🛑 प्राचीन भारत, शेवटचा भाग क्रमांक ३४ 🛑
🔵 देवगिरीचे यादव 🔵
===================================
🔶देवगिरीचे यादव, आर्षकालीन भगवान श्री कृष्ण यांच्या यदु वंशाचे वंशज आहोत,असा दावा करतात.
🔶 इतिहास काळात यदु वंशाचे दोन राजघराणी आढळतात; एक - सेऊन देशाचे यादव ( देवगिरीच्या सभोवतालचा प्रदेश ) आणि दुसरे - द्वारसमुद्रचे होयसळ ( हळेबीड - म्हैसूर ).
१) ♦️ भिल्लम ( इ. स.११८५ - ११९३ )♦️
🔘 भिल्लमाने देवगिरीला स्वतः ची राजधानी वसविली आणि इथून पुढे हे राजघराणे देवगिरीचे यादव म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
🔘 भिल्लमाने चोल राजा कुलोत्तुंग तिसरा याचाही पराभव केला.उत्तरेकडील अनेक राज्यांवर विजय मिळविल्याचे श्रेय भिल्लम याला देण्यात येते.
२) ♦️जैत्रपाल उर्फ जैतुगी ♦️
( इ. स.११९३ - १२०० )
🔘 भिल्लम यांच्या नंतर त्यांचा पुत्र जैत्रपाल उर्फ जैतुगी हा देवगिरीच्या गादीवर आला.
🔘 हा असाधारण योद्धा होता.याने दक्षिणेतील चोल, गंग आणि काकतीय राजांशी यशस्वी लढाया दिल्यात.
३) ♦️ सिंघण ( इ. स.१२०० - १२४७ )♦️
🔘 जैत्रपाल उर्फ जैतुगी याचा पुत्र सिंघण हा इ. स.१२०० मध्ये देवगिरीच्या गादीवर आला.
🔘 सिंघण हा यादव घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय.
🔘 सिंघण याने लाट प्रदेश ( गुजराथ ) यादव राज्यास जोडला.याने उत्तर भारतात माळव्याचा परमार,उत्तरेकडील मुस्लिम शासक, छत्तीसगड आणि त्रिपुरीचे कलचुरी यांचा पराभव केला.
🔘 सिंघण याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत देवगिरीच्या राज्याचे रूपांतर साम्राज्यात होऊन संपूर्ण दख्खन मध्ये पसरले.शिवाय कृष्णा नदीच्या पलीकडील दक्षिण भारतातील काही प्रदेश देखील यादव साम्राज्यात समावेश होत होता.
४) ♦️ कृष्ण ( इ. स.१२४७ - १२६०)♦️
🔘 यादव राजा सिंघण याच्या नातूचे नाव कृष्ण होते.
🔘 आपले पितृदत्त साम्राज्य याने अत्यंत चोखपणे सांभाळले.
५) ♦️ महादेव ( इ. स.१२६० - १२७१)♦️
🔘 सिंघण यांचा दुसरा नातू महादेव देवगिरी यादव घराण्यातील गादीवर आला.
🔘 महादेव याने देखील आपले पितृदत्त साम्राज्य याने अत्यंत चोखपणे सांभाळले. महादेव याने उत्तरेत व दक्षिणेत यादव साम्राज्याची प्रतिष्ठा व दरारा कायम राखला.
🔘 सुप्रसिध्द हेमाद्री पंडित महादेवाचा मंत्री होता.
६) ♦️ रामचंद्रदेव ♦️
🔘 महादेव यांच्या नंतर देवगिरी गादीवर कृष्णाचा मुलगा रामचंद्रदेव हा गादीवर आला.
🔘 रामचंद्रदेव हा यादव घराण्यातील शेवटचा स्वतंत्र राजा होय.
🔘 इ. स.१२९६ मध्ये अलाउद्दीन खिलजी देवगिरीच्या यादव राज्यावर कोसळला.
🔘 अलाउद्दीन खिलजी याने देवगिरीच्या पायथ्याशी असलेले शहर लुटले.यानंतर रामचंद्रदेव याने तहाची बोलणी सुरू केली.याच सुमारास रामचंद्रदेव यांचा मुलगा सिंघणदेव दक्षिणेतील मोहिमेवरून परतल्यामूळे तहाची बोलणी फिसकटली.
🔘 सिंघणदेव याने अलाउद्दीन खिलजी बरोबर अटीतटीचे युद्ध केले,पण त्यात तो पराभूत झाला.रामचंद्रदेव याला फार मोठी खंडणी देऊन आपल्या राज्याचा बचाव करावा लागला.
🔘 रामचंद्रदेव याने इ. स.१३०३ मध्ये अलाउद्दीन खिलजी यास खंडणी देण्याचे थांबविले.
🔘 देवगिरीच्या या आगळिकीमूळे संतप्त झालेल्या अलाउद्दीन खिलजीने मलिक काफूर हजार दिनारची इ.स.१३०७ मध्ये ससैन्य देवगिरी राज्यावर रवानगी केली.
🔘 रामचंद्रदेवास त्याच्या कुटुंबासह युद्धकैदी बनवून मलिक काफूर दिल्लीस घेऊन आला.
🔘 रामचंद्रदेव यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा सिंघणदेव याने अलाउद्दीन खिलजीला वार्षिक खंडणी देणे बंद केले.त्यामुळे अलाउद्दीन खिलजी याने मलिक काफूर याला इ. स.१३१३ मध्ये देवगिरी राज्यावर पाठविले.या युध्दात सिंघणदेव पराभूत झाला होऊन मारला गेला.
🔘 सिंघणदेव यांच्या मृत्यू नंतर रामचंद्रदेव यांचा जावई हरपाळदेव यास मलिक काफूरने राजपद बहाल केले.हरपाळदेव याने दिल्लीच्या मुस्लिम सत्तेच्या विरुद्ध बंडाचे निशाण रोवले.हरपाळदेव यास बंदिवान करण्यात येऊन कठोर शिक्षा दिली.यानंतर दख्खनचा प्रदेश दिल्लीच्या मुस्लिम सत्तेचा एक प्रांत बनला.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: २० मे २०२०, बुधवार
🔴 " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य. या पुस्तकातील ठळक मुद्द्यांवर आधारीत अ.क्र. १ ते ३४ ही अनुलेखन लेखमाला समाप्त..!🙏😊🌹

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा