🛑 प्राचीन भारत, भाग क्रमांक : १५🛑
🛑 वर्धन घराणे 🛑
=================================
🔶गुप्त साम्राज्याचे पतन होत असताना भारतात अनेक राज्ये उदयाला आली.
🔶अंबाला जिल्ह्यातील कुरुक्षेत्राच्या स्थानेश्वर येथे वर्धन घराणे उदयाला आले.
१)♦️ वर्धन घराण्याचा संस्थापक पुष्यभुती होता.
हा शैव होता.♦️
२) ♦️आदित्यवर्धन ♦️
याचा विवाह गुप्त घराण्यातील महासेनगुप्ता हिच्याशी झाला.
३) ♦️प्रभाकरवर्धन♦️
🔘प्रभाकरवर्धन हा आदित्यवर्धन यांचा मुलगा होता.
याने हूणांचा पराभव केला.
🔘प्रभाकरवर्धन याला राज्यवर्धन व हर्षवर्धन ही दोन मुले व राजश्री ही कन्या होती.
४) ♦️राज्यवर्धन♦️
🔘हूणांचे पारिपत्य करण्यासाठी प्रभाकरवर्धन याने आपल्या राज्यवर्धन व हर्षवर्धन या दोन्ही मुलांना पाठवले.
🔘इकडे आजारपणामुळे प्रभाकरवर्धन इ. स.६०५ मध्ये मृत्यू पावला.
🔘हर्षवर्धन वर राजधानी स्थानेश्वरच्या रक्षणाची जबाबदारी सोपवून राज्यवर्धन हा माळव्याचा देवगुप्त यांच्यावर चालून गेला व त्याला पराभूत केले.
🔘वंग देशाचा (गौड पूर्व बंगाल ) चा राजा शशांक याने विश्वासघाताने राज्यवर्धन याचा खून केला.
_______________________________________
५) ♦️सम्राट हर्षवर्धन ( इ. स.६०६ ते ६४७)♦️
🔘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी गादीवर आला.
🔵साम्राज्यविस्तार🔵
🔘इ.स.६३४ पर्यंत सम्राट हर्षवर्धन याने काश्मीर ते आसाम आणि नेपाळ पर्यंत अधिपत्य स्थापन केले.
🔘कनोज ही त्याची राजधानी होती.
🔵प्रशासन व्यवस्था🔵
🔘सम्राट हर्षवर्धन हा अतिशय कर्तव्यदक्ष राजा होता.
कल्याणकारी योजना अमलात आणल्या.
🔵हर्षाचा धर्म🔵
🔘भारतीय धर्मसहिष्णुतेचे उत्तम उदाहरण वर्धन घराणे होय.
🔘राज्यवर्धन व त्याची बहीण राजश्री हीनयान बौद्धपंथी होते.
🔘सम्राट हर्षवर्धन हा शिवोपासक होता.
🔘बन्सखेर व मधुबन आलेखावरुन इ.स.६३१ पर्यंत हर्ष
' परम माहेश्वर ' म्हणजेच शिवाचा उपासक होता.
🔘सम्राट हर्षवर्धन याची बहीण राजश्री यांच्या सहवासात हर्षचा कल बौद्ध धर्माकडे झुकला.
🔘आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात बौद्ध धर्मातील महायान पंथाकडे झुकला.
🔘तरीही शासकीय कागदपत्रांतून हर्ष स्वतः ला ' माहेश्वर '
असे म्हणवून घेत होता.
🔘हर्ष हा सूर्य, शिव आणि बुद्ध या तिघांचाही भक्त होता.
🔵सांस्कृतिक स्थिती - नालंदा विद्यापीठ🔵
🔘हर्षाच्या काळात विद्येला खूप महत्त्व होते.
🔘याच्याच काळात नालंदा विद्यापीठ जगविख्यात केंद्र होते.
🔘देशविदेशातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी येत.
दहा हजार विद्यार्थी व पंधराशे शिक्षक येथे होते.
वेद, बौद्ध तत्त्वज्ञान,पुराणे, जैन तत्वज्ञान यांचाही अभ्यास येथे होत असे.
🔵योग्यता🔵
🔘रत्नावली,प्रियदर्शिका व नागानंद ही तीन नाटके हर्षवर्धन याने लिहिले.
🔘इतिहासकार डॉ. आर.के.मुखर्जी यांच्या मते हर्षवर्धन हा समुद्रगुप्त व अशोक यांचे मिश्रण होता.
🔘त्याने महायान बौद्ध धर्माचा स्वीकार केला असला तरी सूर्याचा व शिवाचा देखील उपासक होता.
🔘दर पाच वर्षांनी गंगा यमुना नदीच्या तीरावर ७५ दिवस चालणारी महामोक्ष परिषद हर्ष भरवत असे.
या परिषदेत हर्ष पाच वर्षाची शिल्लक संपत्ती दानधर्म करून वाटत असे.
🔘सम्राट हर्षवर्धन याच्या संपूर्ण कामगिरी चा जरी विसर पडला तरी एकटे नालंदा विद्यापीठ त्याच्या कीर्तीची,वैभवशाली राजवटीची,साक्ष देण्यास समर्थ आहे.
==================================
🔵वंदे मातरम्..!
🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक: २० एप्रिल २०२०, सोमवार.
क्रमशः


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा