*** आमचे गाव, आमची माणसं..! ***
*** दोन गायकवाडांच्या मध्ये एक जाधव..! ***
________________________________________________
यातील पहिले गायकवाड..(माझ्या उजव्या हाताला) शिवाजी पांडुरंग गायकवाड ..(ह.मु.औरंगाबाद) व दुसरे गायकवाड ..विजय वैजीनाथ गायकवाड..!(ह.मु.वैजापूर) यातील पहिल्या गायकवाडच्या पहिल्यापासून आम्ही प्रेमात आहोत..!वास्तविक पाहिले गायकवाड आमच्या मोठ्या भावासारखे पण आमच्या मैत्रीत हा वयोगट कधी आलाच नाही..! आमचे ते व.पू. काळेच..!चपखल भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान मांडणारा हा माणूस..! पहिला गायकवाड पहिल्यापासून कुशाग्र बुद्धीचा..!पण घरची परिस्थिती बेताचीच होती..!त्यामुळे माध्यमिक शिक्षणानंतर औपचारिक शिक्षणाच्या दुनियादारीत जरा मागे पडले..! पण कुशाग्र बुद्धिमत्ता अशी उगीचच वाया जात नसते..!ती कुठे ना कुठे तरी उपयोगात येतेच..! आज औरंगाबादला स्वतच्या व्यवसायात मस्तपैकी रममाण आहेत..!
या पहिल्या गायकवाडांच्या पालखेड येथील घरी आम्ही उर्वरित दोघांनी १९९६ साली जी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली होती,त्याची चव अजून जिभेवर रेंगाळत आहे..!☺ तशी ऐतिहासिक कोजागिरी पौर्णिमा पुन्हा साजरी होणे नाही..!☺
आमच्या या निदान ऐतिहासिक आडनावे असलेल्या दोन गायकवाडांच्या व एका जाधवांच्या मैत्रीला तुम्हा सगळ्यांतर्फे मानाचा मुजरा..! अहो, चुकलेच की,तुम्हाला न विचारताच तुमच्या वतीने मुजरा देऊन टाकला..! पण जाऊ द्या.. नाहीतरी कुणाही चूळबूळ्या धर्मगुरूंसमोर मग तो कोणत्याही धर्माचा असो ,त्याचा इतिहास व भूगोल न पाहता लोटांगण घेणारी पिढी आपली...! (काही अपवाद ) म्हणून गृहीत धरून मुजरा केला..!
ता.क. वरील तीनही फक्त ऐतिहासिक आडनावे असलेली ऐतिहासिक माणसे, मुळची ऐतिहासिक गाव पालखेड,ता.वैजापूर येथील बलुतेदार..आहेत..! तसेच हा लेख पहिल्या गायकवाडांना समर्पित आहे..!
Shivaji Gaikwad,
वदे मातरम्..!
त्यातील फक्त ऐतिहासिक आडनाव असलेला एक लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत " जाधव "
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दि.२९/८/२०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा