आमचे गाव आमची माणसं..!
आमचा कर्णधार - प्रिय बालमित्र बाळु माळी..!
====================================
कोण म्हणतं जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे..?
यदा कदाचित जगाच्या दृष्टीने महेंद्रसिंग धोनी सर्वश्रेष्ठ कर्णधार असेलही..!
पण नव्वदच्या दशकातील पालखेड येथील आमच्या क्रिकेट संघाचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आमचा खूप जिवलग बालमित्र प्रिय बाळु माळी हाच होता..! हा आमचा प्रिय बालमित्र बाळू माळी नसता तर आमच्या गावातील आमची समकालीन एक पिढी क्रिकेट या खेळातील कौशल्य आत्मसात करू शकली नसती..! आमच्या पालखेड गावातील क्रिकेटचा इतिहास जेंव्हा लिहिला जाईल तेंव्हा तीन ग्रेट माणसांचा उल्लेख त्यात आवर्जून केला जाईल..! त्यात क्रमांक एक वर असतील ऐंशीच्या दशकातील पालखेड गावातील ग्रामसेवक गायकवाड काका, क्रमांक दोनवर असेल आदरणीय शिवाजी भाऊ जाधव आणि क्रमांक तीनवर असेल आमचा तत्कालीन ग्रेट कर्णधार बाळु माळी..!
या आमच्या मित्राच्या कॅप्टनशीप पुढे महेंद्रसिंग धोनी काहीच नाही..!😊 प्रिय बाळु माळी, सध्या जिल्हा परिषद जालना अंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत आहे..! आमच्या या मित्राच्या नेतृत्वाखाली अनेक सामने आम्ही केवळ याच्या कर्णधाराच्या कौशल्याच्या जोरावर जिंकलेले आहेत..! त्यापैकीच एका असाधारण अन् संपूर्ण क्रिकेट विश्वात असा सामना अन् त्याच नियोजन कुणीही केलं नसेल असे आम्ही नव्वदच्या दशकात पालखेड येथे करून दुसऱ्या एका गावात पराक्रम..? केला होता..! मात्र आमच्या चुकीने त्यात आम्ही हरलो होतो..!😊 नव्हे नव्हे आमच्या चुकीच्या कर्माचे ते प्रायचित्तच नियतीने आम्हाला ,आमच्या पराभवाच्या भेटीतून दिले होते..!😔
अर्थात यातील अजुन एक मुख्य जिवंत पात्र होते,त्याच्याशिवाय त्या सामन्याची सत्य कथा पूर्ण होऊच शकत नाही..!😊 प्रिय जिवलग बालमित्र बाळु माळी व अजुन त्या एका मित्राशी त्या काळातील सत्य घडलेल्या प्रसंगावर चर्चा केली आहे..! त्यावर उद्या किंवा परवा लगेच लिहून,लगेच ती सत्य कथा " आमचे गाव आमची माणसं " या सदराखाली फेसबुकवरील माझ्या .....
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
या ब्लॉग वर प्रकाशित करण्यात येईल..!
सर्व वाचक मित्रांनी निव्वळ वाचनाचा आनंद घ्यावा ..!🏏🏏
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक : ९/६/२०२०, मंगळवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा