ढींक चिक ढिंक चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..☺
=================================
आज दिनांक ११/१०/२०१९ रोजी मी रजेवर होतो,कारण माझ्या एका दाढीची देखभाल अन् दुरुस्ती करायची होती.लहानपणी गुळ खूप खाल्ला आताही खातो म्हणा..पण लई कमी..! चहा मात्र ३१ वर्षापासून पीत नाही..! तर...त्या काळात खाल्लेल्या गुळाचा प्रताप एका दाढीवर दिसू लागला होता,म्हणून एका सरकारमान्य दाताच्या दवाखान्यात त्याच दाढीची देखभाल अन् दुरुस्ती करायला गेलो होतो.
तिथं दोन डॉ. भगिनी होत्या.मी तेथील उतरत्या सिट वर अर्धवट स्थितीत जाग्या अवस्थेत झोपलो.माझे तोंड उघडून एक डॉ.भगिनी उपचार करू लागली.माझ्या बाजूलाच एका खुर्चीवर दुसरी डॉ.भगिनी बसलेली होती.ती आपल्या हातातील मोठ्या मोबाईल वर काहीतरी पाहत होती.ही बाजूला बसलेली दुसरी डॉ.भगिनी बहुदा माझ्यावर उपचार करत असलेल्या डॉ. भगिनीनी सिनियर होती..!
माझ्या दाढीवर उपचार सुरू झाला.इतक्यात त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनीचा मोबाईल मध्यम आवाजात खणखणला..अन् त्यावर रिंगटोन वाजू लागली......
"ढींक चिक ढिंक चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"
मी वेदना होत असतानाही काही क्षण आनंदी झालो.माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनी ला काहीतरी समस्या निर्माण झाली अन् त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनिकडे सल्ला घेण्यासाठी गेली..इतक्यात पुन्हा त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनीचा मोबाईल ची आलेल्या कॉल ची बेल वाजली......
"ढींक चिक ढिंक चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"
ती बेल वाजत असतानाच त्यांनी माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनीला योग्य ते मार्गदर्शन केले..अन् पुन्हा आपल्या जागेवर बसल्या मोबाईल पाहत..!
पुन्हा माझ्या दाढीवर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनीला काहीतरी समस्या निर्माण झाली अन् त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनीकडे सल्ला घेण्यासाठी गेली.ती दुसरी डॉ.भगिनी पुन्हा माझ्या कडे आली अन् इतक्यात पुन्हा त्याच डॉ.भगिनीचा मोबाईल ची आलेल्या कॉल ची बेल वाजली......
"ढींक चिक ढिंक चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"
ही बेल सुरू असतानाच माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनी ला मार्गदर्शन करून त्या सिनियर डॉ.भगिनी बाजूला जाऊन बसल्या..!
हे सगळं सुरू असताना माझ्या मनात विचार येत होता की,
यांच्या या...
"ढींक चिक ढिंक चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!" च्या नादात माझ्या जीव की प्राण असणाऱ्या दाढीवर भलताच चुकीचा उपचार झाला तर मला अन्नाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही..!☺
मी उपचार होई पर्यंत गुप गुमाण पडून राहिलो...
"ढींक चिक ढिंक चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"
ही रिंगटोन अधून मधून ऐकत ऐकत..!😂
अखेर माझ्या दाढी वरील उपचार झाला,माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ.भगिनीला " धन्यवाद ताई..!" असे म्हणून बाहेर पडू लागलो इतक्यात पुन्हा त्या बाजूला बसलेल्या डॉ.भगिनीच्या मोबाईल वर पुन्हा मध्यम आवाजात रिंगटोन ऐकू आली.....
"ढींक चिक ढिंक चिक ढींक चिक...हे..हे..हे..हे..!"😂
वंदे मातरम्..!
स्वतः वर अनुभव आलेला लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:११ऑक्टोंबर २९१९,शुक्रवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा