चिंतन
" एक अवलिया साहित्यिक, कलाकार कादरखान..! "
=================================
समयसूचकता अन् त्या आधारावर अतिशय उत्कृष्ट अभिनय याचे सर्वोत्तम उदाहरण असलेले दोन महान नट आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत झाले आहेत..! त्या नटांपैकी आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत एक होते अन् त्यातील एकजण सध्याला आहे..!
त्यातील एक गोविंदा आहेत अन् दुसरे....कादरखान साहेब..होते..!
त्यातील एक गोविंदा आहेत अन् दुसरे....कादरखान साहेब..होते..!
कादरखान,यांचं आयुष्याची चित्तरकथा जर आपण त्यांच्या मुखातून ऐकली तर आपल्या सारख्या सुखवस्तू कुटुंबातील माणसांच्या , जे भावनाशील असतील त्यांच्या हृदयाचे स्पंदन चिरचिर होऊन जाते..! अगदी कफल्लक कुटुंबातून तावून सुलाखून निघालेल्या या महान कलाकाराचे आयुष्य आज त्या सर्व भारतीयांना पथदर्शक आहे,ज्यांना कोणतेही पाठबळ मिळत नाही..!
कादरखान यांच्या आईने ,त्यांना शिक्षणाचं स्वप्न दाखवलं अन् त्याच मार्गावर अविरत चालण्याचे बाळकडू पाजले..! आपल्या आईचा भक्कम पाठिंबा अन् स्वतची जिद्द या बळावर समस्त भारतीय चित्रपट सृष्टीला एक अवलिया साहित्यिक ,कलाकार मिळाला..! आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून कादरखान साहेब यांनी अख्या भारतीय चित्रपट सृष्टीला नवसंजीवनी प्राप्त करून दिली..!
कादरखान साहेब,यांचे मूळ ठिकाण अफगाणिस्थान..! तिथून त्यांचे सख्खे आई व वडील आपल्या मुंबईत आले. अतिशय दारिद्र्य अवस्थेतील आयुष्य जगण्यासाठी सर्वांचे आयुष्य व्यतीत होऊ लागले.एक दिवस कादरखान यांचे सख्खे आई वडील विभक्त झाले.. अन् त्या निष्पाप निरागस कादरखानचे आयुष्य पुन्हा एकदा त्या अंधकारमय आयुष्यात ढकलल्या गेले..! त्या माऊलीचे दुसरे लग्न झाले.मात्र दुर्दैव येथेच थांबणार नव्हते..! कादरखान यांचे सावत्र वडील काहीही कामधंदा करत नसायचे.पुन्हा बाल कादरखान आपल्या सख्ख्या वडिलांकडे जात असे अन् एक..दोन रुपये मागून आणत असे..! ते आणल्यावर दाल रोटी खायला मिळत असे..! या विषयी कादरखान साहेब यांनी स्वतः अनुभव कथन केले आहे.ते ऐकून अंगावर शहारे येतात अन् डोळ्यात अश्रू..!
कादरखान यांना त्यांच्या आईने आयुष्यात एकच मूलमंत्र दिला अन् तो म्हणजे..." तू पढ..!"
जो मूलमंत्र घेऊन कादरखान साहेब ,आपल्या कफल्लक आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अहोरात्र झटत राहिले..! अखेर त्यांच्या आईने दिलेल्या " तू पढ..!" या मुलमंत्राचा विजय झाला अन् भारतीय चित्रपट सृष्टीला एक अवलिया साहित्यिक कलाकार मिळाला..! हे फक्त साध्य झाले ते शिक्षणामुळेच..! " तू पढ " या मूलमंत्रामूळेच..!

ज्या तरुण वयात इतर मुलं ऐष करत होती त्यावेळी ,त्याच वयात कादरखान साहेब,आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अहोरात्र झटत होते..!त्यांच्या आयुष्यात ज्या वेळी तारुण्याचा आनंद घ्यायला हवा होता तो नाही घेता आला..! कारण पुढील आयुष्य जर सुखी अन् सन्मानाचे जगायचे असेल तर आजच्या माझ्या तारुण्यातील मौजमजा करण्याच्या सवयींना तिलांजली द्यावीच लागेल असा दृढनिश्चय कादरखान यांनी केला होता..! जेंव्हा कादरखान साहेबांच्या आयुष्यात सर्व ऐहीक सुख लाभले तेंव्हा तारुण्य निघून गेले होते..!
शिल्लक राहिल्या होत्या त्या अतिशय कष्टप्रद आठवणी..! त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर...
" जिंदगीने ऐश नहीं कराया..!
जब खाने का वक्त था,तब रोटी नहीं मिली..!
और जब रोटी आयी तो....भूक मर गई..! "
शिल्लक राहिल्या होत्या त्या अतिशय कष्टप्रद आठवणी..! त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर...
" जिंदगीने ऐश नहीं कराया..!
जब खाने का वक्त था,तब रोटी नहीं मिली..!
और जब रोटी आयी तो....भूक मर गई..! "
कादरखान साहेबांच्या असणाऱ्या विनोदी लेखन,अभिनय यावरून एक गोष्ट सहजपणे लक्षात येते की,प्रत्येक विनोदी माणूस,हसमुख माणूस आपल्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक पूर्वाश्रमीचे दुःख घेऊन वास्तवातील जगाला आपले हसरे रूप दाखवत असतो..! वास्तविक अशा जगाच्या दृष्टीने या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक प्रचंड संवेदना असते..! पूर्वाश्रमीची खोलवर रुतलेली वेदना असते..!
अशीच माणसं हसरी का असतात...?
तर माझ्या मते....
अशाच माणसांना सुखाची किंमत माहीत असते..!
अशीच माणसं ,आपल्या पूर्वाश्रमीच्या दुःखाला आजच्या वर्तमानात हसवत असतात..!
अशीच माणसं आपल्या जुन्या दुखांना म्हणत असतात की, " तू खूप भोगले आहे,आता तू हसण्याचा आनंद घे..!"
नियतीने, पूर्वाश्रमीच्या दुःख सोसलेल्या माणसांना एक निसर्गदत्त भेट दिलेली असती अन् ती म्हणजे...

"हमें तो आदत हैं मुस्कुराने की..!
मगर ये भी एक आदत हैं गम छुपानेकी..!!"
आज कादरखान साहेब, या थोर अवलिया साहित्यिक कलाकाराचा स्मृतिदिन आहे..!
( मृत्यू दिनांक: १/१/१९)
त्यानिमित्त त्यांच्या खडतर आयुष्याला विनम्र अभिवादन..!
( मृत्यू दिनांक: १/१/१९)
त्यानिमित्त त्यांच्या खडतर आयुष्याला विनम्र अभिवादन..!
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले
दिनांक: १ जानेवारी २०२०, बुधवार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा