मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

"अप्रिय मेकॉले भाऊ,पत्रास कारण की...





चिंतन

"अप्रिय मेकॉले भाऊ,पत्रास कारण की...

=====================================

अप्रिय मेकॉले भाऊ,पत्रास कारण की,
                     
अप्रिय मेकॉले भाऊ इंग्लडवाले (आजच्या भारतीय शिक्षण पद्धतीचा आद्य प्रणेता ) तुला समर्पित..!

तू आम्हाला असे काही संमोहित करून टाकले आहे की,आम्हाला तू आखून दिलेल्या वर्तुळातच उड्या ते सुध्दा तुला हव्या तश्याच माराव्या लागत आहे..! " दोर जळाला पण सुंब मात्र बाकी " या उक्तीप्रमाणे तू आमच्या देशातून इंग्लंडला तर कधीचाच गेला आणि तिथून सुध्दा वर कुठं तरी सुध्दा कधीचाच गेलास पण....तू तुझी अशी काही जादू आम्हा भारतीयांवर मोहित करून गेलास की,आम्ही तुझ्या सदैव स्मृतीत वय वर्ष साडे पाच ते.....पुढे माहीत नाही....पर्यंत असतो..!

तुला ,तुझे प्रशासन नीट चालावे याकरिता पुस्तकी व्यक्ती हवे होते अन् ते तू मिळविले सुध्दा..! त्यांची गरज होती व आहे..! पण तू गेल्या नंतर तू आखून दिलेल्या संहिते बाहेर कुणी गेलेच तर तू अशी ही व्यवस्था (मानसिक) करून गेला की, कुणी जमिनीवरील ,ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार शिक्षण घेण्याचा अथवा देण्याचा प्रयत्न जरी कुणी केला तरी सब घोडे बारा टक्के (आजच्या भाषेत १००% प्रगत..!)पाहिजे म्हणून हट्ट धरायला लावला..!

 अप्रिय मेकॉले भाऊ,कसं शक्य आहे हे..? सर्वच सारख्या क्षमतेचे असूच शकत नाही पण...केवळ तू प्रत्यक्ष हजर नसलेल्या पण तुझा सदैव धाक असलेल्या आत्म्याचा धाक समजून आम्ही
" निशाणी डावा अंगठा " तरी किती दिवस वर करावा..?(संदर्भ :हा चित्रपट पाहावा..!)

अप्रिय मेकॉले भाऊ, आमचे थोर राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम साहेब नेहमी म्हणायचे की, " हुशार मेंदू ,वर्गातील मागील बॅंचवर सापडतात..!" किती मोठा अर्थ आमच्या या थोर भारतीयाने आम्हाला सांगून दिला..! आम्ही कलाम साहेब यांच्या या सूचक अर्थाचा अर्थ समजून घेतलाच नाही..! जरी एखादा नीट साक्षर झाला नाही म्हणून तो काय अप्रगत समजावा का...? आणि तो अप्रगत समजला म्हणजे त्याला शिकविणारे गुरुजी शिकवत नाही असा अर्थ यातून निघतो का..?

अर्थात सर्व मुलांना शिकवायलाच हवे.त्यात अजिबात कसूर करू नये.ते कदापि क्षम्य नाहीच..! कलाम साहेब यांना अपेक्षित असलेले उत्तर कलाम साहेब यांच्या सूचक वचनात दडलेले नक्कीच आहे..!  माझ्या स्वानुभवावरून..कित्येक मुले औपचारिक शिक्षणात मेकॉले भाऊ च्या आखून दिलेल्या मैदानात खेळात मागे होती...अशी मुले त्यांच्या आयुष्यात आर्थिक,सामाजिक दृष्ट्या यशस्वी ठरली आहेत..! मग अशा वेळी मला आपल्या भारत देशाचे थोर राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांच्या सूचक सुवचनाची प्रकर्षाने आठवण येते..व वंदन करतो त्यांना..!
                                                                                           
असो,अप्रिय मेकॉले भाऊ, काळजी घे..! बहुदा आमच्यातील एकाने जर भारतातील,थोर ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांची माहिती असलेला इतिहास राज सत्तेचा वापर करून शिकविण्याचा अट्टाहास धरला तर तुझ्या आखून दिलेल्या मैदानावर तुझे काही आजचे शिष्य विरोध करू शकतात..! तेंव्हा कृपया त्या अट्टहासावर नाराज होऊ नको अन् तुझ्या मृतात्म्यास दुःख होईल असे वाईट वाटून घेऊ नको..!

 चल...आता पत्र पुरे करतो..! काळजी नको करू..!
                                                                                                                         
ता.क. : कृपया मेकॉले शिक्षण म्हणजे इंग्रजी माध्यम असा नव्हे...! तर ती एक वृत्ती आहे..! माध्यम कोणतेही असो,फक्त वृत्ती मेकॉले नको असा अर्थ अपेक्षित आहे.सदरील व्हिडिओत डॉ.इंद्रजित देशमुख यांनी सांगितलेल्या उदाहरणातअपेक्षित अर्थ मेकॉले व त्याच्या बहिणीच्या संवादात लपलेला आहे..!
सुज्ञास चटकन समजेल..!

 वंदे मातरम्..!
                                                                                                               
 पत्रलेखक नं:शोभाबाई विष्णूपंत जाधव,पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
               
  माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: ११/२/२०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: ११/२/२०२०, मंगळवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा