सोमवार, ४ मे, २०२०

" करड्या आवाजाचा निष्णात वक्ता, राजू भाऊ..! "

मला प्रवासात भेटलेली माणसं

" करड्या आवाजाचा निष्णात वक्ता, राजू भाऊ..! "

======================================

आज दिनांक ५ मे २०१७ रोजी,राजूभाऊ हिवाळे सर( माझ्या उजवीकडे) व सनदी अधिकारी श्री.खोमणे साहेब (जिल्हाधिकारी कार्यालय-नांदेड)यांची माझ्या लासूर स्टेशन येथील घरी निव्वळ मैत्रीपूर्ण भेट झाली...!

ऐन भरदूपारी उभयतांची झालेली भेट काळ्याशार थंडगार माठातील पाण्याच्या शिडकाव्याचा शितलमय आनंद देऊन गेली...!

राजूभाऊ निष्णात वक्ता..! त्यातल्या त्यात निवडणूक आयोगाच्या कामात महातरबेज माणूस..! प्रत्येक निवडणूकीच्या वेळी प्रशिक्षणार्थ्याला हिवाळे सरांचे मार्गदर्शन म्हणजे जीवंत निवडणूक आयोगाचे पूस्तकच म्हणा...! इतक्या साध्या-सोप्या भाषेत सर्व कामे समजाऊन सांगण्यात राजेशभाऊंचा कमालीचा हातखंडा आहे..! परंतू अलिकडे काही वर्षापासून राजूभाऊंची बदली झाल्यामूळे गंगापूरमध्ये मार्गदर्शन झाले नाही.एक प्रकारे निवडणूक मार्गदर्शन बैठक पोरकी झाल्यासारखी वाटते..!

आमची औपचारिक प्रारंभ झालेली बैठक कधी अनौपचारिक झाली कळलेच नाही..! चांगला तास-दिड तास निव्वळ गप्पांचा फड रंगला..! गप्पांमध्ये पाठ्यपूस्तकातील गणित व इंग्रजी सोडून सर्व विषय होते..! उर्वरित विषय होते म्हणजे पाठ्यपूस्तरातील अनुक्रमणिकानुसार नाही बर का...!☺ फक्त संदर्भासाठी उर्वरित विषय होते..!अश्या अनौपचारिक गप्पाचा फड निदान काही दिवसांसाठी तरी सदैव आठवणीत घोंगावत राहतो..! मात्र मनपटलावर सदैव स्मरणात राहतो..!

अशा निख्खळ मैत्रीपूर्ण भेटी व्हायला हव्यात.ज्यामूळे मैत्री बरीच वृध्दींगत होण्यास मदत होते..! परंतू आज मित्रांना भेटाव म्हंटल तर ते बाहेरच भेटतात..! अन् बाहेरची भेट बाहेरून-बाहेरूनच असते..! तिच्यात घरातील अनौपचारिक नात्याचा सूगंध नसतो..!

 राजूभाऊ,खूप छान वाटले..! असेच इकडे आलात तर आज जसे हक्काने आलात तसेच येत जा...खूप बर वाटलं बौध्दिक झाल्याबद्दल...!! 

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दि. ५ मे २०१७
स्थळ: आमचे घर,लासूर स्टेशन. करड्या आवाजाचा निष्णात वक्ता..! "

माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक - ५ मे २०१७
स्थळ: आमचे घर,लासूर स्टेशन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा