**चिंतन **
" गोल गोल फिरून पुन्हा तिथेच..! "
======================================
मी आज दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारनंतर सुट्टी असल्याने घरी निवांतपणे " प्राचीन भारत प्रारंभ ते १२०० " या पुस्तकातील मधील काही प्रकरणे मुद्दामहून पुन्हा वाचली..!
(हे पुस्तक मी माझ्या सध्याच्या अंधारी प्रशालेतील काही विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी विकत घेतले होते)
त्यातून एकच निष्कर्ष काढला...
ज्यांनी ज्या पद्धतीने भले त्या राजांचे राज्य कीर्तिवंत होते तरी पण ते स्थापन करण्यासाठी रक्तरंजित संघर्ष केला तेंव्हा कुठे ते बलाढ्य साम्राज्य उभे राहिले..!
पण.....
त्याच साम्राज्याची अखेर कित्येक पिढ्यानंतर त्याच रक्तरंजित घटनांनी होऊन तेच साम्राज्य लयाला गेले..! शेवटी जिथून निघाले तिथेच येऊन पोहचले..! नियतीने बरोबर गोल गोल फिरवून पुन्हा जिथून निघाले होते तिथेच आणून सोडते..!
हेच निकष वेळोवेळी आधुनिक भारताच्या इतिहासात थेट आज पर्यंत देखील पाहायला मिळाले मिळत आहेत..! त्या..त्या घटनांकडे काहींनी निष्पक्षपणे पाहिले नाही किंवा हुजरेगिरी करण्याच्या मानसिकतेने त्या..त्या घटनांकडे मुद्दामहून डोळेझाक करण्यात आली..! पण नियतीने संबंधितांचे निरीक्षण करण्यात अन् जिथून निघाले तिथे पुन्हा संबंधिताला आणून सोडण्यात कधीही कुचराई केली नाही अन् भविष्यात करणार देखील नाही..!
आजकाल किंवा प्राचीन काळात किंवा मध्ययुगीन काळात ज्या ज्या घटना रक्तरंजित किंवा कुणाला तरी त्रास देऊन स्थापन झाल्या किंवा निर्माण झाल्या, त्या सर्व मानवी घटकांना देखील नियतीने पुन्हा गोल गोल फिरवून पुन्हा जिथून निघाले तिथेच आणून सोडले..! हा सत्य स्वरूपातील इतिहास आहे..!यावर ज्यांना कुणाला शंका येत असेल अशांनी आजकालच्या काळात अती दुर्मिळ होत चाललेल्या निवांतपणा याला प्राधान्य देऊन त्या त्या काळातील संदर्भ असलेले पुस्तकं शांत मनाने अन् सर्वात महत्त्वाचे निष्पक्षपणे वाचली तर हे सहज लक्षात येईल..!
माझे जन्मगाव पालखेड ता.वैजापूर येथे देखील अनेकांना असेच नियतीने असेच गोल गोल फिरवून पुन्हा जिथून निघाले तिथेच आणून सोडले असे उदाहरणे माझ्या पिढीने पाहिले आहे अन् भविष्यात कदाचित त्याच नियतीच्या गर्भात गोल गोल फिरवून पुन्हा जिथून निघाले तिथेच येऊन नियातिसमोर सपशेल शरणागती पत्करली असे उदाहरणे होणार यात तिळमात्र शंका नाही..! हाच निकष इतरत्र सर्व क्षेत्रात देखील लागू नक्की पडतो..!
कारण नियतीने संबंधितांचे निरीक्षण करण्यात अन् जिथून निघाले तिथे पुन्हा संबंधिताला आणून सोडण्यात कधीही कुचराई केली नाही अन् भविष्यात करणार देखील नाही..!
ता.क.: नियती जगातील सर्वोत्कृष्ट गुरु आहे..सर्व सजीवांची..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १४ सप्टेंबर २०१९, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा