🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक १९ 🛑
🔵आग्नेय आशियाशी संबंध - भाग :४🔵
==================================
🧿 मलाया द्वीपकल्प 🧿
( आजचा मलेशिया )
🔘 इसवी सनाच्या सुरुवातीसच मलाया द्वीपकल्प येथे भारतीयांच्या वसाहती स्थापन होण्यास सुरुवात झाली.
🔘 मलाया मध्ये इसवी सनाच्या चौथ्या व पाचव्या शतकातील संस्कृत शिलालेख, केदाह जवळ पाचव्या शतकातील बौद्ध स्तूप, अनेक मंदिरे व मूर्ती मिळाल्या आहेत.
🔘 इसवी सनाच्या चौथ्या व पाचव्या शतकात मलाया मध्ये हिंदू राज्ये अस्तित्वात होती.
🔘 सापडलेल्या अनेक संस्कृत शिलालेख वरून मलाया मध्ये कलशपूर, कमलांक,याहँग , कला , लँग -किआ-सु
ही हिंदू राज्ये अस्तित्वात होती.
🔘 येथील राजांची नावे गौतम, विजयवर्मन , सुभद्र अशी आढळतात.
🔘 मलायातील उत्खननावरुन शैव व वैष्णव पंथाचा आणि बौद्ध धर्माचा प्रभाव होता हे स्पष्ट दिसून येते.
🔘 मलाया येथील श्रीधम्मरतचा स्तूप प्रसिद्ध असून स्तूपाच्या भोवती पन्नास मंदिरे आहेत.
🔘 इ. स.१०२५ मध्ये सम्राट राजेंद्र चोला याने केदाहवर आक्रमण करून मलाया द्वीपकल्प जिंकून घेतले.
_________________________________________
🧿 सयाम 🧿
( आजचा थायलंड )
🔘 इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सयाम मध्ये भारतीय वसाहती स्थापन होण्यास सुरुवात झाली.
🔘 येथे सातव्या शतकात द्वारावती आणि इतर छोटी छोटी हिंदू राज्ये भरभराटीस आलेली होती.
🔘 कंबुजच्या पतनानंतर तेराव्या शतकात उत्तरेकडून आलेल्या थाई लोकांनी दक्षिण सयाम स्वतंत्र करून आपल्या ताब्यात घेतला.
🔘 मूळच्या चीनच्या दक्षिण आणि नैॠत्य भागात राहणारे थाई , मंगोलियन वंशाचे .
🔘 युनान (आजच्या चीन मधील दक्षिणेकडील भूभाग)
मधील थाई लोकांच्या राज्याला गांधार म्हणत.
🔘 गांधार राज्यातील एका भागाचे नाव विदेह असून त्याची राजधानी मिथिला होती.
🔘 युनान बौद्ध धर्मीय राज्य होते.युनानचे राज्य इ. स.१२५३ पर्यंत भरभराटीचे होते.
🔘 इ. स.१२५३ मध्ये कुब्लाईखानाने युनानवर आक्रमण करून युनान पादाक्रांत केले.
🔘 थाई लोकांच्या अहोम शाखेने आसाम काबीज केला;दुसऱ्या ' शान ' शाखेने उत्तर ब्रह्मदेश ( आजचा उत्तर म्यानमार )काबीज केला.
🔘 थाई लोकांच्या तिसऱ्या शाखेने लाओस व संपूर्ण सयाम ( आजचा थायलंड ) ताब्यात घेतला.
🔘 सयाम मध्ये बौद्ध ,विष्णु व शिवाच्या मूर्ती सापडतात.
🔘 सयामी भाषेतील बहुसंख्य शब्द संस्कृत, पाली भाषेतील आहेत.
🔘 आजही सयामी ( थायलंड ) चा धर्म, भाषा, लिपी,रीतिरिवाज,यावर भारतीय छाप स्पष्टपणे दिसून येते.
🔘 सयाम (थायलंड ) मध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश इ. स.४२२ मध्ये झाला आणि आज तो सयामचा राष्ट्रधर्म आहे.
🔘सयामी राजे बौद्ध धर्मीय असले तरी ते मंदिरे बांधून त्यातून हिंदू देवदेवतांची प्रतिष्ठापना करीत.
🔘 सयामच्या ( थायलंड ) राष्ट्रीय ग्रंथालयात ५,०००( पाच हजार ) हुन जास्त जूने दुर्मिळ संस्कृत ग्रंथ आहेत.
==================================
वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: २७ एप्रिल २०२०, सोमवार.
🔴 आग्नेय आशियाशी संबंध-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा