🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २६ 🛑
🧿 मालखेडचे राष्ट्रकुट घराणे 🧿
===================================
🔵 जगविख्यात वेरूळच्या कैलास लेण्यांची निर्मिती करणारे राष्ट्रकुट घराणे .
🔵डॉ.आळतेकर यांच्या मते, कर्नाटकातून येऊन लातूर या गावी वसले असावेत.
१) ♦️ दन्तिदुर्ग♦️ ( इ.स.७५४ ते ७५६)
🔘 राष्ट्रकुटांचा इतिहास हा दन्तिदुर्ग या राजापासून ज्ञात होतो.
🔘 दन्तिदुर्ग यांनी चालुक्य राजा किर्तीवर्मन दुसरा याचा निर्णायक पराभव करून चालुक्यांची सत्ता संपुष्टात आणली.
🔘 दन्तिदुर्ग याने कांची, केरळ,चोल,पांड्य,कोसल,
मालव, श्रीशैल ,येथील राजांचा पराभव केला.
२) ♦️ कृष्ण पहिला♦️ (इ. स.७५६ ते ७७२)
🔘 दन्तिदुर्ग हा निपुत्रिक वारल्याने ,त्याच्या पश्चात त्याचा चुलता कृष्ण पहिला हा राष्ट्रकुट गादीवर आला.
🔘 कृष्णराजाची अजरामर कामगिरी म्हणजे जगविख्यात वेरूळच्या कैलास लेण्यांची निर्मिती होय.
३) ♦️ गोविंद दुसरा♦️ ( इ. स.७७२ ते ७८०)
🔘 कृष्ण पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा गोविंद दुसरा हा गादीवर आला.
🔘 गोविंद दुसरा हा चैनी व विलासी असल्याने राज्यात अराजक माजले.
🔘 गोविंद दुसरा याचा धाकटा भाऊ, निरुपम ध्रुव याने गोविंद दुसरा याला पदच्युत केले व इ. स.७८० मध्ये राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली.
४) ♦️ ध्रुव♦️ ( इ. स.७८० ते ७९४)
🔘 ध्रुव राज्यकारभारासाठी लायक होता.
🔘 याने दक्षिण दिग्विजय केला.
🔘 इ. स.७९४ मध्ये आपला मुलगा गोविंद तिसरा,ह्याची वारस म्हणून नियुक्ती करून राजत्याग केला.
४) ♦️ गोविंद तिसरा♦️ ( इ. स.७९४ ते ८१४)
🔘 राष्ट्रकुट घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा गोविंद तिसरा होय.
🔘 गोविंद तिसरा हा ध्रुव चा धाकटा मुलगा होता.
🔘 इ. स.७९९ मध्ये गोविंद तिसरा याने कांचीचा पल्लव राजा दन्तिवर्मन याला पराभूत करून कांचीत प्रवेश केला.
🔘 गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकुट सत्ता परमोच्च शिखरावर पोहोचली होती.
🔘 गोविंद तिसरा याने मयुरखंडी येथील आपली राजधानी हलवून मालखेड येथे नेली.
५) ♦️ अमोघवर्ष पहिला ♦️ ( इ. स.८१४ ते ८७८)
🔘 अमोघवर्ष पहिला हा गोविंद तिसरा यांचा मुलगा होता.
🔘 अमोघवर्ष पहिला याने आपला दरारा निर्माण केला.
🔘 अमोघवर्ष पहिला हा हिंदू धर्माचा अनुयायी होता.
🔘 अमोघवर्ष पहिला याने कानडी भाषेत ' कविराजमार्ग ' हा काव्यावरील टीकाग्रंथ लिहिला. तसेच ' प्रश्नोत्तर रत्नमालीका ' हा नीतिग्रंथ लिहिला.
🔘 इ. स.८७८ मध्ये अमोघवर्ष पहिला हा मृत्यू पावला.
अमोघवर्ष पहिला यांच्या मृत्यू नंतर......
६) ♦️कृष्ण दुसरा♦️ ( इ. स.८७८ ते ९१३)
७)♦️ इंद्र तिसरा♦️ ( इ. स.९१५ ते ९१६)
८)♦️अमोघवर्ष दुसरा♦️
९)♦️ गोविंद चौथा♦️ ( इ. स. ९१८ ते ९३४)
१०)♦️अमोघवर्ष तिसरा♦️ ( इ. स.९३४ ते ९३९)
११)♦️कृष्ण तिसरा♦️ ( इ. स.९३९ ते ९६८)
या राष्ट्रकुट घराण्यातील राजांनी इ. स.९६८ पर्यंत राज्य केले.
🔴 कृष्ण तिसरा यांच्या मृत्यू नंतर सत्तेला उतरती कळा लागली.
🛑 राष्ट्रकुट राजा कर्क दुसरा गादीवर असताना चालुक्य राजा तैलप याने आक्रमण करून राजा कर्क दुसरा याचा निर्णायक पराभव केला आणि इ.स.९७३ मध्ये राष्ट्रकुट घराण्याची सत्ता संपुष्टात आली.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: ९ मे २०२०, शनिवार
🔴 प्राचीन भारत-
क्रमशः



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा