** चिंतन **
" प्रेमळता अन् निष्ठुरता, नियतीच्या दोन बाजू..! "
======================================
मी, आज दिनांक ६ सप्टेंबर २०१९ रोजी भल्या सकाळी नेहमीप्रमाणे भटकंती करायला गेलो होतो.नेहमीच्या रस्त्यावर खूप गोगलगायी हळूहळू आपला मार्ग क्रमन करताना दिसल्या..!त्याच रस्त्याने काही वेळानंतर वाहनांची वर्दळ सुरू होणार होती.मी अलगदपणे बऱ्याच गोगलगायी हळुवारपणे रस्त्याच्या बाजूला सोडून दिल्या..!
पण.....
त्या अदृश्य नियतीने त्या गरीब गोगलगायींना,कुणाच्यातरी मार्फत त्यांचे आयुष्य वाचविले होते,अगदी तसेच आपल्या माणसांचे पण आहे..!
कुणीतरी ,कुणाला तरी वाचवतो,वाचविणे फक्त मृत्यू पुरते मर्यादित नसते तर अनेक प्रसंगी वाचविल्या जाते अन् त्यावेळी एखादं जीवन खुदकन हसते अन् धन्यवाद देते..त्या नियतीला अन् त्या वाचाविणाऱ्या हाताला..!
आता प्रश्न पडतो तो,त्याच रस्त्यावर न वाचलेल्या,कुणीतरी न वाचविलेल्या अन् थोड्या वेळाने वाहनांच्या वर्दळीत चिरडून मरण पावणाऱ्या गोगलगायींचा..! तीच नियती अशा वेळी निष्ठुर होते अन् अक्राळ विक्राळ हास्य करून त्याच नियतीच्या अपत्याच्या मृत्यूवर हसत असते..! इथे फक्त हास्य बदलले असते..!
माझ्या अन् तुमच्या आयुष्यात यापेक्षा दुसरा तो फरक काय..?
मला किंवा अजुन इतरांना कुणीतरी ,कुठेतरी त्याच नियतीने अलगदपणे वाचविले आहे, असेल,किंवा निष्ठुर होऊन मरणाच्या दारात ढकलून दिले असेल...किंवा भविष्यात ढकलून देईल निर्दयीपणे..!अशावेळी जो कुणी मदतीला येतो तो देव..!
( इथे " देव " हा शब्दप्रयोग केल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व एकांगी पुरोगामी ढोंगी कार्यकर्त्यांनी आपला आक्षेप नोंदवू नये.कारण त्यांचा देव व त्याच्या संकल्पना यांना विरोध फक्त आणि फक्त हिंदू धर्मातील बाबींवरच असतो,इतर धर्माच्या बाबतीत त्यांची शेपूट गुंडाळून ठेवल्या जाते..!☺)
अखेर मी बऱ्याच गोगलगायी रस्त्याच्या बाजूला सोडून घराकडे निघालो.विचार त्याच प्रेमळ नियतीचा अन् निष्ठुर नियतीचा मनात घेऊन...!
अधून मधून मागे वळून त्याच रस्त्यावरील चालणाऱ्या गोगलगायींकडे पाहत होतो..! कदाचित यातील सगळ्या किंवा बऱ्याच किंवा काही गोगलगायी यापुढे या नियतीच्या रम्य अशा विश्वात नसतील..! माझे,अन् तुमचे आयुष्य आपेक्षा दुसरे नाही..! अगदी असेच आहे...त्या रस्त्यावरील गोगलगायींसारखे...!
ता.क.: प्रेमळता अन् निष्ठुरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...नियतीच्या...!
वंदे मातरम् ..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ६ सप्टेंबर २०१९, भली मोठ्ठी सकाळ...!
स्थळ: नियतीने ठरवून दिलेले..!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा