शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

माझा गुरुस्थानी जिवलग मित्र,दत्तू पा.घोगरे सर..! "



मला प्रवासात भेटलेली माणसं..!

 "माझा  गुरुस्थानी जिवलग मित्र,दत्तू पा.घोगरे सर..! "
====================================

आयुष्यात काही मित्र हे विश्वासाची कोंदणं घेऊन एखाद्याच्या आयुष्यात आलेली असतात..! ही अशी कोंदणं असतात,ज्यांच्या फक्त असण्यान माणसाच्या आयुष्यात खूप मानसिक आणि निव्वळ प्रेमाचं नातं निर्माण होत असते..! माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात मला नियतीने असे मोजकी मित्र दिलीत...ज्यांचे अस्तित्व अगदी वरील रुपात्मक वर्णन असलेल्या विविध अलंकारांनी नटलेल्या मैत्रीच्या देवतेसारखी आहेत..! त्यात माझे डी.एड पासून ते आजतागायत असलेल्या एका जिवलग प्रिय मित्राचे नाव आहे...दत्ता भाऊ घोगरे पा.सर..! माझ्या थेट स्वयंपाघरातील मैत्रीचा हा माझा प्रिय मित्र...दत्ता घोगरे सर..!

मी नुकताच बोराडी,ता.शिरपूर,जिल्हा, धुळे येथून बदलून कन्नड येथील शासकीय अध्यापक विद्यालय येथे हजर झालो होतो..! ते वर्ष होते... इ.स.१९९२. कन्नड ला कुणीच ओळखीचे नव्हते.मी काही दिवस आमच्या गावातील माझ्या बालमित्राच्या सोमनाथ गायकवाड च्या मोठ्या बहिणीच्या घराशेजारी किरायाची खोली घेऊन राहण्याचा निर्णय घेतला होता.पण म्हणतात ना...गावाकडच्या अन् गावातल्या लोकांना गावाकडच्या आठवणी अन् माणसं आकर्षित करतात..अगदी तसेच झाले..!आमच्या डी.एड च्या पुढील वर्गातील आमच्या पालखेड गावापासून खूप जवळ असलेल्या काटे पिंपळगाव ,ता.गंगापूर येथील दोन मित्रांना समजले की, पालखेड येथील कुणीतरी आपल्याच अध्यापक विद्यालयात प्रथम वर्षाला आलेले आहे..! मग काय...त्या दोन मित्रांनी मला हुडकून काढून मला बळजबरी..आमच्या अध्यापक विद्यालया च्या वसतिगृहात नेले.ते दोन मित्र होते अर्थात दत्ता भाऊ घोगरे आणि जनार्दन कारभारी राऊत..!

आमचे वसतिगृह म्हणजे जगातील तत्कालीन काळातील अस्वच्छतेत पहिल्या पाच मध्ये नक्की आले असते..! जर कुणी अशी अस्वच्छतेची स्पर्धा आयोजित केली असती तर...!😂 ते वसतिगृह  होते...समर्थनगर ,कन्नड येथे..! आणि त्याच वसतिगृहात आमचा विद्यार्थांचा संसार सुरू झाला होता.मी ,दत्ता सर,जे.के राऊत एकत्र राहू लागलो.आळीपाळीने स्वयंपाक करणे नित्य नियमाने करू लागलो..! मी अन् माझा बालमित्र सोमनाथ गायकवाड इ.१० वी च्या पूर्वी आमच्या गावातील श्री. पारेश्वर् मंदिरात बालगिरी महाराज यांना जो स्वयंपाक करून द्यायचो..ती पाक कला आता उपयोगी येत होती..!

दत्ता भाऊ घोगरे सर..!
अतिशय दारिद्र्य आयुष्य व्यतीत करून शिक्षण घेत होते. घोगरे सरांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती.मला चांगलं आठवतं..सरांना एकच लाल रंगाचा सदरा होता..! तोच..सदरा..सर ,दोन दिवसा आड धुवून घालायचे..! माझ्या आयुष्यातील एखाद्या मित्राला गुरु करण्याच्या तो पहिला प्रसंग होता..! मी अजुन पर्यंत कुणाला सांगितले नाही पण ,आज जाहीरपणे व्यक्त करतो की, माझ्या या मित्राच्या अन् त्याच्या त्या खूप वाईट काळातील त्याच लाल रंगाच्या  सदऱ्याची आठवण म्हणून  तेंव्हा पासून ते आजतागायत निदान एक तरी लाल रंगाचा सदरा माझ्या कडेच असतोच..!  एवढ्या दारिद्र्य आयुष्यात दत्ता सरांनी आपली शिक्षणाविषयी चिकाटी अजिबात सोडली नव्हती..! दत्ता सरांनी आपल्या गरिबीला आपली कमजोरी कदापि होऊ दिली नाही.आणि त्याच गरिबी मुळे रडतही बसले नाहीत..! खूप जवळून गरिबी अन् तिचे चटके सहन केलेला माझा हा प्रिय मित्र..दत्ता भाऊ घोगरे सर..!

आम्ही वसतिगृहात आहे त्या परिस्थितीशी जुळवून दररोज आयुष्याचा अगदी सर्व सामान्य आयुष्यातील आनंद शोधून जगत होतो..! आमच्या खोलीत एक पितळी लोखंडी बादली होती.ती बादली अन् आम्ही एकमेकांना खूप खूप साथ दिली..😂 आता ती साथ काय होती ती फक्त मी ,जे.के.राऊत सर आणि दत्ता घोगरे सर..आम्हालाच माहीत..!😂 थोडक्यात..ही तीच बादली होती जिने आम्हाला..स्वयंपाक, भांडी,धूने, अजुन इतर कामात मदत केली..!😂 आम्ही आहे त्या परिस्थितीत जगलो..! आहे त्या परिस्थितीची किळस केली नाही..!

मी ज्यावेळी इ. स. २०११ साली..वैजापूर मधून गंगापूर तालुक्यात नोकरीसाठी आलो..ते केवळ माझ्या याच प्रिय मित्राखातर...! माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या या मित्राने मला सदैव साथ दिली आहे..आणि मी सुध्दा त्यांना..! एकंदरीत माझ्या या मित्राला मी माझ्या आयुष्यात गुरूचे स्थान दिले आहे..! कारण या  माझ्या मित्राने आज जे काही मिळविले आहे ते सगळे स्वकर्तृत्वावर..!

अशा या माझ्या प्रिय मित्राचा आज जन्मदिन आहे.त्या निमित्त माझ्या या मित्राला दत्ता भाऊ घोगरे पा.सरांना माझ्या संपूर्ण कुटुंबा कडून  मनःपूर्वक शुभेच्छा..!

असो,खूप काही आहे व्यक्त करण्यासारखं पण आता आवरतं घेतो..!😂

शूभेच्छूक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव व परिवार..!

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

वंदे मातरम्..!

ता.क.: दत्ता घोगरे सर..आता ती बादली कुठे आहे..तेवढे कळवा हो..?😂
फेसबुकवर लिखाण दिनांक:  १ फेब्रुवारी २०१९ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: १ फेब्रुवारी २०२०, शनिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा