🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक ३०🛑
🔵 गुर्जर प्रतिहार घराणे 🔵
===================================
गुर्जर प्रतिहार वंशाच्या शाखा जोधपूर,नंदिपुर,भडोच आणि उज्जयिनी येथे अस्तित्वात होत्या.
१) ♦️नागभट्ट पहिला ( इ.स.७३० ते ७५६)♦️
🔘 उज्जयिनी येथील राजा नागभट्टा पहिला याने प्रतिहारांच्या घराण्याचा विस्तार केला.
🔘 नागभट्टा पहिला याच्यानंतर सत्तेत आलेल्या कक्कुक आणि देवराज यांनी कोणतीही महत्त्वपूर्ण कामगिरी केली नाही.
२) ♦️ वत्सराज ( इ.स.७७८ ते ८०५)♦️
🔘 देवराज नंतर वत्सराज महत्वकांक्षी राजा उज्जयिनी गादीवर आला.
३) ♦️नागभट्ट दुसरा ( इ. स.८०५ ते ८३३)♦️
🔘 वत्सराज यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा नागभट्टा दुसरा गादीवर आला.हा अतिशय पराक्रमी व महत्वकांक्षी होता.
🔘 नागभट्टा दुसरा याने अल्पावधीतच उत्तर भारतात गुर्जर प्रतिहारांचे प्रबळ साम्राज्य निर्माण केले.
४) ♦️ रामभद्र (इ. स.८३३ ते ८३६) ♦️
🔘 नागभट्ट दुसरा यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा रामभद्रा गादीवर बसला. याने केवळ तीन वर्षे राज्य केले.तो दुर्बल होता.
५) ♦️मिहीरभोज ( इ.स.८३६ ते ८८५)♦️
🔘 रामभद्र यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा मिहीरभोज गादीवर आला.
🔘 मिहीरभोज हा शक्तिशाली आणि महत्वकांक्षी राजा होता.
🔘 याने उत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण केली.
६) ♦️महेंद्रपाल पहिला ( इ.स.८८५ ते ९१०)♦️
🔘 मिहीरभोज यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा महेंद्रपाल पहिला हा कनोज गादीवर आला.
🔘 यांच्या कारकिर्दीत इ. स.९०० च्या सुमारास गुर्जर प्रतिहार घराण्याची सत्ता उत्कर्षाच्या परमोच्च बिंदू वर पोहोचली होती.
७) ♦️महिपाल (इ.९१२ ते ९४४)♦️
🔘 महेंद्रपाल पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा दुसरा भोज गादीवर आला.
🔘 महिपाल यांच्या कारकिर्दीत गुर्जर प्रतिहार समाराज्याच्या विघटनाला सुरुवात झाली.
🔘 महिपाल नंतर महेंद्रपाल दुसरा, देवपाल, विनायकपाल दुसरा, महिपाल दुसरा आणि विजयपाल या दुर्बल शासकांच्या काळात गुर्जर प्रतिहार साम्राज्याचे विघटन अत्यंत वेगात झाले.
🔘 इ. स.९६३ मध्ये राष्ट्रकुट सम्राट कृष्ण तिसरा याने आक्रमण करून गुर्जर प्रतिहार घराण्याची उरली सुरली सत्ताही नष्ट केली.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: १५ मे २०२०, शुक्रवार
🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा