शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र. -३ 🛑वैदिक संस्कृती🛑



🔵प्राचीन भारत भाग क्रमांक - ३🔵

🛑वैदिक संस्कृती🛑

===============================

  🔴ऋग्वेद काळ ( पूर्व वैदिक काळ )🔴

🔶आर्यांचा प्रादेशिक विस्तार
गांधार,पंजाब,काश्मीर,सिंध,एवढ्या प्रदेशात आर्यांचा प्रादेशिक विस्तार.

♦️राजकीय जीवन♦️

🔶कुल ( कुटुंब)
🔶ग्राम ( अनेक कुल मिळून )
🔶ग्रामणी ( ग्रामाच्या पुढाऱ्यास म्हणत)
🔶विश ( अनेक ग्रामे मिळून एक )
🔶विशपती (विश प्रमुख )
🔶जन ( सर्वात मोठी राजकीय संस्था, राज्य )
🔶राजन ( जनाचा प्रमुख )

♦️सामाजिक स्थिती♦️

🔶मुलीच्या शिक्षणाची काळजी घेतली जाई.
🔶ऋग्वेदातील अनेक सुक्तांची रचना विश्र्ववारा, घोषा, लोपामुद्रा, अपालयेत्री, इंद्राणी इ. स्री यांनी केली. पितृसत्ताक पद्धती.
🔶पडदा पद्धती,सतीची चाल नव्हती.

♦️वर्ण व्यवस्था♦️

🔶तत्त्वचिंतक असलेल्यांना ब्राम्हण, क्षत म्हणजे हानी त्यापासून बचाव करणारे क्षत्रिय,व्यापार करणारे वैश्य,
वरील तिन्ही वर्णांची सेवा करणारे शूद्र.
🔶वर्णभेदाचा आधार जन्म नसून कर्म होता.

♦️धार्मिक जीवन♦️

🔶निसर्गातील विविध शक्तींना देव मानले.पृथ्वी,आकाश, वायू, सूर्य,अग्नी,पर्जन्य हे त्यांचे देव होते.

-----------------------------------------------------------------

  🔵उत्तर वैदिक काळ 🔵
 

 🔶उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्थेचे  रूपांतर हळूहळू जातिसंस्थेत होत गेले.
🔶कर्माचे पूर्वीचे महत्त्व गेले अन् जन्मालाच महत्त्व आले.
व्यवसायाच्या आधारे जाती ,उपजाती निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली.
🔶पूर्वीची दास स्थिती जाऊन शूद्र आता सामाजिक घटक बनला.
🔶स्री विषयक दृष्टीकोनात परागती झालेली दिसून येते.

♦️आश्रम व्यवस्था♦️

🔶१)ब्रम्हचर्याश्रम
🔶२) गृहस्थाश्रम
🔶३) वानप्रस्थाश्रम
🔶४)संन्यासाश्रम

♦️धार्मिक जीवन♦️

🔶यज्ञयागाचे कर्मकांड वाढले.

==================================

वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵दिनांक: ४ एप्रिल २०२०, शनिवार

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा