** चिंतन **
आरशांनो..!
=======================================
टीचलेल्या..आरशानो..
स्वच्छ ,सुंदर आरशांनो..
धूसर आरशांनो..
पुसटश्या आरशांनो..
फक्त शोभिवंत आरशांनो..
फक्त दुसऱ्याचे रुप दाखविणाऱ्या आरशांनो..
रूप बदलणाऱ्या आरशांनो..
व्यसनांच्या आहारी गेलेल्या आरशांनो..
धर्मनिरपेक्षतेचे ढोंगी मुखवटे घेऊन हिंडणाऱ्या आरशांनो..
पंचवार्षिक सोहळ्याच्या तोंडावर विविध उपक्रमात सहभागी होणाऱ्या आरशांनो..
शिक्षणाचे पवित्र कार्य सोडून इतर उपद्व्याप करणाऱ्या ढोंगी आरशांनो..
रुग्णांच्या भावनेचा आर्थिक बाजार मांडणाऱ्या आरशांनो..
माझी जन्मभूमी पालखेड येथे मी इ.दहावीत असताना, दहावीत पहिला आल्यानंतर सुध्दा, जाहीर केलेले बक्षीस , केवळ माझ्या जाती मुळे नाकारणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरशांनो..!
( या विषयावर मी एक स्वतंत्र लेख या पूर्वीच लिहिलेला आहे )
धर्मांध विकृत आरशांनो..
एकांगी पुरोगामी आरशांनो..
सत्ता मिळाली म्हणजे ढोंगी रूप जगाला दाखवून स्वतचे खिशे भरून घेणाऱ्या आरशांनो..
एकंदरीत सगळ्याच आरशांनो..!
तुम्ही माझ्या आयुष्याचे पथदर्शक होता,आहेत अन् राहशाल सुध्दा..!
फक्त तुमचे प्रत्येकाचे रुप दाखविणे भिन्न..भिन्न होते.. अन् आहे..!
मला अशी सर्व आरसे फार फार आवडतात..!
का....?
खालील सुवचनाच्या निमित्ताने..!
" काही माणसं,आपल्या आयुष्यात आरशा सारखी येतात, त्यात पाहून आपल्याला आपल्या काही सवयी बदलता येतील..! "
वंदे मातरम्..!
सर्व आरशांवर प्रेम करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
दिनांक: २६ जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा