चिंतन
" असे मराठी भक्तीगीत पुन्हा होणे नाही..! "
===============================
" अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला,बोला जय जय हनुमान | "
महान चित्रपट अभिनेते शाहीर दादा कोंडके यांचे चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदान कुणीही विसरू शकत नाही..!
शाहीर दादा कोंडके म्हंटले की, आपल्या नजरेसमोर येतात फक्त त्यांचे द्विअर्थी संवाद..! मात्र याच महान कलाकाराने मराठी भक्ती गीतांमध्ये शिरपेचात मानाचा जय जयकार केला तो , " तुमचं आमचं जमलं " या मराठी चित्रपटातील खालील भक्तीगीताने..! महान गायक महेंद्र कपूर, संगीतकार - राम लक्ष्मण अन् सादरीकरण शाहीर दादा कोंडके यांनी या भक्तीगीताला महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात नेऊन पोहोचविले..!
" अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला,बोला जय जय हनुमान | "
आम्ही लहानपणी पालखेड गावातील वेशीजवळील हनुमान मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी हे भक्ती गीत हमखास ऐकायचो..! या भक्ती गीताची थोरवी एवढी उत्तुंग आहे की,तुलसीदास रचीत श्री हनुमान चालिसा या भक्ती स्तोत्राच्या तोडीस तोड यात भक्तिरस
ओथंबून वाहतो..! हे गीत प्रत्येक मराठी माणसापर्यंत ,विशेषकरून खेड्यातील सर्व सामान्य माणसांच्या हृदयात कायमचे भक्तिभावाने स्थान मिळवून विराजमान आहे..!
असो,
आज हनुमान जयंती आहे..!
त्यानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
बोला बजरंग बली की जय..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : ८ एप्रिल २०२०, बुधवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा