🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक ३२ 🛑
🔵 शाकंभरी, अजमेर व दिल्लीचे चाहमान घराणे 🔵
🔵 चौहान - चव्हान 🔵
===================================
🔶 चाहमान हे अग्निकुळातील राजपूत होय.
🔶 शाकंभरी ( आजचे सांभर ) हे जोधपूर,जयपूर दरम्यान असलेले शहर त्यांची राजधानी होती.
१) ♦️अजयराज ♦️
🔘 आक्रमक साम्राज्यवादी राजनीतीचा अवलंब करणारा अजयराज हा शाकंभरीचा पहिला चाहमान राजा होय.
🔘 अजयराज याने वसविलेल्या नवीन शहराला त्याच्या मृत्यू नंतर ' अजयमेरू ' या नावाने ओळखण्यात येऊ लागले. कालांतराने अजयमेरूचे संक्षिप्त रुप ' अजमेर ' झाले.
२) ♦️अर्णोराज ♦️
🔘 अजयराज यांच्या पुत्राचे नाव अर्णोराज होते.
🔘 अर्णोराज हा इ. स.११३३ मध्ये गादीवर आला.
🔘 इ. स.११५३ मध्ये अर्णोराज याची त्याच्याच मुलाने जयदेव याने हत्या केली.
🔘 शाकंभरी च्या गादीवर जयदेव बसला खरा,परंतु थोड्याच दिवसात त्याचा लहान भाऊ विग्रहराज चौथा उर्फ विशालदेव याने जयदेव याला पदच्युत करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली.
३) ♦️विग्रहराज चौथा उर्फ विशालदेव ♦️
( इ. स.११५३-६३)
🔘 विग्रहराज चौथा उर्फ विशालदेव हा अत्यंत कुशल शासक होता.हा उच्च दर्जाचा लेखक होता.
🔘 विग्रहराज चौथा याने ' हरकेली - नाटक ' हे एक उत्तम नाटक असून त्याचा दगडावर कोरलेला काही अंश आजही अजमेर मध्ये अस्तित्वात आहे.
🔘 विग्रहराज चौथा याचा राजकवी सोमदेव याने आपल्या धन्याच्या सन्मानार्थ ' ललितविग्रहराज ' हे नाटक लिहिलेले असून याही नाटकाचा दगडावर कोरलेला अंश अजमेर येथील मशिदीत सापडला आहे.
🔘 कुतुबुद्दीन ऐबकाने निर्माण केलेली ही मशीद ,
' ढाई दिन का झोपडा ' मुळात विग्रहराज चौथा याने बांधलेली संस्कृत पाठशाळा होती.मशिदीतील पाठशाळेचे स्वरुप आजही कायम आहे.
🔘 विग्रहराज चौथा यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा अपर गांगेय लवकर मरण पावला.त्यामुळे अर्णोराज याचा नातू पृथ्वीराज दुसरा राजा झाला.
४) ♦️सोमेश्वर ♦️
🔘 पृथ्वीराज दुसरा यांच्या मृत्यू नंतर त्याचा चुलता सोमेश्वर गादीवर आला.
🔘सोमेश्वर याची कारकीर्द शांततामय मार्गाने व्यतीत झाली. इ. स.११७७ मध्ये सोमेश्वर यांचा मृत्यू झाला.
🔘 सोमेश्वर यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा पृथ्वीराज तिसरा गादीवर आला.भारतीय इतिहासात याच पृथ्वीराज तिसरा याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
५) ♦️ पृथ्वीराज तिसरा / पृथ्वीराज चव्हाण♦️
🔘 पृथ्वीराज तिसरा / पृथ्वीराज चव्हाण हा उत्तर भारतातील शेवटचा हिंदू सम्राट होय.
🔘 इ. स.११७८ मध्ये पृथ्वीराज तिसरा याने सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतली.
🔘 कनोजचा गढवाल राजा जयचंद्र आणि पृथ्वीराज तिसरा यांच्यात हाडवैर होते.
🔘 याच काळात मुहम्मद घोरी इ. स.११७३ मध्ये गझनीचा सुभेदार बनला.
🔘 इ. स.११९१ मध्ये मुहम्मद घोरी व पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा यांच्यात तराई येथे युद्ध झाले.यात मुहम्मद घोरी याचा पराभव झाला. या युध्दात कनोजचा गढवाल राजा जयचंद्र अलिप्त राहिला.
🔘 मुहम्मद घोरी याने पुन्हा इ. स.११९२ मध्ये पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याच्यावर चालून आला.याही वेळेस कनोजचा गढवाल राजा जयचंद्र अलिप्त राहिला.या युध्दात पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याचा पराभव झाला. अखेर पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा यांना पकडण्यात आले व त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
६) ♦️ हरिराज ♦️
🔘 मुहम्मद घोरी याने अजमेर जिंकून घेतले.पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याचा मुलगा गोविंद याला अजमेर चा शासक नेमले.
🔘 थोड्याच दिवसात पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याचा धाकटा भाऊ हरिराज याने गोविंद याला पदच्युत केले अन् अजमेर चा राजा बनला.
🔘 कुतुबुद्दीन ऐबक याने अजमेर वर आक्रमण केले.कुतुबुद्दीन ऐबकाच्या पुढे शरणागती पत्करण्यापेक्षा हरिराज याने कुटुंबासह अग्नीप्रवेश केला. अजमेर कुतुबुद्दीन ऐबक याच्या हाती पडले.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: १७ मे २०२०, रविवार
🔴 प्राचीन भारत-
क्रमशः


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा