चिंतन
" प्रेमळ अभिनेता, राजेश खन्ना उपाख्य काका...! "
==================================
" ज़िन्दगी के सफर में गुज़र जाते है जो मकाम..
वो फिर नहीं आते..
वो फिर नहीं आते...!"
खरंच या माणसानं, सत्तरच्या दशकात माणसाला भरभरून जगायला शिकवलं..! त्याच बरोबर आयुष्याची चित्तरकथा देखील विविध गाण्यांच्या माध्यमातून व्यक्त केली..!
ज्याला कुणाला अती प्रचंड प्रमाणात नैराश्य आले आहे..त्या इसमाने एकतर आचार्य अत्रे लिखित " मी कसा झालो..!" हे पुस्तक वाचावे किंवा सदाबहार अभिनेता राजेश खन्ना अभिनित " आनंद " चित्रपट पाहावा..! ही दोन उत्कृष्ट औषधे आहेत..स्वतच्या गोड आत्म्याची हत्या करणाऱ्याचा विचार आणनाऱ्यांसाठी..!
" बाबू मोशाय, आनंद मरा नही करते, आनंद मरते नहीं..!"
तरुणांना अन् तरुणींना आपल्या विशिष्ट शैलीमुळे काकांनी आपल्या प्रेमात आकंठ बुडायला लावले होते. एखाद्या अभिनेत्यावरील रसिक प्रेक्षकांतील तरुणींच्या प्रेमाची परिभाषाच काकांनी बदलून टाकली होती. असं वाचण्यात आलं आहे की, त्याकाळी कित्येक तरुणींनी आपल्या रक्ताने काकांना प्रेमपत्रे लिहिली होती. राजेश खन्ना यांची कार निघून गेल्यावर त्याच कारच्या चाकाच्या खाली आलेली माती त्याकाळच्या तरुणी स्वतच्या कपाळावर सौभाग्याचं लेणं म्हणून लावत असे..! एवढं निख्खळ प्रेम फक्त आणि फक्त राजेश खन्ना उपाख्य काकांच्याच वाट्याला आले होते.
हिंदी चित्रपट सृष्टीत असे काही मोजके अभिनेते होऊन गेले अन् आहेत, ज्यांची नृत्यशैली खास त्यांचीच म्हणून ओळखल्या जाते.त्यात प्रामुख्याने स्व.भगवान दादा, धर्मेंद्र आणि स्व. राजेश खन्ना उपाख्य काका..! काकांच्या नाचण्यात एक लाजाळूपणा अन् प्रेमळपणा जाणवायचा.एक हात वर अन् एक हात कमरेच्या बाजूला घेऊन वाकडी मान करून नाचण्याची नजाकत काही औरच असायची काकांची..!👌एखाद्या अभिनेत्यावर तरुणींनी जीवापाड प्रेम करावं अन् ते फक्त आणि फक्त काकांच्या वाट्याला यावं हे एकमेव उदाहरण आहे..! भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीत हे अढळ स्थान काकांच्याच नशिबी अद्याप तरी कायम आहे..!🌹
हाच सर्वांचा प्रेमळ माणूस, त्याच्या सर्वोच्च यशोशिखरावर असताना, हिंदी चित्रपट सृष्टीतील दुसऱ्या सुपरस्टारची म्हणजेच अमिताभ बच्चन यांची दणक्यात एन्ट्री झाली अन् हळूहळू काकांची ती नाजाकत लोप पावत गेली..! आयुष्याच्या शेवटी हा महान अभिनेता एकटाच राहिला..! अगदी मृत्यू पावल्यावर देखील ,त्याच्या जिवंतपणीच्या अजरामर ' आनंद ' चित्रपटातील त्याच्याच मृत्यू नंतरचा संवाद, खऱ्या आयुष्यातील खऱ्या मृत्यू नंतर उपस्थित सर्वांना त्याच्याच इच्छेखातर ऐकवून गेला..!😔
राजेश खन्ना यांना यश पचवता आले नाही.यशाच्या शिखरावर असताना धूम्रपान, कामाच्या प्रती असणारी बेपर्वाई इत्यादी अहंकारी वृत्तीने राजेश खन्ना यांना यशोशिखरावरून प्रेक्षकांनी जमिनीवर आदळवले.
ता.क.: आज राजेश खन्ना उपाख्य काकाजी यांचा स्मृतिदिन आहे..!( मृत्यू दिनांक - १८/७/२०१२ ) त्यानिमित्त राजेश खन्ना उपाख्य काकांना विनम्र अभिवादन..! 🙏🏻🌹
वंदे मातरम्..!
राजेश खन्ना उपाख्य काकांचा एक चाहता :नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: १८ जूलै २०२१, रविवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा