चिंतन
" विधु विनोद चोप्रा..चोखंदळ दिग्दर्शक..!"
===================================
आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत असे मोजके माणसं आहेत की,जे आपल्या कामाच्या प्रती अतिशय चोखंदळपणा बाळगून आहेत,त्यापैकी एक आहेत, ग्रेट दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा..!
विधु विनोद चोप्रा यांचे दिग्दर्शन म्हणजे प्रत्येक कलाकारांकडून सूक्ष्म स्वरूपातील अभिनय कसा करून घ्यावा यातील हे एक अतिशय दुर्मिळ व्यक्तिमत्त्व..!एखाद्या दृध्याचे त्यांच्या मनासारखे जो पर्यंत चित्रीकरण होत नाही तोपर्यंत ते दृश्य अन् ते चित्रीकरण करतच राहणार असे चोखंदळ दिग्दर्शक..! मी माध्यमिक शाळेत असताना माझी जन्मभूमी पालखेड येथील स्व.दौलत काका कुमावत यांच्या घरगुती टी. व्ही.वर व्हिडिओ कॅसेट वर हा चित्रपट पहिला होता..!
काल दिनांक ३/११/१९ रोजी विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या " परिंदा " या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली..! हा चित्रपट विधु विनोद चोप्रा यांच्या कारकिर्दीतील माईल स्टोन..! यात जॅकी श्रॉफ,नाना पाटेकर,अनीलकपुर यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील परमोच्च असाच म्हणावा..! यात विशेष म्हणजे जॅकी श्रॉफ यांचा अभिनय अतिशय सुंदर झालेला आहे..! चित्रपटातील शेवटच्या दृश्यात जेंव्हा नाना पाटेकर जो की यात विकृत गुंड असतो,तो अन् जॅकी श्रॉफ दोघेच एका खोलीत असतात.तेंव्हा नाना जॅकी श्रॉफ ला सांगतात की,मी तुझ्या भावाला ( अनिलकपुर) ला का मारले वगैरे..! हे सांगत असताना जॅकी श्रॉफ यांच्या चेहऱ्यावर एकही संवाद व्यक्त न करता जो अभिनय विधु विनोद चोप्रा यांनी करून घेतला अन् जॅकी श्रॉफ यांनी तो मनाची अतिशय विषण्ण अवस्था व्यक्त करणारा भाव आपल्या चेहऱ्यावर आणला आहे...तो...अतिशय ग्रेट..ग्रेट..ग्रेट..!
हळू आवाजात अन् योग्य आरोह अवरोह यांचा उच्चार करून अतिशय सुंदर अभिनय जॅकी श्रॉफ यांनी परींदा चित्रपटात केला आहे.अर्थात याचे बरेचसे श्रेय ग्रेट दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांना जातेच..!
याच चित्रपटातील अभिनयानं जॅकी श्रॉफ यांनी एक उत्कृष्ठ अभिनय करणारा कलाकार म्हणून प्रस्थापित केले..! विधु विनोद चोप्रा यांच्या पुढील 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटात शुभंकर या व्यक्तिरेखेला देखील जॅकी श्रॉफ यांनी हळू आवाजात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या समोर सादर करून त्यांची मने जिंकली होती..! वास्तविक या चित्रपटात थेट मध्यंतरानंतर जॅकी श्रॉफ ( शुभंकर ) चा प्रवेश होतो..! मात्र मध्यंतरानंतर प्रवेश होऊन देखील 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटात भाव खावून गेला तो जॅकी श्रॉफच..!
ता.क.: सदरील वर्तमानपत्राचे कात्रण आजचे वर्तमानपत्र दिव्य मराठी यातील आहे.त्यात विधु विनोद चोप्रा यांनी
" परिंदा " या चित्रपटाची एक आठवण सांगितली आहे..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ४/११/१९, सोमवार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा