपूर्ण कामगिरी केली नाही.

२) ♦️ वत्सराज ( इ.स.७७८ ते ८०५)♦️

🔘 देवराज नंतर वत्सराज महत्वकांक्षी राजा उज्जयिनी गादीवर आला.

३) ♦️नागभट्ट दुसरा  ( इ. स.८०५ ते ८३३)♦️

🔘 वत्सराज यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा नागभट्टा दुसरा गादीवर आला.हा अतिशय पराक्रमी व महत्वकांक्षी होता.
🔘 नागभट्टा दुसरा याने अल्पावधीतच उत्तर भारतात गुर्जर प्रतिहारांचे प्रबळ साम्राज्य निर्माण केले.

४)  ♦️ रामभद्र  (इ. स.८३३ ते ८३६) ♦️

🔘  नागभट्ट दुसरा यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा रामभद्रा गादीवर बसला. याने केवळ तीन वर्षे राज्य केले.तो दुर्बल होता.

५) ♦️मिहीरभोज ( इ.स.८३६ ते ८८५)♦️

🔘 रामभद्र यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा मिहीरभोज गादीवर आला.
🔘 मिहीरभोज हा शक्तिशाली आणि महत्वकांक्षी राजा होता.
🔘 याने उत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण केली.

६)  ♦️महेंद्रपाल पहिला ( इ.स.८८५ ते ९१०)♦️

🔘 मिहीरभोज यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा महेंद्रपाल पहिला हा कनोज गादीवर आला.
🔘 यांच्या कारकिर्दीत इ. स.९०० च्या सुमारास  गुर्जर प्रतिहार घराण्याची सत्ता उत्कर्षाच्या परमोच्च बिंदू वर पोहोचली होती.

७)  ♦️महिपाल  (इ.९१२ ते ९४४)♦️

🔘  महेंद्रपाल पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा दुसरा भोज गादीवर आला.
🔘  महिपाल यांच्या कारकिर्दीत गुर्जर प्रतिहार समाराज्याच्या विघटनाला सुरुवात झाली.
🔘 महिपाल नंतर महेंद्रपाल दुसरा, देवपाल, विनायकपाल दुसरा, महिपाल दुसरा आणि विजयपाल या दुर्बल शासकांच्या काळात  गुर्जर प्रतिहार साम्राज्याचे विघटन अत्यंत वेगात झाले.
🔘 इ. स.९६३ मध्ये राष्ट्रकुट सम्राट कृष्ण तिसरा याने आक्रमण करून गुर्जर प्रतिहार घराण्याची उरली सुरली सत्ताही नष्ट केली.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १५ मे २०२०, शुक्रवार

🔴 प्राचीन भारत-
     क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.२९ ⚫ अरबांचे आक्रमण , भाग क्रमांक- ३ ⚫



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २९ 🛑

 ⚫ अरबांचे  आक्रमण , भाग क्रमांक- ३ ⚫

===================================

🛑 अरबांचा साम्राज्यविस्तार प्रयत्न 🛑

◼️ इ.स.७१४ मध्ये इराकचा सुभेदार हज्जाज वारला.
◼️ इ. स.७१५ मध्ये गादीवर आलेल्या नव्या खलिफाचे हज्जाजशी शत्रुत्व असल्याने त्याने महंमद बिन कासिमला वापस बोलाविले.हज्जाजच्या इतर अनुयायांबरोबरच महंमद बिन कासिमलाही हज्जाज वरील सुड म्हणून ठार मारण्यात आले.
◼️ सिंधची सत्ता आता जुनैद नावाच्या सरदाराला हाती आली.
◼️ जुनैद याने साम्राज्यविस्तार करण्याच्या दृष्टीने राजस्थान,मध्य भारत,गुजराथ,काशीच्या सरहद्दी पर्यंत आणि कनोजच्या सरहद्दी पर्यंत आक्रमणे केली.
◼️ काश्मीरचा राजा ललितादित्य‌ मुक्तापीड,अवंतीचा प्रतिहार राजा नागभट्ट,कनोजचा यशोवर्मन, लाट ( दक्षिण गुजराथ ) राजा अवनिजनाश्रय पुलकेशी  यांनी अरबांच्या आक्रमणाला पिटाळून लावले.

_______________________________________

🔴 अरबांच्या विजयाची कारणे 🔴

◼️दाहर राजाने देवल बंदराच्या व शहराच्या सरक्षणाची चोख व्यवस्था ठेवली नव्हती,ही त्याची चूक होती.
◼️ अरबांच्या सिंध मधील विजयाला फितूर नागरिकांची परकियांना साथ करण्याची अदुरदृष्टी.
◼️ दाहर वैदिक धर्माभिमानी होता तर सिंध मधील बहुसंख्य प्रजा बौध्द धर्मीय होती.बौद्ध धर्मामुळे जनता अहिंसक वृत्तीची बनली होती.
◼️ शौर्याचा अभाव नसतानाही केवळ हिंदू धर्मातील अंधश्रद्धेपोटी देवलच्या जनतेने पराभव पत्करला.
भारतीय जनतेत अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा,शकून अपशकुनाचे प्राबल्य प्रचंड प्रमाणात होते
◼️ सिंध हे हिंदू राज्य महंमद बिन कासिम गिळंकृत करत होता तेंव्हा उत्तर भारतातील एकही राजा सिंधच्या
बचावासाठी दाहर राजाच्या मदतीला आला नाही.

🛑 सिंध मध्ये दोन मोठी राज्ये होती.उत्तर सिंध मध्ये मुलतान आणि दक्षिण सिंध मध्ये मन्सुरा.
🛑 इ.स.१०११ मध्ये महमूद गझनीने मुलतान जिंकून गझनी राज्यास जोडले.
🛑 सिंध मधील अरबी सत्तेचा शेवट मुहम्मद घौरी याने केला.
🛑 इ. स.७१२ मध्ये महंमद बिन कासिम याच्या सिंध विजयाची परिणीती बाराव्या शतकाच्या अखेरीस उत्तर भारतात मुस्लिम राज्याच्या स्थापनेत झाली.पुढे दिल्ली सल्तनतीचे अलाउद्दीन खिलजीच्या काळात साम्राज्यात रूपांतर झाले.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १३ मे २०२०, बुधवार

🔴 प्राचीन भारत- अरबांचे आक्रमण  समाप्त
     प्राचीन भारत क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.२८ ⚫ अरबांचे आक्रमण, भाग क्रमांक -२ ⚫



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २८ 🛑

       ⚫ अरबांचे  आक्रमण, भाग क्रमांक -२ ⚫

===================================

🔴 सिंध प्रांतावर अरबांचे आक्रमण 🔴

◼️ इ. स.६५० नंतर अरब भारताच्या वायव्य सरहद्दीवर आणि पश्चिम किनारपट्टीवर सातत्याने धडका देत होते.
◼️मकरान‌ किनारपट्टी ताब्यात आल्याने सिंध प्रांतावर आक्रमण करण्यासाठी अरबांना केवळ निमित्त हवे होते.
◼️ यावेळी इराकचा सुभेदार हज्जाज होता.
◼️ सिंध स्वारीचे नेतृत्व हज्जाजचा पुतण्या व जावई
' महंमद बिन कासिम ' याच्यावर सोपविण्यात आले.
◼️ इ. स.७१२ मध्ये  महंमद बिन कासिमचे प्रचंड सैन्य मकरानच्या खुष्कीच्या मार्गाने व समुद्रमार्गे देवल बंदराला भिडले.
◼️ सिंध प्रांतात खऱ्या अर्थानं अजूनही दाहर राजाची सत्ता स्थिर झालेली नव्हती.
◼️ देवल बंदराच्या व शहराच्या संरक्षणाची पुरेशी व्यवस्था न करताच सिंधच्या पश्चिम भागातून दाहर सिंधू नदीच्या पूर्व भागात येऊन राहिला.
◼️ सिंधूच्या पूर्व भागात दाहर अरबांच्या आक्रमणास तोंड देण्याच्या दृष्टीने तयारीला लागला.
◼️ देवल मधील नागरिकांची अशी भाबडी समजूत होती की, जो पर्यंत देवल नगरातील मंदिराच्या कळसावरील उंच ध्वज फडकत आहे तो पर्यंत आपल्याला धोका नाही.
◼️ महंमद बिन कासिम याला हे कळताच त्याने ह्या अंधश्रद्धेचा अचूक फायदा उठविला.
◼️ महंमद बिन कासिम याने कळसासकट ध्वज खाली पाडला.
◼️ ध्वज खाली पडताच जनतेचे नैतिक धैर्य खचले आणि सर्वत्र एकच पळापळ सुरु झाली.
◼️ पाळणाऱ्या नागरिकांची महंमद बिन कासिम सैन्याने क्रूर लांडगेतोड केली.देवल बंदर व नगर पडले.
◼️ या अमानुष क्रौर्याने अरबांच्या सिंधमधील पुढील विजयाचा मार्ग खुला झाला.
◼️ पहिल्या प्रथम देवल नगरात मशीद बांधण्यात आली.

◼️यानंतर महंमद बिन कासिम नेरुन ( पाकिस्तानातील आजचे हैद्राबाद )  या शहरावर चालून गेला.
◼️ सिंधूच्या पात्रातील एका बेटाचा अधिकारी ' मोख ' महंमद बिन कासिम यास फितूर झाला आणि मोखाच्या सल्ल्यानुसार होड्यांचा पूल तयार करून महंमद बिन कासिम याने सिंधू नदी ओलांडली.
◼️ सिंधच्या पूर्व तीरावर दाहर प्रतिकारास तयार होता.
◼️ रणागांवर दाहर व त्याचा पुत्र जयसिंग यांनी अतुलनीय पराक्रम केला.
◼️ अरबांचा पराभव दिसत असतानाच दाहरला बाणाने छेदले.दाहरच्या विधवा राणीने शौर्याने राओरचा किल्ला रोखण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यापूर्वीच राणी सह किल्ल्यातील सर्व स्रीयांनी अब्रुरक्षणार्थ अग्निप्रवेश केला.

◼️ महंमद बिन कासिम ब्राम्हणाबादेवर चालून गेला.जयसिंग याने  अतिशय शौर्याने  ब्राम्हणाबाद सहा महिने लढवत ठेवले.
◼️ दुर्दैवाने फितुरीमुळे जयसिंग याला  ब्राम्हणाबाद  सोडून निघून जावे लागले.
◼️सिंध मधील शेवटचे प्रमुख शहर मुलतान दोन महिन्याच्या सक्त वेढ्यानंतर अखेरीस फितुरीनेच महंमद बिन कासिमच्या हाती लागले.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १२ मे २०२०, मंगळवार

🔴 प्राचीन भारत- अरबांचे आक्रमण
   क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.२७ ⚫ अरबांचे आक्रमण, भाग क्रमांक - १ ⚫


🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २७ 🛑

       ⚫ अरबांचे  आक्रमण, भाग क्रमांक - १ ⚫

===================================

🔴  सिंध प्रांतातील राजकीय स्थिती 🔴

◼️ राय साहसी दुसरा यांच्या मृत्यू नंतर त्यांची सत्ता चच नावाच्या ब्राम्हण मंत्र्याने बळकावली.
◼️ चच याने सिंध ची सत्ता काश्मीर पर्यंत पोहोचविली.
◼️ चच यांच्या मृत्यू नंतर त्यांचा भाऊ चंद्र गादीवर आला.मात्र चंद्रच्या मृत्यू नंतर चंद्राचा मुलगा आणि चचाच्या दोन मुलांमध्ये सिंधूच्या गादीसाठी यादवी युद्धाला सुरुवात झाली.
◼️ या यादवी युध्दात चचाच्या दोन मुलांचा , दाहर व दाहरसिंह यांचा विजय होऊन सिंधचे राज्य या दोन भावांमध्ये विभागल्या गेले.
◼️ इ. स.७०० च्या सुमारास दाहरसिंह यांच्या मृत्यू नंतर संपूर्ण सिंध राज्यावर दाहरची सत्ता प्रस्थापित झाली.

🔵 सिंध प्रांतावरील अरबांची  स्वारी पार्श्र्वभूमी 🔵

◼️ इ.स.६३२ पर्यंत अरबांनी अरबस्थानावर सत्ता प्रस्थापित केली.
◼️ इ. स.७०९ मध्ये अरबांनी आफ्रिकेचा संपूर्ण उत्तर किनारा जिंकून घेतला.
◼️ इ. स.७१३ मध्ये अरबांनी युरोपातील स्पेन देश जिंकला.
◼️ इ.स.६४२ मध्ये पार्शिया ( आजचा इराण ) अरबांच्या ताब्यात आला.
◼️ इ.स. ६३७ ते ६४३ पर्यंत ठाणा,भडोच व देवल बंदरावर अरबांनी आरमारी स्वाऱ्या केल्या,परंतु तेही प्रयत्न विफल ठरले.
◼️पश्चिमेकडून भारतावर स्वारी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन खुष्कीच्या  मार्गापैकी पहिला मार्ग म्हणजे खैबरमार्ग.
◼️ काबुलची खिंड ,काबुल व झाबूल या हिंदू राज्यांनी संरक्षित केली होती.म्हणून अरबांना खैबरखिंडीतून भारतावर आक्रमण करता आले नाही.
◼️ इ. स.६५० नंतर भारताच्या वायव्य सरहद्दीवर अरब धडका मारू लागले.
◼️ मकरान किनारपट्टी ,ती अरबांनी इ. स. ६८५ च्या सुमारास जिंकून सिंधवर स्वारी करण्याचा भुमार्ग आपल्या कब्जाखाली आणला.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १० मे २०२०, रविवार

🔴 प्राचीन भारत- अरबांचे आक्रमण
    क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.२६ 🧿 मालखेडचे राष्ट्रकुट घराणे 🧿



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २६ 🛑

       🧿 मालखेडचे राष्ट्रकुट घराणे 🧿

===================================

🔵 जगविख्यात वेरूळच्या कैलास लेण्यांची निर्मिती करणारे राष्ट्रकुट घराणे .
🔵डॉ.आळतेकर यांच्या मते, कर्नाटकातून येऊन लातूर या गावी वसले असावेत.

१) ♦️ दन्तिदुर्ग♦️ ( इ.स.७५४ ते ७५६)

🔘 राष्ट्रकुटांचा इतिहास हा दन्तिदुर्ग या राजापासून ज्ञात होतो.
🔘 दन्तिदुर्ग यांनी चालुक्य राजा किर्तीवर्मन दुसरा याचा निर्णायक पराभव करून चालुक्यांची सत्ता संपुष्टात आणली.
🔘 दन्तिदुर्ग याने कांची, केरळ,चोल,पांड्य,कोसल,
मालव, श्रीशैल ,येथील राजांचा पराभव केला.

२) ♦️ कृष्ण पहिला♦️ (इ. स.७५६ ते ७७२)

🔘 दन्तिदुर्ग हा निपुत्रिक वारल्याने ,त्याच्या पश्चात त्याचा चुलता कृष्ण पहिला हा राष्ट्रकुट गादीवर आला.
🔘 कृष्णराजाची अजरामर कामगिरी म्हणजे जगविख्यात वेरूळच्या कैलास लेण्यांची निर्मिती होय.

३) ♦️ गोविंद दुसरा♦️ ( इ. स.७७२ ते ७८०)

🔘 कृष्ण पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा गोविंद दुसरा हा गादीवर आला.
🔘 गोविंद दुसरा हा चैनी व विलासी असल्याने राज्यात अराजक माजले.
🔘 गोविंद दुसरा याचा धाकटा भाऊ, निरुपम ध्रुव याने गोविंद दुसरा याला पदच्युत केले व इ. स.७८० मध्ये राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली.

४) ♦️ ध्रुव♦️ ( इ. स.७८० ते ७९४)

🔘  ध्रुव राज्यकारभारासाठी लायक होता.
🔘  याने दक्षिण दिग्विजय केला.
🔘 इ. स.७९४ मध्ये आपला मुलगा गोविंद तिसरा,ह्याची  वारस म्हणून नियुक्ती करून राजत्याग केला.

४) ♦️ गोविंद तिसरा♦️ ( इ. स.७९४ ते ८१४)

🔘 राष्ट्रकुट घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा गोविंद तिसरा होय.
🔘 गोविंद तिसरा हा ध्रुव चा धाकटा मुलगा होता.
🔘 इ. स.७९९ मध्ये गोविंद तिसरा याने कांचीचा पल्लव राजा दन्तिवर्मन याला पराभूत करून कांचीत प्रवेश केला.
🔘 गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकुट सत्ता परमोच्च शिखरावर पोहोचली होती.
🔘 गोविंद तिसरा याने मयुरखंडी येथील आपली राजधानी हलवून मालखेड येथे नेली.

५) ♦️ अमोघवर्ष पहिला ♦️ ( इ. स.८१४ ते ८७८)

🔘  अमोघवर्ष पहिला हा गोविंद तिसरा यांचा मुलगा होता.
🔘 अमोघवर्ष पहिला याने आपला दरारा निर्माण केला.
🔘 अमोघवर्ष पहिला हा हिंदू धर्माचा अनुयायी होता.
🔘 अमोघवर्ष पहिला याने कानडी भाषेत ' कविराजमार्ग ' हा काव्यावरील टीकाग्रंथ लिहिला. तसेच ' प्रश्नोत्तर रत्नमालीका ' हा नीतिग्रंथ लिहिला.
🔘 इ. स.८७८ मध्ये अमोघवर्ष पहिला हा मृत्यू पावला.

अमोघवर्ष पहिला यांच्या मृत्यू नंतर......

६) ♦️कृष्ण दुसरा♦️ ( इ. स.८७८ ते ९१३)
७)♦️ इंद्र  तिसरा♦️ ( इ. स.९१५ ते ९१६)
८)♦️अमोघवर्ष दुसरा♦️
९)♦️ गोविंद चौथा♦️  ( इ. स. ९१८ ते ९३४)
१०)♦️अमोघवर्ष तिसरा♦️ ( इ. स.९३४ ते ९३९)
११)♦️कृष्ण तिसरा♦️ ( इ. स.९३९ ते ९६८)

या राष्ट्रकुट घराण्यातील राजांनी इ. स.९६८ पर्यंत राज्य केले.

🔴 कृष्ण तिसरा यांच्या मृत्यू नंतर सत्तेला उतरती कळा लागली.
🛑 राष्ट्रकुट राजा कर्क दुसरा गादीवर असताना चालुक्य राजा तैलप  याने आक्रमण करून राजा कर्क दुसरा याचा निर्णायक पराभव केला आणि इ.स.९७३ मध्ये राष्ट्रकुट घराण्याची सत्ता संपुष्टात आली.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  ९ मे २०२०, शनिवार

🔴 प्राचीन भारत-
    क्रमशः


प्राचीन भारत भाग क्र.२५ 🧿 मदुरेचे पांड्य घराणे 🧿



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २५ 🛑

       🧿 मदुरेचे पांड्य घराणे 🧿

===================================

🔘 संघम साहित्यात ज्याचे वर्णन येते असा प्राचीनतम राजवंश म्हणजे मदुरेचे पांड्य घराणे होय.

१) ♦️ अरिकेसरी मारवर्मन♦️

🔘 इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या उत्तरार्धात अरिकेसरी मारवर्मन  यांच्यापासून मदुरेचे पांड्य घराण्याची सुरुवात होते.
🔘 अरिकेसरी मारवर्मन यांचा चोल राजकन्येशी विवाह झाला होता.
🔘 अरिकेसरी मारवर्मन मुळात जैन धर्मीय होता.परंतु पत्नीच्या प्रभावामुळे  आणि शैव संत संबंधरच्या शिकवणीमूळे तो शैव पंथी बनला.

२) ♦️ मारवर्मन पहिला राजसिंह ♦️
(इ.स.७३५ ते ७६५)

🔘 मारवर्मन पहिला राजसिंह याने संपूर्ण कावेरी मुलुख जिंकला.

२) ♦️ जटिल परांतक वरगुण♦️
( इ.स.७६५ ते ८१५)

🔘 मारवर्मन पहिला राजसिंह यांच्यानंतर गादीवर आलेल्या वरगुणाने पांड्य साम्राज्याचा विस्तार केला.
🔘 वरगुणाने अनेक शिव आणि विष्णु मंदिरे बांधली.

४)♦️ श्रीमार श्रीवल्लभ♦️ (इ. स.८१५ ते ८६२)

🔘 श्रीमार श्रीवल्लभ याने सिलोन ( श्रीलंका ) वर हल्ला करून सिलोन लुटले.

५) ♦️ दुसरा वरगुण ♦️

🔘  दुसरा वरगुण याचा ,पल्लव राजा अपराजितवर्मन याने पराभव केला.

६) ♦️ परांतक वीरनारायण पांड्य♦️

🔘 दुसरा वरगुण याचा ,पल्लव राजा अपराजितवर्मन याने पराभव केल्यानंतर परांतक वीरनारायण पांड्य याने पांड्य सत्ता सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

७) ♦️ दुसरा मारवर्मन  राजसिंह♦️

🔘 परांतक वीरनारायण पांड्य यांच्यानंतर पांड्य गादीवर आलेल्या  दुसरा मारवर्मन  राजसिंह याचा परांतक चोल राजाने पांड्य राजधानी मदुरा जिंकली आणि पांड्य राज्याचा बराचसा प्रदेश चोलांच्या राज्यास जोडला.
🔘 चोल साम्राज्याचा अस्तानंतर द्वितीय पांड्य साम्राज्याची स्थापना झाली.
🔘 पांड्य व चोल संघर्ष कधीच थांबला नाही,आणि या संघर्षामुळेच चोल साम्राज्याचा अस्त झाला.

८) ♦️मारवर्मन सुंदर पांड्य♦️
(इ. स.१२१६ ते १२३८)

🔘 चोलांच्या विरोधात स्वतंत्र पांड्य साम्राज्याची स्थापना मारवर्मन सुंदर पांड्य याने इ. स.१२१६ मध्ये केली.
🔘 मारवर्मन सुंदर पांड्य याने चोलांचा, होयसळ व काकतीयांचा पराभव केला.

९) ♦️ जटावर्मन सुंदर पांड्य♦️

🔘 मारवर्मन सुंदर पांड्य यांच्यानंतर त्यांचा पुत्र  जटावर्मन सुंदर  हा पांड्य गादीवर आला.
🔘  जटावर्मन सुंदर  याने चोलांचा निर्णायक पराभव केला.
🔘  जटावर्मन सुंदर  याने इ. स.१२५४ -१२५६ मध्ये सिलोन ( श्रीलंका ) वर आक्रमण केले.
🔘 चोल साम्राज्य आता पांड्य साम्राज्यात विलीन झाले होते.

१०) ♦️ मारवर्मन कुलशेखर♦️
( इ.स.१२६८ ते १३१०)

🔘 पांड्य घराण्यातील शेवटचा महान राजा मारवर्मन कुलशेखर हा होता.
🔘 मारवर्मन कुलशेखर यांच्या आलेखामध्ये त्याने केरळ,सिलोन ( श्रीलंका ), चोल आणि होयसळ यांच्यावर विजय मिळविण्याचा उल्लेख येतो.

🛑  मारवर्मन कुलशेखर यांच्या मृत्यू नंतर पांड्य साम्राज्यात सुंदर पांड्य आणि वीर पांड्य या दोन सावत्र भावात यादवी युद्धाला सुरुवात.
🛑 पांड्य घराण्यातील या यादवीचा फायदा उठवून मलिक काफुर याने पांड्य साम्राज्य मनसोक्त लुटले.
🛑 शेवटी उलुघखानाने ( मुहम्मद बिन तुघलक) आपल्या दक्षिण दिग्विजयात पांड्य साम्राज्य स्वतच्या दिल्ली साम्राज्याला जोडून दिले आणि मदूरा येथे जलालुद्दिन अहसान याची प्रांताधिकारी म्हणून नेमणूक केली.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  ७ मे २०२०, गुरुवार.

🔴 प्राचीन भारत-
    क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र. २४ 🧿 तंजावरचे चोल घराणे 🧿



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २४ 🛑

       🧿 तंजावरचे चोल घराणे 🧿

===================================

१) ♦️ विजयालय♦️ ( इ.स.८५० ते ८७१)

🔘 विजयालय याने तंजावर या ठिकाणी नवी राजधानी स्थापन करू चोल सत्तेचा पाया रचला.
🔘 अत्यंत वैभवशाली चोल घराण्याला वैभव प्राप्त करून दिले.

२) ♦️ आदित्य पहिला♦️ ( इ. स.८७१ ते ९०७)

🔘 विजयालय यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा आदित्य पहिला हा चोल गादीवर आला.
🔘 आदित्य पहिला याने, पल्लव राजा अपराजितवर्मन याला इ. स.८९८ मध्ये ठार करून पल्लव सत्ता संपुष्टात आणली.
🔘 आदित्य पहिला हा शिवभक्त होता,त्याने  अनेक शिवमंदिरे बांधली.

३) ♦️ परांतक पहिला ♦️ ( इ.स.९०७ ते ९५३)

🔘 आदित्य पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा परांतक पहिला हा गादीवर आला.
🔘 परांतक पहिला यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा संघर्षात कृष्णाने इ. स.९४९ मध्ये तक्कोलमच्या लढाईत परांतक पहिला यांचा निर्णायक पराभव केला. यानंतर जवळपास तीस वर्षे चोल सत्ता निर्जीव झाली.

४)  ♦️ राजराज चोल♦️ ( इ. स.९८५ ते १०१४)

🔘 इ. स.९८५ मध्ये सुंदर चोलाचा मुलगा राजराज हा गादीवर आला.
🔘  राजराज चोल याने त्रिवेंद्रम येथे चेरांच्या आरमाराचा  पराभव केला.
🔘  राजराज चोल याने आपल्या बलिष्ठ नाविक सत्तेच्या जोरावर लखदीव ( लक्षद्वीप ) व मालदीव बेटे काबीज केले.
🔘  राजराज चोल याने सिलोन ( श्रीलंका ) वर अधिकार प्राप्त केला.सिलोन येथे एक शिवमंदिर बांधले.
🔘  राजराज चोल याने सुरू केलेली जमीन मोजणीची पद्धत आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या कार्यक्षम प्रशासन व्यवस्थेची साक्ष देतात.
🔘  राजराज चोल यांच्या कारकिर्दीत तंजावर येथील
' राजराजेश्वर मंदिर ' चोलांच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
🔘  राजराज चोल हा स्वतः शैव असूनही विष्णुची मंदिरे बांधली.

५) ♦️ राजेंद्र चोल पहिला♦️ ( इ. स.१०१४ ते १०४४)

🔘  राजराज चोल यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा  राजेंद्र चोल पहिला हा इ. स.१०१४ मध्ये गादीवर आला.
🔘 राजेंद्र चोल पहिला याने संपूर्ण सिलोन ( श्रीलंका ) जिंकले.
🔘 राजेंद्र चोल पहिला याने ' गंगाइकोंडचोलपुरम ' या नवीन राजधानीची स्थापना केली.
🔘 राजधानी जवळ सोळा मैल लांबीचा एक विस्तीर्ण तलाव ' चोलगंगम '  बांधला.
🔘 इ. स.१०२५ मध्ये राजेंद्र चोल पहिला याने आग्नेय आशियातील मलाया ( मलेशिया ) ,जावा,सुमात्रा असे एकूण शैलेंद्र साम्राज्य जिंकले. राजेंद्र चोल पहिला याचा सागरी दिग्विजय पूर्ण यशस्वी झाला.
🔘 चोल सत्ता मान्य करून शैलेंद्र राजाची सुटका करण्यात येऊन त्याचे राज्य त्याला वापस देण्यात आले.
🔘 राजेंद्र चोल पहिला याने अंदमान निकोबार बेटे आणि पेगु प्रांत जिंकला.
🔘 तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर इ.स.१०४४ मध्ये राजेंद्र चोल पहिला मृत्यू पावला.

६) ♦️ राजाधिराज पहिला♦️  ( इ. स.१०४४ ते १०५४)

🔘 राजेंद्र चोल पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा राजाधिराज पहिला याने पांड्य, सिंहल,केरळ येथील राजांची बंड, मोडून काढली.
🔘 चालुक्य राजा सोमेश्वर पहिला याच्याशी लढतांना कोप्पम युध्दात राजाधिराज पहिला इ. स.१०५४ मध्ये ठार झाला.

७) ♦️ दुसरा राजेंद्र♦️

८) ♦️ वीर राजेंद्र ♦️

🔘 दुसरा राजेंद्र आणि वीर राजेंद्र  यांनी चोल साम्राज्य अभंग राखले.

९) ♦️कुलोत्तुंग पहिला♦️ ( इ.स.१०७० ते ११२२)

🔘 पहिल्या राजेंद्रच्या मुलीचा अम्मंगयाम्बाचा आणि पूर्वेकडील वेंगीचा चालुक्य राजराज दुसरा यांचा पुत्र राजेंद्र चोल उर्फ कुलोत्तुंग पहिला याने इ. स.१०७० मध्ये चोल सत्ता बळकावली.
🔘 कुलोत्तुंग पहिला  हा उदारमतवादी ,प्रजाहितदक्ष राजा होता.
🔘 कुलोत्तुंग पहिला यांच्या काळात कांचीचे महत्त्व अतिशय वाढले.
🔘 कुलोत्तुंग पहिला यांच्या नंतरचे चोल राजे दुर्बल निघाले. इ. स.१२५० मध्ये चोल साम्राज्याचा  -हास  होऊन त्यातून पांड्य, होयसळ व काकतीय या सत्तांचा उदय झाला.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  ५ मे २०२०, मंगळवार

🔴 प्राचीन भारत-
    क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.२३ 🧿 कांचीचे पल्लव घराणे 🧿



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २३ 🛑

       🧿 कांचीचे पल्लव घराणे 🧿

==================================

१) ♦️ बाप्पादेव ♦️

🔘 इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात बाप्पादेव याने कांची येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली.

२) ♦️ विष्णुगोप♦️

🔘 इसवी सनाच्या चौथ्या शतकातील पल्लव राजा  विष्णुगोप याचा समुद्रगुप्ताने पराभव केला होता,हे अलाहाबादच्या ( आजचे प्रयागराज ) स्तंभलेख वरून समजते.

३) ♦️ सिंहविष्णू ♦️ इ.स. ५७५ ते ६००

🔘पल्लव घराण्यातील सिंहविष्णू यांच्या पासून सुसंगत माहिती मिळते.
🔘 यांनी कृष्णे पासून ते कावेरी पर्यंत राज्यविस्तार केला.

४) ♦️ महेंद्रवर्मन पहिला♦️ ( इ.स.६०० ते ६३०)

🔘 सिंहविष्णू नंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मन पहिला गादीवर आला.
🔘 एकसंघ दगडातून मंदिर खोदून काढण्याची पद्धत महेंद्रवर्मन पहिला यांनी सुरू केली.
🔘 यांच्या कारकिर्दीत त्रिचिरापल्ली,चिंगलपुट या ठिकाणी अनेक मंदिरे बांधली.
🔘 महेंद्रवर्मन पहिला यांनी ' मत्तविलास ' हे संस्कृत भाषेत प्रहसन व संगीतावर एक ग्रंथ लिहिला होता.
🔘 महेंद्रवर्मन पहिला हा सुरुवातीच्या काळात जैन धर्माचा पुरस्कर्ता होता,परंतु नंतरच्या काळात तो कट्टर शिवभक्त बनला.

५) ♦️नरसिंहवर्मन पहिला♦️ इ.स.६३० ते ६६८

🔘महेंद्रवर्मन पहिला यांच्या नंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र
नरसिंहवर्मन पहिला हा पल्लव गादीवर आला.हा पल्लव घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय.
🔘 नरसिंहवर्मन पहिला याने सिलोन ( आजची श्रीलंका ) वर नाविक हल्ले करून सिलोन वर ताबा मिळवला आणि सिलोन च्या गादीवर मानवर्मन याला बसविले.
🔘 नरसिंहवर्मन पहिला याने महाबलीपुरम हे नगर वसवून तेथे अनेक मंदिरे बांधली.

६) ♦️महेंद्रवर्मन दुसरा ♦️

🔘 नरसिंहवर्मन पहिला यांच्यानंतर पल्लव गादीवर आलेला त्यांचा मुलगा महेंद्रवर्मन दुसरा याने फक्त दोन वर्ष राज्य केले.

७)♦️ परमेश्वरवर्मन पहिला♦️  ( इ.स.६७० ते ६९५)

🔘 महेंद्रवर्मन दुसरा यांच्या नंतर पल्लव गादीवर त्यांचा मुलगा परमेश्वरवर्मन पहिला हा इ. स.६७० मध्ये गादीवर आला.
🔘 परमेश्वरवर्मन पहिला हा शिव उपासक होता.त्याने कांचीला शिव मंदिर बांधले.

८) ♦️ नरसिंहवर्मन दुसरा ♦️ (इ. स.६९५ ते ७२२)

🔘  परमेश्वरवर्मन पहिला यांच्यानंतर त्यांचा मुलगा  नरसिंहवर्मन दुसरा पल्लव घराण्यातील राजा झाला.
🔘  नरसिंहवर्मन दुसरा यांच्या काळात द्रविडी पद्धतीच्या शिल्पकलेला सुरुवात झाली.
🔘  नरसिंहवर्मन दुसरा यांनी बांधलेले कांचीचे
' कैलासनाथ मंदिर ' विख्यात आहे.कांचीला दक्षिण काशी देखील म्हणतात.
🔘 प्रसिद्ध संस्कृत ग्रंथकार दंडी  नरसिंहवर्मन दुसरा यांच्या दरबारी होता.

९) ♦️परमेश्वरवर्मन दुसरा ♦️

🔘 नरसिंहवर्मन दुसरा यांच्यानंतर पल्लव गादीवर त्यांचा मुलगा परमेश्वरवर्मन दुसरा हा आला.
🔘 इ. स.७३० मध्ये त्याच्या मृत्यू नंतर, त्याला संतती नसल्याने कांचीच्या राज्यात यादवी माजली.
🔘 शेवटी लोकांनी पल्लव घराण्यातील नंदीवर्मन  याला गादीवर बसविले.

१०) ♦️नंदीवर्मन  ♦️ (इ. स.७३० ते  ८००)

🔘 नंदीवर्मन दुसरा  हा गादीवर आला त्यावेळी त्याचे वय बारा वर्षाचे होते.त्याने सत्तर वर्षे राज्य केले.
🔘 इ. स.७५० मध्ये राष्ट्रकूट राजा दन्तिदुर्गाने नंदीवर्मन दुसरा यांच्यावर आक्रमण करून कांची जिंकले, परंतु दन्तिदुर्गाने आपल्या मुलीचा विवाह नंदीवर्मन दुसरा याच्याशी लावून देऊन तह केला.
🔘 नंदीवर्मन दुसरा हा शिवभक्त होता.कांची येथे त्याने मुक्तेश्वर मंदिर बांधले.

११) ♦️ दन्तिवर्मन ♦️

🔘 नंदीवर्मन दुसरा यांच्या नंतर त्यांचा मुलगा दन्तिवर्मन हा गादीवर बसला.

१२) ♦️नंदीवर्मन तिसरा ♦️

१३) ♦️ नृपतुंगवर्मन♦️

१४) ♦️ अपराजितवर्मन ♦️

🔘 इसवी सनाच्या नवव्या शतकाच्या शेवटी चोल राजा आदित्य पहिला याने अपराजितवर्मन यांचा निकाली पराभव केला आणि पल्लव सत्तेचा शेवट केला.

🧿 योग्यता🧿

🔘 पल्लव घराण्याच्या काळात दक्षिण भारतात वैदिक धर्माचा प्रसार झपाट्याने झाला.
🔘 पल्लवांनी ब्राम्हण व संस्कृत भाषेला राजाश्रय दिला.
🔘 भारतीय संस्कृतीचा आग्नेय आशियातील भागात प्रसार करण्यात पल्लवांचा सिंहांचा वाटा आहे.
🔘महाबलीपुरम येथील मंदिरे पल्लवांच्या राजवटीची व त्यांच्या काळातील कलेची अमर  स्मारके आहेत.
🔘 पल्लवांची राजधानी कांची विद्येचे माहेरघर व दक्षिणेची काशी म्हणून मान्यता पावले होते.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  ३ मे २०२०, रविवार

🔴 प्राचीन भारत-
    क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.२२ ⭕ चालुक्य घराणे ⭕



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २२🛑

       ⭕ चालुक्य घराणे ⭕

==================================

🧿 बदामीचे चालुक्य घराणे 🧿

१) ♦️ पुलकेशी पहिला ♦️  ( इ.स.५३५ ते ५६६)

🔘विजापूर जिल्ह्यातील बदामी ( प्राचीन वातापी )येथे पुलकेशी पहिला याने राजधानी वसविली.
🔘 याने अश्वमेध यज्ञ केला.

२) ♦️ कीर्तीवर्मन ♦️ ( इ.स.५६७ ते ५९७)

🔘 पुलकेशी पुत्र  कीर्तीवर्मन राजा झाला.
🔘 कीर्तीवर्मन  याने कोकण विजय केला.

३) ♦️ मंगलेश♦️

🔘  कीर्तीवर्मन यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा दुसरा पुलकेशी अल्पवयीन असल्याने  कीर्तीवर्मन यांचा भाऊ चालुक्य घराण्याचा राजा झाला.
🔘 यांच्या काळात बदामी येथे विष्णूचे प्रसिद्ध मंदिर,दगडात कोरण्यात आले.
🔘 अखेर  कीर्तीवर्मन याचा मुलगा दुसरा पुलकेशी वयात आल्यानंतर गादीसाठी चुलत्या- पुरण्यात ( दुसरा पुलकेशी व मंगलेश ) तुंबळ यादवी. त्यात मंगलेश ठार झाला. इसवी सन ६०९ मध्ये दुसरा पुलकेशी सत्तारूढ झाला.

४) ♦️ दुसरा पुलकेशी ♦️ ( इ. स.६०९ ते ६४२)

🔘 प्रदीर्घ काळ राज्य करणारा दुसरा पुलकेशी हा चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय.
🔘 दुसरा पुलकेशी हा सम्राट हर्षवर्धन यांचा समकालीन होता.
🔘 हा स्वतःला सत्याश्रय, परमेश्वर, पृथ्वीवल्लभ ,परममाहेश्वर ही बिरूद लावत असे.
🔘 याचे साम्राज्य दक्षिण गुजराथ ते थेट वेंगी आणि अरबी समुद्र पासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत  होते.
🔘 इसवी सन ६४२ मध्ये पल्लव राजपुत्र नरसिंहवर्मन यावे दुसरा पुलकेशी याला युध्दात ठार केले.

५)  ♦️ विक्रमादित्य पहिला♦️  ( इ. स.६५५ ते ६८०)

🔘 दुसरा पुलकेशी यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा  विक्रमादित्य पहिला हा चालुक्य घराण्याचा राजा झाला.

६) ♦️विनयादित्य♦️

🔘विक्रमादित्य पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा विनयदत्त व नातू विजयादत्त यांना सतत पल्लवांशी संघर्ष करावा लागला.

७) ♦️  विक्रमादित्य दुसरा ♦️ ( इ. स.७३३ ते ७४७)

🔘 विजयादत्त यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा विक्रमादित्य दुसरा हा चालुक्य घराण्याचा राजा झाला.
🔘 याने पल्लवांची राजधानी कांची लुटली. कांचीच्या कैलासनाथ मंदिरातील एका स्तंभावर विक्रमादित्य दुसरा याने तीनदा कांची जिंकल्याचा कानडी भाषेत लेख कोरविला.
🔘 विक्रमादित्य दुसरा  याने पांड्य व चोळ राजांना पराभूत करून भारताच्या दक्षिण तटावर विजयध्वज उभारला.

८) ♦️  कीर्तीवर्मन  दुसरा ♦️ ( इ. स.७४७ ते ७५३)

🔘  चालुक्याचा मांडलिक असलेला वेरूळचा राजा
' दन्तिदुर्ग ' याने इ. स ७५३ च्या सुमारास कीर्तीवर्मन  दुसरा याचा संपूर्ण पराभव करून बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. ह्या नंतर दक्षिणेत राष्ट्रकूट सत्ता प्रबळ झाली.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १ मे २०२०, शुक्रवार.

🔴 प्राचीन भारत-
    क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र. २१ 🔵आग्नेय आशियाशी संबंध अंतिम - भाग :६🔵



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २१🛑

 🔵आग्नेय आशियाशी संबंध अंतिम  - भाग :६🔵

==================================

🧿 जावा 🧿
( आजच्या इंडोनेशिया चे बेट )

🔘 इतिहासकार आर. सी.मुजुमदार यांच्या मते इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून भारतीय लोकांनी जावा मध्ये वसाहती करण्यास सुरुवात केली.
🔘 पंधराव्या शतकापर्यंत जावा येथे भारतीय संस्कृतीची भरभराट होती.
🔘 रामायणात जावा ( यवद्वीप बेटाचा उल्लेख येतो.
🔘 चीनच्या इतिहासात  चो-पो आणि हो-लो या दोन हिंदू राजांचा उल्लेख आढळतो.
 🔘 चिनी यात्रेकरू फहियान इ.स.४१८ च्या सुमारास जावा येथे गेला होता,तेंव्हा त्याला तिथे हिंदू धर्माचे वर्चस्व आढळले.

♦️राजा पूर्णवर्मन ♦️

🔘 पश्चिम जावा येथील बटानिया प्रांतात उपलब्ध झालेल्या चार संस्कृत शिलालेखावरून पूर्णवर्मन नावाचा राजा सहाव्या शतकात तिथे राज्य करीत असल्याची माहिती मिळते.
🔘 तरुम ही त्याची राजधानी होती.
🔘 राजा पूर्णवर्मन याने जावा येथे गोमती नावाचा कालवा खोदला होता.
🔘 चिनी स्तोत्रानुसार इसवी सनाच्या सहाव्या,सातव्या शतकात जावा येथे लहान मोठी दहा हिंदू राज्ये अस्तित्वात होती.
🔘 होलिंग ( कलिंग ) हे जावा येथील सर्वात महत्त्वाचे राज्य होते.होलिंग येथील रहिवासी भारतातील पूर्व किनाऱ्यावरील कलिंग प्रांतातून आलेले असावेत.

♦️राजा संजय ♦️

🔘 इसवी सनाच्या आठव्या आठव्या शतकाच्या प्रथमार्धात संजय नावाचा बलिष्ठ राजा राज्य करत होता.
🔘 मतराम ही त्याची राजधानी होती.
🔘 राजा संजयने जावा व बाली काबीज करून सुमात्रा व कंबोडिया राज्यांवर स्वाऱ्या केल्या.
🔘 राजा संजय यांच्या मृत्यूनंतर इ. स.७४२ - ५५ दरम्यान शैलेंद्र राजांनी मध्य जावा काबीज केला.
🔘 नवव्या शतकात राजा संजयच्या वंशजांनी आपली पूर्वीची मध्य जावा मधील राजधानी पुन्हा मिळविली.

♦️ राजा धर्मवंश♦️

🔘 संजय वंशातील राजा धर्मवंश याने शैलेंद्र साम्राज्यावर आक्रमण करून त्यांचा पराभव केला.
🔘 यांच्या कारकिर्दीत जावाची सत्ता आणि प्रतिष्ठा कल्पनातीत वाढली.

♦️ राजा अरलंगा ♦️

🔘 इ. स.१०३५ मध्ये राजा अरलंगा याने जावा ,शैलेंद्र यांच्या तावडीतून स्वतंत्र केले.
🔘 राजा अरलंगा याने जावा येथील शेतीत विविध सुधारणा केली.
🔘 इ. स.१०४२ मध्ये वयोवृध्द राजा अरलंगा याने राजत्याग करून चिंतन,वाचन व मनन यात आयुष्य व्यतीत केले.
🔘 इसवी सनाच्या तेराव्या शतकात जावा येथील हिंदू संस्कृतीचा हळूहळू लोप होऊन त्या नंतरच्या काळात जावात तांत्रिक बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला.
🔘 जावा येथील हिंदू राज्य सोळाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होते.

 🔴 सांस्कृतिक जावा 🔴

🔘 जावा येथील मंदिरांना चंडी असे म्हणतात.
🔘 इ. स.७५० ते ८५० या काळात बांधल्या गेलेले
' बोरोबुदूर मंदिर ' अद्वितीय कलाकौशल्यामूळे प्राचीन जगातील आश्चर्य मानल्या गेले आहे.या मंदिरातील प्रत्येक मुर्तीकाम शिल्पकाराने टोकाच्या संयमाने केलेले आहे.
🔘 सर जॉन मार्शल सार्थपणे म्हणतात की,
" भारतीय कला फक्त भारतामध्येच समजावून घेणे ,म्हणजे फक्त तिचा अर्धाच भाग समजण्यासारखे आहे..!"

_______________________________________

🧿 बाली 🧿
( आजच्या इंडोनेशिया चे बेट )

🔘आग्नेय आशियातील जूनी भारतीय संस्कृती आजमितीस फक्त बाली बेटावर टिकून आहे.
🔘 चिनी इतिहासानुसार इसवी सनाच्या सहाव्या शतकात कौंडिण्य नावाचे हिंदू राज्य बाली बेटावर राज्य करत होते.
🔘 इत्सिंगच्या लिखाणानुसार बाली बेटावर इसवी सनाच्या सातव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रसार झाला.
🔘 इसवी सनाच्या चौदाव्या शतकाच्या अखेरीस आग्नेय आशियातील बेटांवर मुस्लिमांचे प्राबल्य वाढू लागले.
🔘 पंधराव्या शतकाच्या अखेरीस धर्मरक्षणार्थ हिंदू राजाने आपल्या लोकांच्या समवेत बाली बेटावर आश्रय घेतला. त्यामुळे बाली बेटावर हिंदू धर्म सुरक्षित राहिला.
🔘 आजही बाली बेटावर विष्णु, शिव ,कृष्ण,गणेश,इंद्र, नंदी या देवतांची उपासना केली जाते.
🔘 भारतीय संस्कृत ग्रंथांची बालीतील स्थानिक भाषेत भाषांतरे झाली आहेत.
🔘 रामायण व महाभारत या ग्रंथांचे वाचन व अध्ययन आजही बालीत होते.
🔘 बाली बेटावर दुर्गा व काली यांच्या मूर्ती व मंदिरे आढळतात.

_________________________________________

🧿 बोर्निओ 🧿

( आजच्या इंडोनेशिया चे बेट )

🔘महाकाम नदीवरील ' मुआराकामन ' या प्राचीन बंदरात मिळालेल्या संस्कृत आलेखावरून पूर्व बोर्निओ  येथे हिंदू वसाहती होत्या.
🔘  बोर्निओ  येथील भारतीय वसाहती इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या अखेरीस स्थापन झाल्या.
🔘  बोर्निओ  येथील एका गुहेत हिंदू व बौद्ध देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत.
🔘इसवी सनाच्या बाराव्या शतकात  बोर्निओ  हे शैलेंद्र साम्राज्याचा भाग होते.

==================================

वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  ३० एप्रिल २०२०, गुरुवार

🔴 आग्नेय आशियाशी संबंध- समाप्त.

🔴 आणि प्राचीन भारत-
      क्रमशः

प्राचीन भारत भाग क्र.२० 🔵आग्नेय आशियाशी संबंध - भाग :५🔵



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २०🛑

🔵आग्नेय आशियाशी संबंध - भाग :५🔵

==================================

🧿 सुमात्रा 🧿

( आजच्या इंडोनेशिया चे बेट )

♦️ श्रीविजय घराणे ♦️

🔘 इंडो चायना या सुवर्ण द्वीपातील सुमात्रा हे सर्वात मोठे बेट होय.प्राचीन काळी त्याचे नाव श्रीविजय होते.
🔘 इसवी सनाच्या चौथ्या शतकात श्रीविजय या हिंदू राज्याची सुमात्रा मध्ये स्थापना झाली.
🔘 चिनी प्रवासी इत्सिंगच्या म्हणण्यानुसार श्रीविजय याची आरमारी शक्ती प्रशंसनीय होती.
🔘 इ. स.६७५ ते ७७५ या शतकातील श्रीविजयच्या राजांनी संपूर्ण मलाया ( मलेशिया ) द्विपकल्पावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली.
🔘 इ. स.६८४ मध्ये सुमात्रावर श्रीजयनाग हा बौद्ध धर्मीय राजा राज्य करत होता.
🔘 नालंदा विद्यापीठाचा कुलगुरू धर्मपाल हाही सातव्या शतकात सूमात्रात भेट देऊन गेला.
🔘 शैलेंद्र घराण्याने श्रीविजय सत्ता संपुष्टात आणली.

♦️ शैलेंद्र घराणे ♦️

🔘 इसवी सनाच्या आठव्या शतकात सुमात्रा येथे शैलेंद्र साम्राज्याचा उदय झाला.
🔘 शैलेंद्र राजे महायान पंथीय बौद्ध राजे होते.
🔘 शैलेंद्र राजांनी नागापट्टन,मेघापट्टण, नालंदा येथे विहार बांधले.
🔘 पाल राजा धर्मपाल  याचा पुत्र देवपाल यांच्या शिलालेखात उल्लेख येतो.
🔘 शैलेंद्र साम्राज्य आग्नेय आशियातील जावा,सुमात्रा,मलाया , बाली एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर पसरले.
🔘 इ. स.१०२५ मध्ये राजेंद्र चोलाच्या आरमाराने शैलेंद्र साम्राज्यावर चढाई केली.संपूर्ण शैलेंद्र साम्राज्यावर राजा चोल यांची सत्ता प्रस्थापित झाली.

==================================

वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  २९ एप्रिल २०२०, बुधवार.

🔴 आग्नेय आशियाशी संबंध-
क्रमशः