मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

" आई, तू नसती तर.....?










 

चिंतन ©️


" आई, तू नसती तर.....?


==================================


" आई, तू नसती तर.....?


स्वकर्तूत्व सिध्दशिरोमनी,इतिहासातील आजतागायत एकमेव चारित्र्यसंपन्न राजा,रानटी मूघलांना,हिदवी स्वराज्याच्या शत्रूंना त्यांची जागा दाखविणारे शौर्यशील धूरंधर ,एका स्रीच्या ,आईच्या मार्गदर्शनाने एक मूर्तीमंत,स्वराज्यप्रेमी व्यक्तिमत्व कसे आकारास येते याचे ज्वलंत उदाहरण, तळागाळातील सर्व जातीधर्माच्या माणसांना आपल्या संघटनचातूर्याने एकत्र करणारा जाणता एकमेवद्वितिय लोकराजा,लोकशाहीची मूल्ये प्रथमत:स्वत:मध्ये अनुकरून मग राजपध्दतीत राबविणारे थोर मूल्यपूजक,अखंड सावध असणारे एकमेव अष्टावधानी..!


 देहापेक्षा...आप्तस्वकियांपेक्षा देशहितास प्रथम प्राधान्य देणारे देशाभिमानी सेवक, देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो याचे सदैव भान असणारे महान राष्ट्रपूजक, लोकांच्याकरिता लोककल्याणकारी योजना लोकांमध्ये जाऊन यशस्वीरित्या राबविणारे पहिले लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवराय, यांचे अद्वितीय कार्य घडलेच नसते अन् पुढील कोणत्याच राष्ट्रपुरुषांना,विरांगणांना प्रेरणा मिळालीच नसती..!


आई तू नसती तर यवनांच्या क्रूर राज्यातल्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट दिसलीच नसती..!


आणि आई ,तू नसती तर....

 आज माझे जे नाव ," नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव " आहे, ते राहिलेच नसते..!  भलतेच नाव असते..!

खूप खूप धन्यवाद आई..माझ्या आजच्या असणाऱ्या नावाला व अस्तित्वाला फक्त तू आणि तूच निमित्त आहेस..!


राजमाता जिजाऊ आई, आपणास आपल्यातील मातृत्वास अन् कुशल नेतृत्वास आज आपल्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🏻🌹

जय जिजाऊ

जय शिवराय

वंदे मातरम्

अभिवादक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक:१२ जानेवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा