🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २८ 🛑
⚫ अरबांचे आक्रमण, भाग क्रमांक -२ ⚫
===================================
🔴 सिंध प्रांतावर अरबांचे आक्रमण 🔴
◼️ इ. स.६५० नंतर अरब भारताच्या वायव्य सरहद्दीवर आणि पश्चिम किनारपट्टीवर सातत्याने धडका देत होते.
◼️मकरान किनारपट्टी ताब्यात आल्याने सिंध प्रांतावर आक्रमण करण्यासाठी अरबांना केवळ निमित्त हवे होते.
◼️ यावेळी इराकचा सुभेदार हज्जाज होता.
◼️ सिंध स्वारीचे नेतृत्व हज्जाजचा पुतण्या व जावई
' महंमद बिन कासिम ' याच्यावर सोपविण्यात आले.
◼️ इ. स.७१२ मध्ये महंमद बिन कासिमचे प्रचंड सैन्य मकरानच्या खुष्कीच्या मार्गाने व समुद्रमार्गे देवल बंदराला भिडले.
◼️ सिंध प्रांतात खऱ्या अर्थानं अजूनही दाहर राजाची सत्ता स्थिर झालेली नव्हती.
◼️ देवल बंदराच्या व शहराच्या संरक्षणाची पुरेशी व्यवस्था न करताच सिंधच्या पश्चिम भागातून दाहर सिंधू नदीच्या पूर्व भागात येऊन राहिला.
◼️ सिंधूच्या पूर्व भागात दाहर अरबांच्या आक्रमणास तोंड देण्याच्या दृष्टीने तयारीला लागला.
◼️ देवल मधील नागरिकांची अशी भाबडी समजूत होती की, जो पर्यंत देवल नगरातील मंदिराच्या कळसावरील उंच ध्वज फडकत आहे तो पर्यंत आपल्याला धोका नाही.
◼️ महंमद बिन कासिम याला हे कळताच त्याने ह्या अंधश्रद्धेचा अचूक फायदा उठविला.
◼️ महंमद बिन कासिम याने कळसासकट ध्वज खाली पाडला.
◼️ ध्वज खाली पडताच जनतेचे नैतिक धैर्य खचले आणि सर्वत्र एकच पळापळ सुरु झाली.
◼️ पाळणाऱ्या नागरिकांची महंमद बिन कासिम सैन्याने क्रूर लांडगेतोड केली.देवल बंदर व नगर पडले.
◼️ या अमानुष क्रौर्याने अरबांच्या सिंधमधील पुढील विजयाचा मार्ग खुला झाला.
◼️ पहिल्या प्रथम देवल नगरात मशीद बांधण्यात आली.
◼️यानंतर महंमद बिन कासिम नेरुन ( पाकिस्तानातील आजचे हैद्राबाद ) या शहरावर चालून गेला.
◼️ सिंधूच्या पात्रातील एका बेटाचा अधिकारी ' मोख ' महंमद बिन कासिम यास फितूर झाला आणि मोखाच्या सल्ल्यानुसार होड्यांचा पूल तयार करून महंमद बिन कासिम याने सिंधू नदी ओलांडली.
◼️ सिंधच्या पूर्व तीरावर दाहर प्रतिकारास तयार होता.
◼️ रणागांवर दाहर व त्याचा पुत्र जयसिंग यांनी अतुलनीय पराक्रम केला.
◼️ अरबांचा पराभव दिसत असतानाच दाहरला बाणाने छेदले.दाहरच्या विधवा राणीने शौर्याने राओरचा किल्ला रोखण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यापूर्वीच राणी सह किल्ल्यातील सर्व स्रीयांनी अब्रुरक्षणार्थ अग्निप्रवेश केला.
◼️ महंमद बिन कासिम ब्राम्हणाबादेवर चालून गेला.जयसिंग याने अतिशय शौर्याने ब्राम्हणाबाद सहा महिने लढवत ठेवले.
◼️ दुर्दैवाने फितुरीमुळे जयसिंग याला ब्राम्हणाबाद सोडून निघून जावे लागले.
◼️सिंध मधील शेवटचे प्रमुख शहर मुलतान दोन महिन्याच्या सक्त वेढ्यानंतर अखेरीस फितुरीनेच महंमद बिन कासिमच्या हाती लागले.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: १२ मे २०२०, मंगळवार
🔴 प्राचीन भारत- अरबांचे आक्रमण
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा