आमचे गाव आमची माणसं..!
" जिवलग मित्राची आई, प्रेमानं म्हणतो बाई..! "
=====================================
मी पालखेड राहत असताना माझ्या पौगंडावस्थेतील वयात मोजकेच मित्र मला असे भेटले. ज्यांचे घर ,हे फक्त त्यांचेच नव्हते तर त्याच घरात माझा अन् आम्हा काही बालमित्रांचा वावर सतत या..ना त्या निमित्ताने असायचा..! त्या घरात वावर असताना आयुष्यात असे कधीच वाटले नाही की, हे दुसऱ्याचे घर आहे म्हणून..! आणि जाती पातीचा अतिशय घाणेरडा विचार तर स्वप्नातही आलाच नाही..! या अशा निर्भेळ आनंदाला आम्ही मोजकेच बालमित्र खूप खूप श्रीमंत होतो आणि आहोत.
असाच माझा एक बालमित्र आण्णासाहेब कारभारी म्हस्के..!
(ह.मु.बजाजनगर ,औरंगाबाद)
आण्णाची आई,ज्यांना आम्ही " बाई " या नावाने मायेनं हाक मारतो ती आमची आई, बाई..! माझ्या स्व. आईची मैत्रीण..! माझ्या स्व.आईच्या मायाळू स्वभावाच्या प्रेमाची निस्सीम चाहती आमची आई, बाई..! त्यातल्या त्यात आण्णा अन् आम्ही काही मित्र एकमेकांच्या थेट स्वयंपाक घरात पोहोचलेले मित्र असल्याने ,एक वेगळ्याच मायेचं नात या माऊलीशी आमच्या बालपणापासून ते आजतागायत आहे. मला जेंव्हा जेंव्हा माझ्या स्व.आईची आठवण आली की,मी आण्णासाहेब म्हस्के याला फोनवर अजिबात न कळवता मी अन् माझी पत्नी फक्त आणि फक्त बाईंच्या मायाळू भेटीसाठी अचानक नक्की जात असतो,जसं आज देखील फक्त बाईच्या भेटीसाठी आलो.
खूप गरिबीत जीवन जगली ही माऊली..! घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे सतत या गावाहून त्या गावाला स्थलांतर आपल्या पती अन् लेकरांसह होत राहिलं पण आपल्या लेकरांना शिक्षण अन् स्वप्न दाखविणारे मार्ग कधीच बंद केले नाही..! म्हणून तर आज माझा बालमित्र आण्णासाहेब म्हस्के ( औद्योगिक कर्मचारी,पर्यवेक्षक) व त्याचे थोरले बंधू आदरणीय बाळासाहेब म्हस्के ( जि.प.मुख्याध्यापक ) हे आपल्या आयुष्यात स्थैर्य मिळू शकले. अर्थात यात या दोघाही बंधूंची मेहनत अन् जिद्द होतीच पण प्रेरणा अन् आशीर्वाद मात्र याच माऊलीचा,बाईचा होता अन् आहे..!
मी जेंव्हा जेंव्हा तीर्थरूप बाईंना मायेनं ,प्रेमानं भेटतो त्यावेळी बाईला खूप खूप बरं वाटतं. वाटणारच..! कारण गावची सख्खी माणसं भेटली की,जगातील सर्वात मोठा मानसोपचार होतो.हे सर्वोत्तम औषध असते,आपल्या गावापासून दूर राहणाऱ्या अशा माणसांसाठी ,ज्यांची अख्खी हयात गावात गेलेली असते,मात्र ऐन वार्धक्यात त्यांच्या मुलांच्या नोकरीमुळे अशा अनेक वयोवृद्धांना शहरात राहावे लागते. म्हणून मी एक प्रेमळ मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आमच्या बाईंची नक्की भेट घेतच असतो.
मी अन् विजू गायकवाड ( ह.मू.वैजापूर) जो पर्यंत पालखेड येथे राहत होतो आणि आण्णा देखील तिथेच राहत होता तो पर्यंत आण्णाच्या घरासमोर गेलो की,मोठ्याने " आण्णासाहेब ...हाये का...आण्णासाहेब..?" असे मुद्दामहून ओरडून विचारायचो,अर्थात त्यावेळी आण्णा आम्हाला दिसत असायचा. त्याला आण्णासाहेब असे म्हणणारे आम्ही दोघेच होतो. आमचं हे ओरडणे ऐकले की, बाई म्हणायच्या..
" आण्णा ,नंदू,विजू आले रे..!"
आज जेंव्हा बाईंना भेटलो त्यावेळी बाईंना एक किस्सा जो की आज पर्यंत फक्त आम्ही त्यातील मोजक्या सहभागी बालमित्रांनाच माहीत होता तो सांगितला.आपल्या मनातील सगळं काही समोरच्याला सांगून टाकणारा मी दुर्मिळ होत चाललेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती मधील स्वयंघोषित माणूस..! कसं आहे,आपल्या मनातलं ,ज्याच्याशी संबंधित त्या आठवणी आहेत,त्या जर त्याला कधीच सांगितल्या नाहीत तर असं न सांगणारा माणूस आतून येडा होतो..! असं मला वाटतं..!
मी आज पहिल्यांदाच बाईंना सांगितलं की,
" बाई,अंदाजे २३ वर्षांपूर्वी मी,आण्णा,शाम शेळके,बहुदा विजू गायकवाड आणि आमचा छोटा भाऊ बबलू ( डॉ.प्रमोद राऊत) आम्ही तुम्हाला लाडीगोडी लावून मुद्दामहून शेतात पाठवून दिले होते कारण,आम्हाला तुमच्या घरी आमरसाची पार्टी करायची होती..! हे ऐकल्या बरोबर तीर्थरूप बाई खूप खूप हसल्या..! हे ऐकल्या बरोबर बाईंनी माझा गालच धरला..! तो मायेनं धरलेला गाल,माझ्या स्व.आईच्या प्रेमळ आठवणीत घेऊन गेला..! आता ती आमरसाची पार्टी अन् त्याचा किस्सा या बद्दल मी सवडी अंती एक लेख लिहिणार आहेच,कारण त्यावर एक लेख लिहावा ही प्रिय छोटा भाऊ बबलू ( डॉ.प्रमोद राऊत) याची खूप वर्षापासूनची तीव्र इच्छा आहे..!
थोडक्यात या माऊलीने आम्हा सर्व मित्रांना कधीही परक्या सारखे समजलेच नाही.आपला आण्णा अन् आम्ही एकच आहोत याच भावविश्वात ही माऊली तेंव्हाही अन् आजही रमून जाते..! मला अशी माणसं खूप खूप आवडतात.बाकी कृत्रिम नाते व त्यांचे पीक हल्ली खूप जोमाने वाढत आहे,त्यात स्वतः ला का म्हणून ढकलून द्यायचे या प्रगल्भ विचाराचा निदान मी तरी..!
असो,माझ्या भेटीने बाईंना आनंद झाला अन् होत असतो यापेक्षा दुसरा तो आनंद तो कोणता..?
वंदे मातरम्..!
ता.क.: फोटो क्लिक बाय माझी पत्नी..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १० सप्टेंबर २०१९,मंगळवार
स्थळ: बजाजनगर,औरंगाबाद.
.

आमचा खूप जिवलग बालमित्र आण्णासाहेब म्हस्के आणि त्याचे थोरले बंधू आदरणीय बाळासाहेब म्हस्के यांच्या मातोश्री स्व.पार्वताबाई कारभारी म्हस्के यांना दिनांक ११ ऑक्टोंबर २०१९ वार शुक्रवार रोजी रात्री ९:४५ वा.देवाज्ञा झाली आणि आज दिनांक १२ ऑक्टोंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता वैजापूर येथे अंत्यसंस्कार झाले..!
उत्तर द्याहटवामी आवर्जून उपस्थित होतो.. एका आईच्या अंत्यसंस्काराला..!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!💐💐💐🙏🏻
ता.क.: अजुन एक आई माझ्या भावविश्वातून कायमची निघुन गेली..!
वंदे मातरम्..!
दिनांक: १२/१०/२०१९