🔵 प्राचीन भारत भाग क्रमांक :१२ 🔵
🛑 गुप्त साम्राज्य, भाग क्रमांक : २ 🛑
==================================
७ ) ♦️पहिला कुमारगुप्त ( इ.स.४१४ ते ४५५)♦️
🔘चंद्रगुप्त दुसरा उर्फ चंद्रगुप्त विक्रमादित्य ' यांचा मुलगा कुमारगुप्त होय.
🔘वैदिक धर्माचा अभिमानी होता.
🔘वडिलोपार्जित साम्राज्य कुशलतेने सांभाळले.
🔘उत्तम प्रशासक.
🔘याच्याच काळात भारताच्या वायव्य भागात क्रूर हुण टोळ्या धडका मारू लागल्या.
🔘कुमारगुप्त चा मुलगा स्कंदगुप्त हा क्रूर हुण टोळ्यांच्या पारिपत्यासाठी मोहिमेवर गेला.
🔘इ. स.४५५ मध्ये कुमारगुप्त मरण पावला.
८) ♦️स्कंदगुप्त ( इ.स.४५५ ते ४६७ )♦️
🔘हिमालय ते नर्मदा आणि पश्चिम किनारा ते पूर्व किनारा या विशाल गुप्त साम्राज्याचा वारसा मिळाला होता.
🔘इ. स.४५७ ते ४५८ मध्ये हुणांची टोळी हिंदुकुश पर्वत ओलांडून भारतात घुसली.
🔘स्कंदगुप्त याने अविश्रांत मेहनत घेऊन या क्रूर रानटी टोळीला बेदम झोडपून काढले होते.
🔘या विजयाच्या प्रीत्यर्थ स्कंदगुप्त याने काशी जवळ भितरी येथे एक विष्णुध्वजस्तंभ उभारुन त्यावर आपला किर्तीलेख कोरून ठेवला आहे.
🔘स्कंदगुप्त हा शेवटचा शक्तिशाली गुप्त सम्राट होय.
🔘तो विष्णूचा उपासक होता.
🔘धार्मिक बाबतीत सहिष्णु होता.
🔘इ. स.४६७ मध्ये मरण पावला.
९) ♦️पुरुगुप्त ( इ. स.४६७ ते ४७३ )♦️
🔘सम्राट कुमारगुप्त ला स्कंदगुप्त व पुरुगुप्त ही दोन मुले होती.
🔘पुरुगुप्त हा कुमारगुप्तच्या अनंतदेवी या पत्नीचा मुलगा)
पुरुगुप्त हा त्याच्या वृद्धापकाळी सत्तेत आला.
🔘याच्या कारकीर्दीत असंतोष माजला.
१०) ♦️दुसरा कुमारगुप्त ( इ. स.४७३ ते ४७६) ♦️
🔘पुरुगुप्तच्या मृत्यू नंतर स्कंदगुप्तचा मुलगा, दुसरा कुमारगुप्त हा गुप्त गादीवर आला.
🔘याने तीन वर्षे राज्यकारभार केला ( इ. स.४७३ ते ४७६)
११) ♦️बुधगुप्त ( इ.स.४७७ ते इ.स.५००)♦️
🔘बुधगुप्त हा पुरुगुप्त व त्याची पत्नी चंद्रादेवी चा मुलगा होय.
🔘हा अतिशय पराक्रमी होता .
🔘त्याचे अभिलेख दामोदपूर ( उत्तर बंगाल ) ,सारनाथ आणि एरण येथे मिळाले आहेत.
१२) ♦️नरसिंहगुप्त ' बालादित्य '♦️
🔘बुधगुप्तच्या मृत्यू नंतर त्याचा लहान भाऊ नरसिंहगुप्त ' बालादित्य ' हा मगध गादीवर आला.
🔘हूनांची आक्रमणे होत राहिली.
१३) ♦️तिसरा कुमारगुप्त ♦️
🔘नरसिंहगुप्त ' बालादित्य ' यांच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा
तिसरा कुमारगुप्त हा गादीवर आला.
१४) ♦️विष्णुगुप्त ♦️
🔘तिसरा कुमारगुप्त च्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा विष्णुगुप्त हा गादीवर आला.
🔘विष्णुगुप्त नंतर कोणत्याही गुप्त राजांची माहिती मिळत नाही.
🔘इ. स.५५० मध्ये भारतात सर्वात जास्त दीर्घकाळ सत्तेत असलेल्या राजवंशाचा शेवट झाला.
==================================
🔵वंदे मातरम्..!
🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक: १७ एप्रिल २०२०, शुक्रवार
क्रमशः



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा