🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २५ 🛑
🧿 मदुरेचे पांड्य घराणे 🧿
===================================
🔘 संघम साहित्यात ज्याचे वर्णन येते असा प्राचीनतम राजवंश म्हणजे मदुरेचे पांड्य घराणे होय.
१) ♦️ अरिकेसरी मारवर्मन♦️
🔘 इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या उत्तरार्धात अरिकेसरी मारवर्मन यांच्यापासून मदुरेचे पांड्य घराण्याची सुरुवात होते.
🔘 अरिकेसरी मारवर्मन यांचा चोल राजकन्येशी विवाह झाला होता.
🔘 अरिकेसरी मारवर्मन मुळात जैन धर्मीय होता.परंतु पत्नीच्या प्रभावामुळे आणि शैव संत संबंधरच्या शिकवणीमूळे तो शैव पंथी बनला.
२) ♦️ मारवर्मन पहिला राजसिंह ♦️
(इ.स.७३५ ते ७६५)
🔘 मारवर्मन पहिला राजसिंह याने संपूर्ण कावेरी मुलुख जिंकला.
२) ♦️ जटिल परांतक वरगुण♦️
( इ.स.७६५ ते ८१५)
🔘 मारवर्मन पहिला राजसिंह यांच्यानंतर गादीवर आलेल्या वरगुणाने पांड्य साम्राज्याचा विस्तार केला.
🔘 वरगुणाने अनेक शिव आणि विष्णु मंदिरे बांधली.
४)♦️ श्रीमार श्रीवल्लभ♦️ (इ. स.८१५ ते ८६२)
🔘 श्रीमार श्रीवल्लभ याने सिलोन ( श्रीलंका ) वर हल्ला करून सिलोन लुटले.
५) ♦️ दुसरा वरगुण ♦️
🔘 दुसरा वरगुण याचा ,पल्लव राजा अपराजितवर्मन याने पराभव केला.
६) ♦️ परांतक वीरनारायण पांड्य♦️
🔘 दुसरा वरगुण याचा ,पल्लव राजा अपराजितवर्मन याने पराभव केल्यानंतर परांतक वीरनारायण पांड्य याने पांड्य सत्ता सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
७) ♦️ दुसरा मारवर्मन राजसिंह♦️
🔘 परांतक वीरनारायण पांड्य यांच्यानंतर पांड्य गादीवर आलेल्या दुसरा मारवर्मन राजसिंह याचा परांतक चोल राजाने पांड्य राजधानी मदुरा जिंकली आणि पांड्य राज्याचा बराचसा प्रदेश चोलांच्या राज्यास जोडला.
🔘 चोल साम्राज्याचा अस्तानंतर द्वितीय पांड्य साम्राज्याची स्थापना झाली.
🔘 पांड्य व चोल संघर्ष कधीच थांबला नाही,आणि या संघर्षामुळेच चोल साम्राज्याचा अस्त झाला.
८) ♦️मारवर्मन सुंदर पांड्य♦️
(इ. स.१२१६ ते १२३८)
🔘 चोलांच्या विरोधात स्वतंत्र पांड्य साम्राज्याची स्थापना मारवर्मन सुंदर पांड्य याने इ. स.१२१६ मध्ये केली.
🔘 मारवर्मन सुंदर पांड्य याने चोलांचा, होयसळ व काकतीयांचा पराभव केला.
९) ♦️ जटावर्मन सुंदर पांड्य♦️
🔘 मारवर्मन सुंदर पांड्य यांच्यानंतर त्यांचा पुत्र जटावर्मन सुंदर हा पांड्य गादीवर आला.
🔘 जटावर्मन सुंदर याने चोलांचा निर्णायक पराभव केला.
🔘 जटावर्मन सुंदर याने इ. स.१२५४ -१२५६ मध्ये सिलोन ( श्रीलंका ) वर आक्रमण केले.
🔘 चोल साम्राज्य आता पांड्य साम्राज्यात विलीन झाले होते.
१०) ♦️ मारवर्मन कुलशेखर♦️
( इ.स.१२६८ ते १३१०)
🔘 पांड्य घराण्यातील शेवटचा महान राजा मारवर्मन कुलशेखर हा होता.
🔘 मारवर्मन कुलशेखर यांच्या आलेखामध्ये त्याने केरळ,सिलोन ( श्रीलंका ), चोल आणि होयसळ यांच्यावर विजय मिळविण्याचा उल्लेख येतो.
🛑 मारवर्मन कुलशेखर यांच्या मृत्यू नंतर पांड्य साम्राज्यात सुंदर पांड्य आणि वीर पांड्य या दोन सावत्र भावात यादवी युद्धाला सुरुवात.
🛑 पांड्य घराण्यातील या यादवीचा फायदा उठवून मलिक काफुर याने पांड्य साम्राज्य मनसोक्त लुटले.
🛑 शेवटी उलुघखानाने ( मुहम्मद बिन तुघलक) आपल्या दक्षिण दिग्विजयात पांड्य साम्राज्य स्वतच्या दिल्ली साम्राज्याला जोडून दिले आणि मदूरा येथे जलालुद्दिन अहसान याची प्रांताधिकारी म्हणून नेमणूक केली.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: ७ मे २०२०, गुरुवार.
🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा