चिंतन
" जागतिक पर्यावरण दिन , दीन न होवो...! "🌳🌳🌳
==================================
माणसाला उन्हाची झळ अन् पोटाला कळ लागली की देव आठवतात..! अगदी तसंच बऱ्याच माणसाचं सोयीचं अन् स्वार्थी तत्वज्ञान झाडांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते..!
उन्हाचा तडाखा बसायला लागला की, माणूस झाडांची सावली शोधतो..! पण हीच सावली निर्माण करण्यासाठी माणूस किती पोटतिडकीने प्रत्यक्ष जमिनीवर काम करतो हे फार महत्त्वाचे आहे..! जसं आपल्या महान भारतीय संविधान अंतर्गत बऱ्याच माणसांना अधिकार हवे असतात मात्र कर्तव्य आले की,
" तू हो पुढे मी आलोच मागून..!"
अशी प्रवृत्ती बहुतांशी ठिकाणी आढळते..!
झाडांची सावली प्रत्येकाला हवी आहे पण, झाडांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करायला धावणारे कमी आहेत..! वृक्षारोपण अन् संवर्धन ही लोकचळवळ व्हायला हवी..!
आज औरंगाबाद शहराचा विस्तार मोठा होत आहे.शहराला चारही दिशेने येणारे जे महामार्ग आहेत,त्यापैकी रस्त्याच्या दुतर्फा उंच अन् मोठाली झाडे फक्त औरंगाबाद - पडेगाव ते कन्नड फाटा याच दरम्यान पाहायला मिळतात..! कदाचित काही वर्षानंतर ही झाडे पण मारून टाकल्या जातील..किंवा मरतील..!
या विषयावर जनसहयोग परिवार चे प्रमुख प्रशांत भाऊ गिरे यांचे मत फार विचार करायला लावणारं अन् वास्तवाला धरून आहे, ते असे की,
" पुन्हा वृक्षांची लागवड होईल कदाचित,पण आज जी झाड खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत , तितकं मोठं स्वरूप नवीन वृक्षारोपण करून वाढणाऱ्या झाडांचे कदाचित नसेल..! कारण प्रदूषण युक्त वातावरण..! त्यांना वाढीसाठी जे पूर्वी ३० ते ४० वर्षांपूर्वी निरोगी वातावरण लाभले होते,तितक्या प्रमाणात निरोगी वातावरण आज अजिबात नाही..! त्यामुळं आज वृक्षारोपण केलेल्या झाडांची जरी वाढ झाली तरी त्यांच्या वाढीला मर्यादा पडेल..!"
ज्यांना कुणाला औरंगाबाद शहरालगत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचा हा पर्यावरणीय आनंद याची देही याचि डोळा पाहायचा असेल अशांनी औरंगाबाद ते नाशिक रोडवरील पडेगाव ...कन्नड फाट्यापर्यंत व त्याच्या काही पुढे नक्की पाहून घ्यावा..! कदाचित काही वर्षानंतर आपली पिढी येणाऱ्या पुढील म्हणेल की,
" कोणे एके काळी ,या रस्त्याच्या दुतर्फा उंच,उंच झाडे होती..!"
यावर्षी प्रत्येकाने निदान पाच झाडांचे रोपण करून त्यांचे संवर्धन करावे तरच निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याचा आत्मानंद मिळेल..!
नसता.....
इकडं..तिकडं झाडांची सावली शोधत हिंडावे लागेल..!
असो, " जागतिक पर्यावरण दिन , दीन न होवो असे ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी वेळीच सावध व्हा अन् वृक्षारोपण करून त्यांचे त्याच जोमाने संवर्धन देखील करा ही जन सहयोग परिवार औरंगाबादच्या वतीने कळकळीची नम्र विनंती..!🙏
आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्यानिमित्त याच पर्यावरणाचा जीव जाई पर्यंत उपयोग घेणाऱ्या सर्व मानवजातीला मनःपूर्वक शुभेच्छा..!🌳🌳
वृक्षारोपण व संवर्धन प्रती एक तळमळ : जनसहयोग परिवार औरंगाबाद.
ता.क. - झाडांचे फोटो,औरंगाबाद ते नाशिक रोडवरील पडेगाव -कन्नड फाट्यापर्यंत व काही प्रमाणात थोडे पुढे..या मार्गावरील आहेत.🌳🌳
Click by : चि.नमन नंदन जाधव.
वंदे मातरम्
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ५ जून २०१९






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा