🔵प्राचीन भारत भाग क्रमांक - ५🔵
🛑जैन धर्म / बौद्ध धर्म🛑
==================================
🛑जैन धर्म🛑
◼️जैन धर्मानुसार वर्धमान महावीर जैन धर्माचे संस्थापक नसून ते २४ वे तीर्थंकर होते.
◼️जन्म - बिहार मधील वैशाली नगरात कुंडग्राम उपनगरात इ.स.पूर्व ५३९ मध्ये झाला.
◼️वडील नाव - सिध्दार्थ
◼️आईचे नाव - त्रिशला
◼️वर्धमान चे मामा - राजा चेटक ( वैशाली गणराज्य )
वर्धमान ची सख्खी मावशी - चेल्लना ( मगध सम्राट बिंबिसार ची पत्नी )
◼️वर्धमान पत्नी नाव - यशोदा
◼️वर्धमान यांनी वयाच्या ३० व्या वर्षी सन्यासी झाले.१२ वर्ष तप.वयाच्या ४२ व्या वर्षी केवलज्ञान प्राप्त.
◼️इंद्रिये जिंकणारा म्हणजे जीन, जीन वरून जैन शब्द निर्माण झाला.
◼️वर्धमान महावीर मृत्यू - इ. स.पूर्व ४६७, राजगृह जवळील पावा खेड्यात.
◼️मृत्यू समयी जैन धर्माचे १४००० हजार अनुयायी.
◼️जैन समाजाचे साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका असे चार घटक.
◼️साधू, साध्वी यांनी सर्वसंगपरित्याग केलेला.
श्रावक आणि श्राविका गृहस्थाश्रमी.
🛑जैन धर्मातील पंथ🛑
♦️१) श्र्वेतांबर पंथ - या पंथाचे प्रमुख : शंभुतविजय
पांढरे वस्त्र परिधान.
श्र्वेतांबर पंथीयांनी आपले धर्मग्रंथ अर्धमागधीत लिहिले.
♦️२) दिगंबर पंथ - जैन मुनी भद्रबाहूच्या नेतृत्वाखाली दिगंबर पंथीयांनी वर्धमान महावीर यांना आपले गुरू मानले.
महावीराच्या आदेशाप्रमाणे विवस्त्र राहत असत.
दिंगबर पंथी यांनी आपले धर्मग्रंथ प्राकृत ( शौरसेनी )व संस्कृत मध्ये लिहिले.
◼️वर्धमान महावीर यांनी उपदेश अर्धमागधी लोकभाषेत केला.
◼️वेरूळ आणि ओरिसातील हस्तीगुंफा येथील जैन लेण्या सुरेख.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🛑बौद्ध धर्म🛑
🔴गौतम बुद्ध चरित्र🔴
🔶जन्म - ठिकाण : उत्तर बिहार कपिलवस्तु नगर जवळ लुंबिणी येथे, इ. स.पूर्व ५६७ मध्ये.
🔶वडील नाव - शुद्घोधन
🔶आई - मायावती
🔶जन्मनाव - सिद्धार्थ
🔶सिद्धार्थच्या आईचे निधन,सिद्धार्थच्या जन्मानंतर सातव्या दिवशी झाले.
🔶सिद्धार्थची मावशी महाप्रजापती गौतमी हिने सिद्धार्थ चे पालनपोषण केले,त्यामुळं सिद्धार्थ ,गौतम या नावाने ओळखला जाऊ लागले.
🔶सिद्धार्थ गौतम पत्नी नाव - यशोधरा
🔶सिद्धार्थ गौतम मुलाचे नाव - राहुल,
वैशाख पौर्णिमा दिवशी सर्वज्ञता प्राप्त तेंव्हा पासून गौतम बुद्ध नाव झाले.
🔴बौद्ध धर्मातील पंथ. 🔴
⬛१) महायान पंथ
🔶हा पंथ उदार,सुधारक.
🔶बोधिसत्व ही महायान पंथाची मध्यवर्ती कल्पना.
🔶 गौतम बुध्दाच्या मूर्तीची पूजा करण्यास सुरुवात.
🔶स्तूप, बोधीवृक्ष, छत्र, व पादुका ह्या बुद्ध प्रतीकांची पूजा मौर्य काळात रूढ झाली.
🔶बुद्धगया, सारनाथ,कुसीनारा बौद्धांची तीर्थक्षेत्र बनलीत.
महायान पंथाची ग्रंथ रचना संस्कृत व पाली भाषेत केली.
⬛२) हीनयान
🔶सर्वसंग परित्याग करून निर्वाणासाठी झटणारा पंथ.
🔶हीनयान पंथाचा भर आत्मक्लेश यावर आहे.
🔶हीनयान पंथाने आपली ग्रंथ रचना पाली भाषेत केली.
==================================
वंदे मातरम्..!
🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵संकलन व ठळक मुद्दे: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक: ७ एप्रिल २०२०, मंगळवार
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा