🔵प्राचीन भारत, भाग क्रमांक : ८🔵
🛑बिंदुसार - इ. स.पूर्व २९८ ते इ. स.पूर्व २७३🛑
🔶राजश्री अशोक - इ. स.पूर्व २७३ ते इ. स.पूर्व २३६🔶
==================================
🛑बिंदुसार - इ. स.पूर्व २९८ ते इ. स.पूर्व २७३🛑
🔘बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा.
🔘बिंदुसार ने त्यांच्या हयातीत साम्राज्यविस्तार केला नाही.
मात्र आपल्या पित्याच्या विशाल साम्राज्याचे रक्षण केले.
♦️सुषिम♦️
🔘हा बिंदुसारचा मोठा मुलगा,तक्षशिलेचा शासक होता.
🔘तक्षशिलेत बंड झाले.बंडाचा बीमोड करण्यात अपयशी.
🔘बिंदुसारने बंडाचा बीमोड करण्यासाठी आपला दुसरा मुलगा अशोक यावर जबाबदारी सोपवली.
🔘अशोकाने तक्षशिला येथील बंड मोडून काढले.
🔘पंच्चविस वर्षाच्या कारकिर्दीनंतर बिंदुसार इ. स.पूर्व २७३मध्ये मरण पावला.
_________________________________________
🔶राजश्री अशोक - इ. स.पूर्व २७३ ते इ. स.पूर्व २३६🔶
◼️बिंदुसारने आपल्या हयातीत अशोकला गादीचा वारस जाहीर केले होते.
◼️बिंदुसारच्या मृत्यूनंतर दोन गट पडले.
◼️एक गट मोठा मुलगा सुषीम व दुसरा गट अशोक व तिष्य या दोन्ही भावांचा.
◼️सुषीम याने अशोकाच्या गैरहजेरीत सिंहासनाचा ताबा घेतला.
◼️बिंदुसारच्या मृत्यूच्या वेळी अशोक उज्जयिनीचा राजप्रतीनिधी होता.
◼️सुषीमचे बंड मोडून काढण्यासाठी अशोकाने ससैन्य पाटलीपुत्र वर चालून गेला.
◼️युध्दात अशोकाने ,सुषीमला पराभूत करून ठार केले.
◼️राजकीय सत्तासंघर्षात चार वर्ष गेली.
◼️बिंदुसारच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी इ. स.पूर्व २६९ मध्ये अशोकाने स्वतः चा राज्याभिषेक करून घेतला.
◼️' देवानाम् प्रिय ,प्रियदर्शी राजा 'ही पदवी धारण केली.
🛑कलिंग युद्ध ( इ. स.पूर्व २६१ )🛑
◼️गादीवर आल्यानंतर अशोकाने केलेली एकच स्वारी. यानंतरच्या आयुष्यात अशोकाने युद्ध केले नाही.
◼️या युद्धानंतर अशोक हृदयपरिवर्तनाच्या अवस्थेत असताना बौद्ध भिक्षू उपगुप्त भेटला व अशोकला बौद्ध धर्माची दीक्षा दिली.
________________________________________
🛑 धार्मिक जीवन🛑
◼️बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने देशातील विविध भागात ८४०० स्तूप बांधले.
◼️याशिवाय बौद्ध भिक्षूंसाठी संघाराम,विहार, चैत्यगृह बांधले.
◼️सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्या नंतर ,बौद्ध धर्मप्रसार हेच जीवितकार्य बनले.
◼️बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने समृध्द राजकोष,कुशल राज्ययंत्रना यांचा पुरेपूर वापर केला.
______________________________________
🛑राज्यव्यवस्था🛑
◼️अशोक जरी अहिंसेचा पुरस्कर्ता होता तरी गंभीर गुन्ह्याला फाशीची शिक्षा पद्धती बंद केली नाही.
◼️राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे सहा विभाग केले.
ते सहा भाग व त्यांच्या राजधान्या खालीलप्रमाणे
◼️१) वायव्य - तक्षशिला
◼️२) मध्यविभाग - उज्जयिनी
◼️३) पश्र्विम विभाग - गिरिनगर
◼️४) दक्षिण विभाग - सुवर्णगिरी
◼️५) मगध विभाग - पाटलीपुत्र
◼️६) पूर्व विभाग - तोसली
◼️मौर्य राज्ययंत्रनेवर अशोकाचे कडक नियंत्रण होते.
______________________________________
🛑सांचीचा जगप्रसिद्ध स्तूप🛑
◼️मौर्यकालीन बांधकामाचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे सांचीचा जगप्रसिद्ध स्तूप.
◼️हा स्तूप अशोकाने बांधला.
◼️पुढील काळात त्यात अजुन भर पडली.
◼️या स्तूपाचा व्यास १२१ फूट व उंची ७७.५ फूट आहे.
शुंग काळात स्तूपाला तोरणद्वार जोडण्यात आले.
🛑सारनाथ स्तंभ🛑
◼️गौतम बुद्ध यांनी पाहिले प्रवचन ( धम्मचक्र प्रवर्तन )जिथं दिले त्याच जागी सारनाथ येथे अशोकाने उभारलेला स्तंभ सर्वोत्कृष्ट.
◼️खांबावर एक वर्तुळाकार चिरेबंदी ,तिच्या चार बाजूस हत्ती, बैल,घोडा व सिंह कोरलेले आहेत.
◼️हेच अशोकचिन्ह भारतीय गणराज्याने राजमुद्रा म्हणून स्वीकारले आहे.
_________________________________________
🛑योग्यता🛑
◼️कलिंग युद्धानंतर अशोकाने दिग्विजय ऐवजी धर्मविजय हे ध्येय ठरविले.
◼️अशोकाचे संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी गेले.
◼️अशोकाच्या व्यक्तिमत्त्वात धर्मसहिष्णुता होती.
ठिकठिकाणी दवाखाने सुरू केले.
◼️भूतदया म्हणून शिकार करणे सोडून दिले.
◼️मेजवाण्यांसाठी पशुहत्या राजवाड्यात संपूर्णपणे बंद केली.
◼️दानधर्म खूप केला.
◼️अशोकाने नवनवीन रस्ते बांधले.
◼️प्रत्येक मैलावर विहिरी खोदल्या.
◼️रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली.
◼️प्रवाशांच्या सोयीसाठी ठराविक अंतरावर धर्मशाळा व पाणपोया बांधण्यात आल्या.
◼️अशोकाच्या हयातीत भेरीघोष बंद होऊन धर्मघोष सुरू झाला.
◼️कलिंग युद्धानंतर पुढील २५ वर्षात एकही लढाई न झाल्यामुळे मौर्यांचे लष्कर निष्क्रिय बनले.
◼️साम्राज्यविस्तार ऐवजी धर्मप्रसार हेच ध्येय ठरल्यामुळे त्याचा अपरिहार्य परिणाम लष्करी शक्तीच्या -हासात झाला.
◼️सम्राट अशोक यांचा मृत्यू इ. स. पू.२३६ मध्ये झाला.
◼️सम्राट अशोक यांच्या मृत्यूनंतर अवघ्या पन्नास वर्षाच्या अल्पावधीत प्रचंड मौर्य साम्राज्य नष्ट झाले.
==================================
🔵वंदे मातरम्..!
🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक: १२ एप्रिल २०२०, रविवार
क्रमशः


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा