" मला प्रवासात भेटलेली माणसं..! "
" पुरी येथील आम्ही..बिन बुलाये बाराती..! "☺
======================================
चि.नबीन व चि.सौ.का.प्रियंका ताई यांचा शुभ विवाह..!
स्थळ: पुरी, ओरिसा, भारत.
काल दिनांक ११ मे २०१८ रात्री मी एका लग्नातील निमंत्रित नसलेला पाहुणा होतो.मला सोबत होता..चिरंजीव नमन..!
मल कुठेही पर्यटनाला अथवा फिरायला गेलं की, तिथं आपला भारत देश शोधायची जुनी पण टवटवीत सवय आहे..! असचं पुरी जगन्नाथ येथे संध्याकाळी आम्ही फेरफटका मारत असताना मला पुरी येथील मुख्य रस्त्यावर एका लग्नाची बारात जात असताना दिसली..!मी लगेच नमनला म्हणालो,
" नमन , तू येतो का माझ्या सोबत..मला या लग्नाला जायचे आहे..!"
नमन- " अहो,दादा ते आपल्या ओळखीचे ना पाळखीचे..कशाला जायचे आपण..?"
मी म्हणालो " अरे,तू फक्त माझ्या सोबत चल, निदान आपल्याला इथली लग्नातील संस्कृती तर माहीत होईल..! आणि आपण कुठं कोणता गुन्हा करतोय..त्या नवरदेवाची भेट घेऊ,त्याला आपला परिचय देऊ..मग तर ठीक आहे ना..!"
नमन- " चला मग..!"
एका थ्री स्टार हॉटेल मध्ये लग्न होते.ज्या मार्गाहून स्वामी जगन्नाथ रथयात्रा निघते..त्याच मार्गाने वधू,वराची बारात चालली होती.मी प्रथम त्या नवरदेवाला भेटलो, इंजिनियर होता तो .! माझा परिचय करून दिला त्यालाही खूप आनंद झाला. आम्ही सहभागी झालो...नवरदेवाचे व-हाडी म्हणून..!
या लग्नाच्या बारातीत वऱ्हाडी मंडळी खूप खूप जोशात नाचत होती.आपल्याकडील बटबटीत D J Band सारखा प्रकार येथे नव्हता.प्रत्येक वाद्य हातगाडीवर वेगवेगळ्या बांधिस्त गाडीत वादक व वाद्य सह होते.त्या सर्व गाड्या दोरीने एकमेकांना बांधलेल्या होत्या.सर्वात पुढे जनरेटवर चालणारी गाडी त्या सर्वांना ओढीत होती.त्या बारातीत, आपल्या कडील नागराज मंजुळे दिग्दर्शित " फॅन्ड्री चित्रपटातील जब्या " अनेक रुपात दिसला..!अनेकजण डोक्यावर बॅटरीवर चालणारा दिवा घेऊन चालले होते..! तेच मला जब्या वाटले..! समाजातील हे भीषण वास्तव ओरिसातील पुरी येथे देखील पाहायला मिळाले..!
मला वाटलं.. " जब्या " फक्त आपल्या महाराष्ट्रातच आहे..!
मी तेथील पाहुण्यांना विचारले तर,त्यांनी सांगितले की,आमच्यात वधू व वर यांची एकत्र बारात काढतात.लग्न विधी,लग्न स्थळी वधू व वर यांची बैठक स्थितीत होत असतो. विशेष म्हणजे आपल्याकडील लग्नात ज्याप्रमाणे तांदूळ अक्षदा म्हणून वधू,वरच्या अंगावर बऱ्याच वेळा आपल्यातली बरेच पाहुणे, मित्र मंडळी याच अक्षदा नेम धरून इतरत्र मारण्यात स्वतच्या नेमबाजीचे कौशल्य आजमावत असतात, तो भाग वेगळा..!
तर असला तांदूळ अक्षदा म्हणून फेकण्याचा प्रकार तिथे नव्हता.जे गुरु होते त्यांनी विधिवत पूजा,मंत्र म्हणत वधू ,वरांना लग्नाच्या बेडीत बांधले..!
अजुन एक फार महत्त्वाचे वैशिष्टे पुरी येथील लग्नात मला आढळले..ते ही तेथील पाहूण्यानकडून समजले..व प्रत्यक्ष दिसले सुध्दा..! ते असे..ज्यावेळी वधू व वरची लग्न विधी सुरू असते..त्यावेळी तिथे फक्त आई,वडील व मामा यांचीच उपस्थिती अत्यावश्यक असते.बाकीचे अनुपस्थित असले तरी चालते. म्हणजे ते उर्वरित जेवण करण्यात मग्न असले तरी अती उत्तम..! कारण तेवढाच वेळ वाचतो.
मी बघितले तर..खरोखर..वधू,वर जवळ फक्त उपरोक्त नातेवाईक पूजा करिता उपस्थित होते.अन् बाकीचे स्वादिष्ट जेवण करण्यात मग्न झाले होते.आता आम्ही सुध्दा नवरदेवाकडून असल्यामुळे व खुद्द नवरदेवाने सांगितल्यामुळे आम्ही यथेच्छ साजूक तुपातल्या बऱ्याच गोड गोड पदार्थांवर ताव मारला..!
शेवटी वर- चिरंजीव नबीन यांना शुभेच्छा देऊन व प्रेमाचा निरोप घेऊन मी व नमन रात्री ११:३० वा.लग्न ठिकाणाहून निरोप घेतला..!
ताजा कलम : दोन भारतीयांनी, दोन भारतीयांच्या लग्नाला ,एक भारतीय म्हणून उपस्थिती लावली..!
अतुल्य भारत..! भिन्न संस्कृती..तरी एकसंघ भारत..!
वंदे मातरम्..!
विवाह दिनांक: ११ मे २०१८
स्थळ: पुरी जगन्नाथ , ओरिसा
मुहूर्त: गोरज..!
लेखक व व-हाडी : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
लेखन दिनांक : १२ मे २०१८




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा