मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" आमची शिरखुर्म्यासारखी गोड कृतार्थ भेट..! "
===================================
आजचा १७ जून २०१८ चा दिवस आम्ही सर्व बालमित्र आमच्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही ..! आज आम्ही एका आई सोबत..तिच्या मुलांनी रमजान ईद साजरी केली...!
माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येऊन जातात की,ते त्याच्या हृदयात कायमचे कोरले जातात..!
आज दिनांक १७ जून २०१८ रोजी सकाळी आम्ही बालमित्र आण्णासाहेब म्हस्के(सब मॅनेजर मराठवाडा ऑटो कंपनी,बजाजनगर), संजय उगले पा. दहेगावकर,ह.मु.औरंगाबाद(औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी) ,हंसराज भुजाडे पा.कन्नक सागजकर,ह.मु.औरंगाबाद ( माध्यमिक शिक्षक) व मजकूर लेखन करणारा इसम..आम्ही सर्वांनी ठरवले की,आज आपण आपला बालमित्र कंमु बेग मिर्जा राहणार जळगाव, ता.वैजापूर याच्या घरी जायचे व रमजान ईद निमित्त त्याच्या संपूर्ण परिवारास शुभेच्छा द्यायच्या..!
सकाळी ११ वा. निघालो..! जळगावला पोहचलो..! कम्मु ला खूप खूप आनंद झाला..! आम्ही आल्याचे कळताच त्याची आई..ज्या की आज खूप थकल्या आहेत,त्या धावत आल्या..आपल्या या लेकरांना भेटण्यासाठी..! आईची माया जगात वेडी म्हणतात...ती यामुळेच..! त्या मायेला फक्त धावणे माहीत असते...आपल्या लेकरांच्या पाठीमागे..! दुसरं काहीही तिला माहीत नसते..! माझा आणि कम्मू च्या आईचा पूर्वीचा परिचय होताच..! आल्या... आल्या..मी म्हणालो..
" आई,पहचाना क्या...मुझे..?"
आई- " अरे, बेटा,तू जाधव सर है ना..!"
मी- " आई, मैं तेरे सामने ,सर नही हुं..सिर्फ जाधव हुं..!"
हे ऐकल्यावर म्हातारीला खूप खूप बरं वाटलं..!आली..अन् माझ्याजवळच अगदी जवळ बसली..! मला माझ्या स्वर्गीय आईची यावेळी खूप गहिवरून आठवण आली पण मी ती मित्रांसमोर व्यक्त होऊ दिली नाही.. आतून खूप खूप भावूक झालो होतो..!
कंमुबेग च्या पत्नीने ,आमच्या ताईंनी खूप स्वादिष्ट " शिरखुर्मा " बनवला होता..! त्या सोबत..गरमागरम गुलगुले..व भजे,पापड..! ताईंच्या हाताला खूप चव होती..! यथेच्छ ताव मारला..!
शेवटी आम्ही निघालो..औरंगाबादला..तर आई म्हणाली..
" बच्चो, आज मेरा दिल बहुत खुश हुआ ..तुम सब... इतने दूर से मेरे कमु के वास्ते आये..हमेशा उसके साथ रहणा.. यही दुआ हैं मेरी अल्ला से..!"
मी-" आई,हम सब कम्मु के साथ हमेशा थे... और रहेंगे..!"
यावर आई म्हणाली - " बच्चो, दूनियामे सबसे बडा वही होता है... जिसके दिलमे गरिबोके लिये प्यार होता है..! यह बात मेरी हमेशा ध्यान में रखना..!"
खरंच.. या वाक्यात त्या म्हातारीच्या आयुष्याचा अनुभव व्यक्त होत होता..!आम्ही सर्व मित्र तर..याच विचारधारेचा सन्मान करणारे होतो..! शेवटी निरोप घेतला..तेंव्हा आम्ही आईचे दर्शन घेतले. मी आईला आग्रहाने म्हणालो..
" आई, वो...जो..चेहरे पर से जो हात घुमाते हैं...ना... वैसा घुमाओ ना..!"
मी असं म्हणल्या बरोबर...म्हातारीनं..माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला..व तिच्या कानाजवळ तिच्याच हाताचे बोट मोडली..!
मला या कृतीमुळे माझ्या आईची खूप खूप आठवण आली..! ती बऱ्याचदा मला अशीच करायची..! आई.. ती सर्वत्र एकसारखीच असते..! तिला..जातपात,धर्म,पंथ कधीच बंधीस्त करूच शकत नाही..! याचा मी व माझे सर्व बालमित्र याची देही याचि डोळा अनुभव घेत होतो..!
आजचा दिवस कृतार्थ झाल्याचे समाधान आमच्या सर्वांच्या मनात होते..!
आम्ही कम्मुबेग च्या घरापासून दूर आलो होतो..निघण्यासाठी.....तर....आई..आम्हाला निरोप देण्यासाठी काठी टेकवत..टेकवत तिथपर्यंत आलीच होती..!
" आईची वेडी माया असते...ती अशी..!"
आज खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या मित्रा सोबत रमजान ईद साजरी केल्याचे आत्मिक समाधान आम्हाला..मिळाले होते..!
ता.क.: प्रत्येक धर्माच्या ,प्रत्येक सणामध्ये आईची माया जर सामावली...ना...तर..त्या सणांचा गोडवा...आईच्या माये सारखाच खूप...गोड...गोड..होईल...अगदी शिरखुर्म्यासारखा..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
प्रसंग स्थळ: जळगाव,ता.वैजापूर,जिल्हा:,औरंगाबाद
भेट दिनांक: १७ जून २०१८



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा