सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

" मनाची घालमेल..! "

** चिंतन **

" मनाची घालमेल..! "
________________________________________________

हल्ली  ब-याच बंगलेवाल्यांच्या  घरी गेल की,तो बंगलेवाला आपल्याशी प्रथमत:अनौपचारिकपणे बोलण्याऐवजी ...
"या,तूम्हाला घर दाखवितो "असेच बोलतो.

माणसातील माणसाशी बोलण्याचा दर्जा दार्शनिक बाबींवरून ठरवल्या जाऊ लागला आहे. वरील अनूभव मला खूप वेळा आला आहे.जसे,दागिणे घातलेल्या एखाद्या स्रीला तिच्या दागिण्यांची कूणीतरी स्तूती करावी हीच भडक अपेक्षा असते. त्या दार्शनिक दागिन्यांचे कुणी कौतुक नाही केले तर त्या महिलेला अस्वस्थ वाटायला लागते..!  तिच्या शारीरिक देहबोलीतून ती अस्वस्थता सहजपणे दिसून येते..! एकदा का त्या खूप दागिन्यांचे कौतुक करणारी कुणी भेटली की , मग कसं त्या महिलेचे मानसिक सौदर्य खुलून दिसते..! याचे देखील निरीक्षण मी बऱ्याचदा बऱ्याच लग्नात दूर उभा राहून  केलेले आहे..!

नवीन बंगला असो किंवा जुने घर आपण अशा माणसांच्या घरी गेल्यावर असाच अनुभव येतो.आपण गेल्या..गेल्या..
" या तुम्हाला घर दाखवतो..!"असे बऱ्याचदा होते.
मग सुरू होतो प्रवास...एका निर्जीव वास्तूला, एखाद्या मुलीला पाहायला आलेल्या पाहुण्यांना जसे दाखवतात तसाच प्रकार..!
फक्त येथील संवाद वेगळे असतात.. बस इतकंच..! आपण जर त्या वास्तूतील वस्तूंची स्तुती नाही केली तर..त्या वास्तूच्या मालकाच्या चेहऱ्यावरील भाव अगदी...वरील उल्लेख केलेल्या दागिनेधारी महिलेच्या चेहऱ्यावरील भाव सारखेच असतात..!
येथे फक्त दार्शनिक प्रतीके बदलली...मात्र..त्या दार्शनिक प्रतिकांचे कौतुक न केल्याने होणारी मनाची घालमेल..अगदी...सारखीच असते..! याला काही अपवाद असतील कदाचित..!

ती अपेक्षा मग बंगलेवाल्यांची असो किंवा दागिणासंप्पन्न स्रीची एकदा पूर्ण झाली की उरतो केवळ बोलण्यातील औपचारिकपणा...!

भावनिक ओलेपणा नसतो नंतरच्या गप्पात...!माणूस माणसाला भेटायला जातो परंतू भेट होती निर्जीव प्रतिकांशी...! घर अवश्य दाखवावे;परंतू अनौपचारिक बोलणे,खूशाली नंतर,विश्रांती नंतर...!जेणेकरून अगोदर माणसांची आत्मियतेने भेट होईल मग नंतर निर्जीव प्रतिकांची...! अगदी दागिन्यांच्या दाखवण्या बाबतीत सुध्दा..!

ता.क.: पहिल्यांदा भौतिक सुविधांच्या दाखविण्याच्या नादात..भावनिक ओलावा कमी पडू लागला आहे..!

वंदे मातरम्...!!

असा अनुभव आलेला व अशांचा स्वतः वर आत्मचिंतन करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: ९ सप्टेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा