शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र. ६ 🛑मगध साम्राज्याचा उदय🛑



🔵प्राचीन भारत, भाग क्रमांक - ६🔵

🛑मगध साम्राज्याचा उदय🛑
=================================

🔴सोळा महाजनपदे🔴

🔶कुरू, पांचाल,शुरसेन, मत्स्य, चेदी, कोसल, काशी,मगध,व्रिजिका,मल्ल,वत्स,अंग,अवंती,अश्मक,
गांधार व कांभोज.

(१) ♦️बिंबिसार ( इ.स.पूर्व ५४३ ते इ.स.पू. ४९१)♦️

◼️बिंबिसार इ.स.पूर्व ५४३ मध्ये गादीवर.
◼️बिंबिसारची पाहिली पत्नी, कोसल राजा प्रसेनजितची बहीण.
◼️गौतम बुद्ध व वर्धमान महावीर या दोघांशी बिंबिसारचे जिव्हाळ्याचे संबंध.
◼️बिंबिसारने बौद्ध धर्म स्वीकारला.

(२) ♦️आजातशत्रू ( इ.स.पूर्व ४९१ ते इ.स.पू. ४५९)♦️

◼️आजातशत्रू हा बिंबिसारचा मुलगा.
◼️कर्तबगार व महत्वकांक्षी.
◼️इ.स.पू. ४५९ मध्ये मरण पावला.

(३) ♦️दर्शक ♦️

◼️आजातशत्रू नंतर त्याचा मुलगा दर्शक याने २४ वर्ष राज्य केले.

(४) ♦️उदयभद्र♦️

◼️दर्शक नंतर त्याचा मुलगा उदयभद्र गादीवर आला.

______________________________________

(१)   ♦️शिशुनाग वंश♦️

◼️उदयभद्रची सत्ता शिशुनाग याने बळकावली व शिशुनाग वंशची सत्ता स्थापन केली.
◼️शिशुनागने मगध ची सत्ता बलिष्ठ केली.

(२) ♦️कालाशोक

◼️पाटलीपुत्र परिसरात कालाशोकचा खून होऊन नंद घराणे मगधच्या गादीवर आले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🛑नंद घराणे🛑

(१)  🔵महापद्मानंद🔵

🔘हा नंद घराण्याचा संस्थापक.

(२) 🔵धनानंद🔵

🔘हा नंद घराण्याचा शेवटचा राजा.
🔘अत्यंत लोभी, जुलूमी,
🔘धनानंद च्या कारकिर्दीत वायव्य भारतावर ग्रीक सम्राट अलेक्झांडर ने इ.स.पू. ३२६ मध्ये आक्रमण केले.
🔘चंद्रगुप्त मौर्य याने वायव्य भारतातील राजे व कौटिल्य ( आर्य चाणक्य ) यांच्या मदतीने धनानंद विरूद्ध लष्करी क्रांती केली.
🔘इ. स. पू.३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या हातून नंद घराण्याचा शेवट झाला.

==================================

वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵दिनांक: ९ एप्रिल २०२०, गुरुवार

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा