** मला प्रवासात भेटलेली माणसं..! **
" औंदा कसं होईल रं भाऊ...? "
________________________________________________
खरंच फार फार बिकट परिस्थिती आहे यावर्षी निदान माझ्या औरंगाबाद जिल्ह्यात तरी..! इतरत्र कशी असेल..काय माहीत..!
आला दिवस तसाच चालला आहे..! माझा व माझ्या बऱ्याच फेसबुक मित्रांचा मूळ पिंड खेड्यातील असल्याने खूप खूप वाईट वाटते..! कारण सध्याच्या अती भयानक परिस्थिती विषयीची दाहकता खूप जवळची वाटते..! याचा अर्थ शहरातील मित्रांना आजच्या बिकट परिस्थिती बद्दल वाईट वाटत नसेल असे अजिबात नाही. पण माझ्या सारख्या अनेकांचे बालपण ज्या खेड्यात ,शेतकऱ्यांच्या सहवासात,शेतकरी मित्रांच्या सहवासात गेले,त्यामुळं आजच्या दुष्काळजन्य परिस्थिती बद्दलची दाहकता खूप जवळची वाटते. बऱ्याच विषयांवर व्यक्त व्हावंसं वाटतं पण..माझे विचार स्तब्ध होऊन जातात दररोज सकाळ होऊन संध्याकाळ तशीच कोरडी जाते..! अन् पुन्हा उगवते...दात इचकुन..पुन्हा त्याच कोरड्या वाकुल्या दाखवत..!
कसं होणार...?
माझी नोकरी ग्रामीण भागात आहे..दररोजची तीच ती दाहकता पहावल्या जात नाही..!आज दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजी शाळेतून घरी येताना बस मध्ये माझ्या शेजारी एक खूप वयस्कर गृहस्थ बसले होते. काळा सावळा वर्ण,दाढी काहीशी वाढलेली,डोक्यावरील टोपी मळकटलेली..! नंबरच्या चष्म्याच्या काचा घासून घासून धूसर झालेल्या..!डोळे पार ओलसर ..त्यात एक प्रकारची .........
" आता कसं होईल..?" या विचाराने त्रस्त असलेली भेदरलेली नजर मला सहज लक्षात आली..! मला राहवले नाही अन् मी विचारले बाबांना...
मी- " बाबा,कुठं चाललात..?"
माझ्या कडे अनोळखी नजरेनं पाहत बाबांनी उत्तर दिलं..
" भाऊ,मी माझ्या पोरा कडं चाल्लो ..!"
मी- " काय करतो तुमचा पोरगा..?"
" कंपनीत कामाला हाये.."
मी माझा रुमाल काढला अन् माझा घाम पुसु लागलो ,इतक्यात बाबा मला म्हणाले..
" आरं भाऊ, नुसती गरमस हाये.. तो काही पडाना..! वावरात कपाशी लावली होती..पण पाऊसच नाय...कशी वाढल ती कपाशी..? संमदी कपाशी जळुन गेली भाऊ..काय करतो..नशिबाचे भोग..! औंदा कसं होईल रं भाऊ..?
बाबाचे हे उद्गार ऐकून मी खूप अस्वस्थ झालो होतो.एका म्हाताऱ्या माणसाची ही वेदना माझ्या मनाला चीर चीर..करून गेली..!
मी- " बाबा, तुमच्या काळात लई पाऊस पडायचा, हाय ना...!"
" हाव भाऊ, लई महामुर पाऊस पडायचा..लई पिकायच... संमदीकड चांगलं होतं..!
मी- " बाबा, आता काम्हून पाऊस पडत नसेल बर..?"
" आरं, भाऊ..लोकांच्या नीतिमत्ता खराब झाल्या..काय त्या पावसाला नाव ठेवून उपयोग..?"
मी- " बाबा, जंगलं पण कमी झालेच की..!"
आरं, जंगलं कमी झाल्यात पण..माणसं कोणती ढंगावर राहिली..?
मी- " कसं काय बाबा..?"
हे पहाय..आमच्या काळी ,आम्ही लई गरीब होतो पण..आम्हाला काही यसन नव्हतं..! या यासनामुळ शेतात काही पिकलं की,लगीच पैसा वाया जातू..! कष्टाची कमाई अशी वाया गेली की लई वाईट वाटत रे..भाऊ..!
औरंगाबाद बस स्थानक जवळ येऊ लागलं होतं.बाबा लगेच उठले.मी म्हणालाे..
" बाबा,थांबा अजुन..! बस स्टँड आले की, मी सांगतो तुम्हाला..!"
बाबा खाली बसले.बस, बस स्टॅण्ड वर थांबली.मी व ते वयोवृध्द बाबा बस स्टँड समोरील एकाच रिक्षा स्टँडवर आलो.मी रिक्षात बसलो.त्या वयोवृध्द बाबांना देखील माझ्याच मार्गाकडे यायचे होते. रिक्षावाला बाबांना म्हणाला...
" भाडे ,३० ₹ आहे..!"
बाबा-" मी २० ₹ च देईन..! तुला पटलं तर घे...नायतर जा निघून..!"
रिक्षावाल्यानं बरीच विनवणी केली पण बाबा काही त्यांच्या २० ₹ वरून मागे हटायला अजिबात तयार नव्हते.वास्तविक बाबांना जिथं जायचं होत तिथलं रिक्षा भाडे खरोखर ३०₹ होते..पण बाबा काही ऐकेना..!
मी त्या रिक्षावाल्याला बाजूला घेऊन म्हणालो..
" दादा, जाऊ द्या..२०₹ तर..२०₹ घ्या..! वाटल्यास वरचे १० ₹ मी देतो..! या जुन्या माणसांनी खूप कष्टांनी, पोटाला चिमटा घेऊन पैसा कमावलेला असतो,त्यामुळं ही माणसं सहसा पैसा सोडत नाही..!"
हे ऐकुन तो नेहमीचा परिचयाचा रिक्षावाला तयार झाला अन् आम्ही निघालो..!
रिक्षात बसल्यावर माझ्या मनात एकच विचार येत होता..की, जी वयस्कर माणसं असतात त्यांनी खूप कष्टाने व पोटाला चिमटा घेऊन पैसा कमावलेला असतो, त्यामुळं ही माणसं त्यांच्या गाठीशी असणारा पैसा सहसा सोडायला तयार होत नाही..अन् माझ्या पिढीतील उथळ मनोवृत्तीची तरुण माणसं या वयोवृद्धांना " कंजूस " म्हणून हेटाळणी करतो.आज मी काय किंवा माझी समकालीन मित्र मंडळी काय..आमच्या मुलांना तेवढे पैशाचे महत्त्व नाही..जेवढे आमच्या पिढीला आहे..! माझी अन् माझ्या पिढीतील माझ्या मित्रांची मुलं आम्हालाही कदाचित " कंजूस " नक्कीच म्हणतील यात तिळमात्र शंका नाही..! माणसाच्या आयुष्यात पैशाचे असेच अधःपतन होत राहील का..?
याला जबाबदार कोण असणार..?
हा प्रश्न मनात घेऊनच मी माझ्या थांब्यावर उतरलो.बाबांचा निरोप घेतला अन् म्हणालो..
" येऊ का बाबा..!"
बाबांनी माझ्या काहीश्या पांढऱ्या होत चाललेल्या दाढीच्या केसांवर हात लावला अन् म्हणाले..
" ये ,भाऊ..दम्मानं जाय बरं का..!"
हा...बाबा..! तुम्ही पण....जपून जा..!"
माझ्या घराकडे जात असताना माझ्याही मनात विचार येत होता..
" खरंच औंदा कसं होईल..?"
वंदे मातरम्...!
लेखक व एक प्रवासी : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
वरील प्रसंग घडलेला दिनांक: १५ सप्टेंबर २०१८
स्थळ: फुलंब्री ते औरंगाबाद बस.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा