शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र.४ 🔴आर्षकालीन संस्कृती🔴



🛑प्राचीन भारत, भाग क्रमांक- ४🛑

🔴आर्षकालीन संस्कृती🔴
( आर्ष म्हणजे ऋषी )
=================================

🛑रामायण🛑

🔶महर्षी वाल्मिकी ,रामायणाचे कर्ता.
🔶रामायणात एकूण २४,००० ( चोवीस हजार )श्लोक आहेत.
🔶बालकांड, अयोध्याकांड,अरण्यकांड,किष्किंधाकांड, सुंदरकांड,युध्दकांड व उत्तरकांड अशी एकूण रामायणाची ७ कांडे आहेत.
🔶रामायण काळात वर्णव्यवस्था होती.

🔵महाभारत🔵

🔶भारतीय युद्धानंतर महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथ लिहिला.
🔶वैशंपायन व सर्पसत्र करणारा जनमेजय यांच्यातील प्रश्नोत्तरांची भर पडून त्या जय ग्रंथाचे ' भारत ' झाले.
🔶कालांतराने सौती व शौनक ऋषी यांच्यातील वादविवादांची भर पडून भारत चे महाभारत झाले.
🔶महाभारताचे एकट्याचे श्रेय व्यासांना देण्याचे कारण इतकेच की,वैशंपायन व सौती यांनी त्यात घातलेली भर व्यासांच्या प्रेरणेने व त्यांच्याच मतास धरून घालण्यात आली.

🔶महाभारतात एकूण श्लोक एक लक्ष आहेत.
🔶त्यापैकी ८,८०० श्लोक व्यासांचे  आहेत.
🔶२४,००० वैशंपायन यांचे आहेत व
उर्वरित सर्व श्लोक सौती ऋषींचे आहेत.
🔶एकूण पर्व - १८
🔶एकूण अध्याय - २,१०९
🔶हरिवंश भाग मागाहून जोडण्यात आला असून तो १९ वा पर्व मानल्या जातो.
🔶महाभारत इ. स.पूर्व १२०० ते १००० दरम्यान घडले.

==================================

वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "

🔵लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵दिनांक: ६ एप्रिल २०२०, सोमवार.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा