मला प्रवासात भेटलेली माणसं
" प्रिय प्रभाकर मित्रा..!"
===================================
प्रिय सम विचारी मित्र प्रभाकर,
कोणत्याही सार्वजनिक सामाजिक चळवळीत, स्वतः ला निर्व्यसनी ,धार्मिक बाबतीत ठाम ठेवून जीवन व्यतीत करणे आजकाल खूप दुरापास्त झाले आहे..! मित्रा,प्रभाकर..तू याला नक्कीच अपवाद आहेस..!तू तुझ्या या व्रतस्थ वर्तनावर आजही कायम आहेस,याचा ,तुझा जुना मित्र व जय बाबाजी भक्त परिवार मधील एक गुरु बंधू म्हणून तुझा,मला खूप खूप अभिमान वाटतो मित्रा प्रभाकर..!
जसं हाय..फाय प्रोफाईल लाईफ मध्ये पेज थ्री च्या अनेक रंगी बेरंगी बातम्या ज्या वास्तवातील असतात त्या आपण नेहमी पाहत असतो..! असेच काहीसे विविध सामाजिक, संघटनेच्या माध्यमातून काम करताना रात्री १० नंतरची कुठेतरी बसलेली विविध नेत्यांची संस्कृती देखील बऱ्याचदा दिसते..! या रात्रीच्या ओल्याचिंब , झिंगाट, खारट शेंगदाणे ,फुटाणे सह साजऱ्या होणाऱ्या पार्ट्यांना देखील तू अपवाद...!आणि हे आजकाल खूप आवश्यक आहे नेता होण्यासाठी..! तू इथेही अपवाद आहेस मित्रा..!
जे नेतेमंडळी असलं काही करत नाहीत ते ग्रेटच आहेत..! अगदी तुझ्या सारखे..!
आपण,आपला प्रारंभचा शिक्षकी आयुष्यातील कालखंड लासूरगाव , ता.वैजापूर येथून सोबतच पाहिला आहे..! तसे आपण दोघे भौगोलिदृष्ट्या शिव भाऊ..! माझी नेमणूक पहिल्यांदा तुझ्याच जन्मगावी जळगाव, ता.वैजापूर या गावी झाली..!लासुरगाव केंद्रांतर्गत गतकाळातील अनेक मित्र , त्यात काहीजण वयाने ज्येष्ठ होते पण आपल्याला खूप समजून घेणारी ती भली माणसं होती..! उदा.स्व. सावळे सर, स्व.टोणपे सर, स्व.बनकर सर, स्व.जाधव सर, स्व.जोशी सर ( सर्वजण लासूरगाव येथील ) सोबत होते,त्यातील काहीजण, आपल्याला सोडून देवाघरी गेले ,तर काहीजण दुसरीकडे गेले तर काहीजण आजही सोबत आहेत..!
एकमात्र नक्की,आपल्याला आदरणीय टोणपे सरांनी जो जीव लावला होता,त्याची आठवण पदोपदी येते. स्व.टोणपे सर, तुला अन् मला नेहमी म्हणायचे...
" तुम्हीं दोघं ना लई घाई करतात,थोडी तरी शांतता ठेवा..!"
टोणपे सरांच्या सारखे जीव लावणारे मुख्याध्यापक भेटणे दुर्मिळच..! आपली ती बॅच एका अर्थाने नशीबवान म्हणायला हवी..! कारण इ. स.१९९५ ते जवळपास २००५ पर्यंत ,आपल्या सगळ्या नवतरुण शिक्षकांच्या आयुष्यात वरील उल्लेख केलेल्या ज्येष्ठ शिक्षकांचं सानिध्य मिळाले..! आता तेवढी पोक्त विचारांची अन् आपल्या वयाच्या ज्येष्ठतेचा अभिमान न बाळगता कनिष्ठ शिक्षकांमध्ये हसून खेळून मिसळणारी शिक्षक मंडळी देखील दुर्मिळच झाली आहे..!
असो,मित्रा प्रभाकर..!
जसा आहेस...तसाच राहा हीच आपले गुरु संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज, (वेरूळ) यांच्या चरणी प्रार्थना..!
जय बाबाजी..!
वंदे मातरम्..!
तुझा मित्र: शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन: दिनांक ७ मे २०१९


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा