** चिंतन **
पुनीत भूमी, रामेश्वरम् ....एक आठवण..!
______________________________________________
माझ्या आवडीचे तीर्थक्षेत्र..रामेश्वरम्..!
अध्यात्मातील देवाचे देव महादेवाचे.अन् प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीचेे.!
अन्...
माझ्या पिढीने पाहिलेल्या माणसातील देव माणूस..परम वंदनीय अब्दुल कलाम साहेब यांच्या जन्मभूमीचे..!
येथील प्रत्येक कण आणि कण रोमांचित करतो आपल्याला या महान विभूतींच्या वास्तव्य अनुभूतीनीं..!
येथील एक क्षण म्हणजे आपल्या मानवी आयुष्याचे संपूर्ण सार्थक झाल्या सारखे वाटते..तेथील..अदभुत वातावरणांनी..! आपला भारत खरचं समृध्द होता अन् आहे..अशा अनेकानेक रोमांचित करणाऱ्या वास्तव्यांनी...तेथील वास्तव्य केलेल्या महान मानवांनी..!तेथील असलेल्या अध्यात्मिक पवित्र परिसराने..!
रामेश्वरम्...येथे कुठेही जा...तुम्हाला प्रभू रामचंद्र,महादेव भगवान अन् माणसातील देव माणूस, परम वंदनीय अब्दुल कलाम साहेब पदोपदी जाणवतील..!
फक्त ते जाणवणारे जाणीव व जाणीवा असलेले मन असेल तर..
नसता...
रामेश्वरम् फक्त एक फक्त वालुकामय भूमी आहे..पुरुष आणि स्त्री यांच्या वसाहतींची..!अजुन इतर प्राणिमात्रांच्या वास्तव्याची..!
अंतर्मनाने शोधले तर बरेच काही बऱ्याच ठिकाणी सापडते...!
ते जर मानवाच्या बुध्दी मध्ये भरकटत राहिले तर..त्या मानवाच्या बुध्दीच्या पलीकडील असणाऱ्या अदभुत बाबी कदापि जाणवणार नाही..!
एकादा तरी या सर्वांच्या अनुभूती साठी जा.. रामेश्वरम् ला अन् जाणून घ्या...तेथील या सर्वांच्या प्रेमळ,भावूक,श्रद्धेय अनुभूतीची..! जेथे विज्ञान संपते..तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ होते ..याचा अनुभव येणारे तीर्थस्थळ..! विशेष म्हणजे या पुनीत झालेल्या भूमीत अध्यात्म व विज्ञान या दोन्ही अनुभूती जाणवतात..!कारण डॉ.अब्दुल कलाम साहेब विज्ञानाचे तर प्रभू रामचंद्र अन् भगवान महादेव अध्यात्माचे प्रतिनिधित्व येथे करत आहेत. .हे जाणवते..! फक्त ते जाणवणारे मन हवे. ..!
सदरील फोटो रामेश्वरम् येथील त्रिवेणी समुद्र संगम... गंगा सागर, सिंधू सागर व हिंदी महासागर यांच्या त्रिवेणी संगमावरील आहे .!
अतुल्य भारत,
श्रेष्ठ भारत..!
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
छायाचित्र व रामेश्वरम् भेट दिनांक: २७ ऑक्टोबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा