मला प्रवासात भेटलेली माणसं..!
मितभाषी मित्र ,प्रिय विनोद गायकवाड सर..!
================================
इ. स.२००६ नंतरच्या लासुरगाव केंद्रांतर्गत शिक्षकांपैकी मला वैयक्तिक प्रिय विनोद बाबुराव गायकवाड या नवतरुण शिक्षकाचा फार अभिमान वाटायचा..! तसा इतरही नवतरुण शिक्षकांच्या कार्याचा अभिमान अन् कौतुक वाटायचंच पण विनोद गायकवाड सरांनी सुरुवातीच्या काळात जबाबदारी घेऊन ती यशस्वीपणे हाताळली त्यामुळं त्यांचं विशेष कौतुक वाटायचं..!
मी याविषयी माझा खूप जिवलग शिक्षक मित्र प्रिय रामेश्वर राऊत याच्या जवळ याविषयी व्यक्त देखील झालेलो आहे.
मला प्रिय विनोद गायकवाड सरांचा अभिमान अन् कौतुक जास्त वाटायचे कारण असे की, यांना नुकतीच जून २००६ मध्ये प्रथम नेमणूक मौजे उंदीरवाडी,के. लासुरगाव ता. वैजापूर येथे मिळाली होती.अगदी नवीनच प्रारंभ,त्यात दुसऱ्या जिल्ह्यातली व्यक्ती, परिसरात ना कोणत्या नातेवाईकांचा आधार ना कुणाशीही ओळखपाळख..! तरी देखील प्रिय विनोद गायकवाड सरांनी जबाबदारी स्वीकारून सदरील शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पद स्वीकारले..! नुसतेच स्वीकारले नव्हते,तर जि.प.प्रा.शा.उंदीरवाडी शाळेला वैभव प्राप्त करून दिले..! मात्र कधीही ही व्यक्ती मुद्दामहून प्रकाशाच्या झोतात आली नाही..! आपण भलं अन् आपलं काम भलं या उक्तीप्रमाणे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहिली..! ही व्यक्ती कामालाच पुरस्कार मानून कार्य करत राहिली..! अगदी नवीन परिसर,प्रशासकीय कामाचा काहीही अनुभव पाठीशी नव्हता, ना इतर कोणतं मानसिक पाठबळ पाठीशी होत..! तरी देखील प्रिय विनोद गायकवाड सरांनी अतिशय उत्कृष्ट कार्य ,एक मुख्याध्यापक व एक वर्गशिक्षक म्हणून यशस्वीरीत्या सांभाळले होते..!
नोकरीच्या आयुष्यात अगदी सुरुवातीच्या काळात मुख्याध्यापक पदाची जबाबदारी घेऊन सोबतच वर्गशिक्षक म्हणून देखील आपल्या मितभाषी स्वभावाने
बौध्दीक,प्रशासकीय,विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून अमीट छाप प्रिय विनोद गायकवाड सरांनी तत्काळातील लासुरगाव केंद्रांतर्गत पाडली होती.
एक शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे अनेक पाहिले पण मुख्याध्यापक हे अतिशय जबाबदारीचे पद घेऊन सोबतच एक शिक्षक म्हणून यशस्वी होणारे शिक्षक दुर्मिळच असतात.त्यात प्रिय विनोद बाबुराव गायकवाड सरांचा अभिमानाने अन् कौतुकाने आवर्जून उल्लेख करावा वाटतो..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक :१५/४/२०२०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा