🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २९ 🛑
⚫ अरबांचे आक्रमण , भाग क्रमांक- ३ ⚫
===================================
🛑 अरबांचा साम्राज्यविस्तार प्रयत्न 🛑
◼️ इ.स.७१४ मध्ये इराकचा सुभेदार हज्जाज वारला.
◼️ इ. स.७१५ मध्ये गादीवर आलेल्या नव्या खलिफाचे हज्जाजशी शत्रुत्व असल्याने त्याने महंमद बिन कासिमला वापस बोलाविले.हज्जाजच्या इतर अनुयायांबरोबरच महंमद बिन कासिमलाही हज्जाज वरील सुड म्हणून ठार मारण्यात आले.
◼️ सिंधची सत्ता आता जुनैद नावाच्या सरदाराला हाती आली.
◼️ जुनैद याने साम्राज्यविस्तार करण्याच्या दृष्टीने राजस्थान,मध्य भारत,गुजराथ,काशीच्या सरहद्दी पर्यंत आणि कनोजच्या सरहद्दी पर्यंत आक्रमणे केली.
◼️ काश्मीरचा राजा ललितादित्य मुक्तापीड,अवंतीचा प्रतिहार राजा नागभट्ट,कनोजचा यशोवर्मन, लाट ( दक्षिण गुजराथ ) राजा अवनिजनाश्रय पुलकेशी यांनी अरबांच्या आक्रमणाला पिटाळून लावले.
_______________________________________
🔴 अरबांच्या विजयाची कारणे 🔴
◼️दाहर राजाने देवल बंदराच्या व शहराच्या सरक्षणाची चोख व्यवस्था ठेवली नव्हती,ही त्याची चूक होती.
◼️ अरबांच्या सिंध मधील विजयाला फितूर नागरिकांची परकियांना साथ करण्याची अदुरदृष्टी.
◼️ दाहर वैदिक धर्माभिमानी होता तर सिंध मधील बहुसंख्य प्रजा बौध्द धर्मीय होती.बौद्ध धर्मामुळे जनता अहिंसक वृत्तीची बनली होती.
◼️ शौर्याचा अभाव नसतानाही केवळ हिंदू धर्मातील अंधश्रद्धेपोटी देवलच्या जनतेने पराभव पत्करला.
भारतीय जनतेत अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा,शकून अपशकुनाचे प्राबल्य प्रचंड प्रमाणात होते
◼️ सिंध हे हिंदू राज्य महंमद बिन कासिम गिळंकृत करत होता तेंव्हा उत्तर भारतातील एकही राजा सिंधच्या
बचावासाठी दाहर राजाच्या मदतीला आला नाही.
🛑 सिंध मध्ये दोन मोठी राज्ये होती.उत्तर सिंध मध्ये मुलतान आणि दक्षिण सिंध मध्ये मन्सुरा.
🛑 इ.स.१०११ मध्ये महमूद गझनीने मुलतान जिंकून गझनी राज्यास जोडले.
🛑 सिंध मधील अरबी सत्तेचा शेवट मुहम्मद घौरी याने केला.
🛑 इ. स.७१२ मध्ये महंमद बिन कासिम याच्या सिंध विजयाची परिणीती बाराव्या शतकाच्या अखेरीस उत्तर भारतात मुस्लिम राज्याच्या स्थापनेत झाली.पुढे दिल्ली सल्तनतीचे अलाउद्दीन खिलजीच्या काळात साम्राज्यात रूपांतर झाले.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: १३ मे २०२०, बुधवार
🔴 प्राचीन भारत- अरबांचे आक्रमण समाप्त
प्राचीन भारत क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा