" इसकी वजह बस तुम ही तुम हो..!"
======================================
भारतातील तत्कालीन काळातील जवळजवळ ५६२ संस्थांनांना आपल्या कर्तृत्वाच्या बळावर अखंड भारतात सामील करणारे खरे राष्ट्रपिता सरदार वल्लभभाई पटेल यांची आज दिनांक ३१/१०/२०१९ रोजी जयंती आहे.त्यानिमित्त त्यांच्या अतुलनीय कार्याला विनम्र अभिवादन..!
सरदार वल्लभभाई पटेल जर नसते तर आम्ही मराठवाड्याचे नागरिक कदाचित अजुन एखाद्या पाकिस्तानचे दुर्दैवी नागरिक राहिलो असतो..!पण नियतीने आम्हाला असे होण्यापासून वाचवले..! आम्हा मराठवाडाकरांच्या आजच्या असण्याचे संपूर्ण राजकीय श्रेय सरदार वल्लभभाई पटेल व सामरिक श्रेय तत्कालीन महान भारतीय सैनिकांना जाते..!
" आज हम मराठवाडाकर, भारतीय हैं...!
इसकी वजह बस तुम ही तुम हो..!
बाकी गुलाब के फुल 🌹थे..! "
तसेच आज दिनांक ३१ ऑक्टोंबर २०१९ पासून आपल्या भारतात जम्मू आणि काश्मीर व लडाख ही दोन नवी केंद्रशासित प्रदेश अधिकृतपणे अस्तित्वात आलेली आहेत..!आता भारतात एकूण ९ केंद्रशासित प्रदेश अधिकृतपणे अस्तित्वात आहेत..! याचे संपूर्ण राजकीय श्रेय आपल्या भारताचे सध्याचे महान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय अमित भाऊ शहा यांना जाते..! तसेच सामरिक श्रेय आपल्या महान भारतीय सैनिकांना जाते..! त्याबद्दल या सर्वांचे अंतःकरणातून अभिनंदन..आणि खूप खूप धन्यवाद..!
अखंड भारत अमर रहे..!
अतुल्य भारत..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:३१ ऑक्टोंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा