शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र. १० ⚫ शक, पल्हव,व कुशान ⚫



🔵 प्राचीन भारत, भाग क्रमांक : १०🔵

⚫ शक, पल्हव,व कुशान ⚫
==================================

🛑 शक 🛑

🔶इ. स.पूर्व चौथ्या शतकात मध्य आशियात शक लोक राहत असत.
🔶शकांच्या आक्रमण बाबत माहिती जैन ग्रंथ
' कालकाचार्यकथानक ' यामध्ये मिळते.

♦️माॅस उर्फ मोग ( इ. स.पूर्व ८६ ते ५१ )♦️

◼️हा भारतातील पहिला शक राजा.
◼️यांनी ग्रीकांचा पराभव करून तक्षशिला च्या आसपास आपली सत्ता स्थापन केली.

♦️अय पहिला ♦️

◼️माॅस उर्फ मोग याच्यानंतर अय पहिला या राजाने पंजाब मधील ग्रीक सत्ता समाप्त केली.

♦️अयलेश ♦️

◼️या शक राजाने नंतर राज्य केले.

♦️अय दुसरा♦️

◼️या शक राजाने नंतर राज्य केले.

◼️यानंतर पल्हव यांनी शकांची सत्ता संपुष्टात आणली व आपली पल्हव सत्ता स्थापन केली.
________________________________________

🛑पार्थियन उर्फ पल्हव🛑

◼️वनान हा पल्हव सत्तेचा संस्थापक होय.

♦️मिथ्राडेटस उर्फ मित्रदत्त ♦️
( इ. स.पूर्व १७१ ते इ. स. पू.१३६)

  ◼️याने कंदहार मार्गे सिंध पर्यंत आक्रमण करून तेथील प्रदेश पादाक्रांत केला.

♦️गोंडोफर्निस उर्फ विन्दपर्ण ( इ.स.१९ ते ४५ )♦️

◼️हा पल्हव यांच्यातील सर्वात महत्त्वाचा सम्राट.
◼️याने पूर्व इराण व वायव्य भारतात सत्ता स्थापन केली.
याची राजधानी तक्षशिला होती.
◼️याच्या मृत्यू नंतर पल्हव साम्राज्याची शकले उडाली.
यानंतर कुशाण टोळ्या भारतात शिरल्या. कुशानांनी पल्हव सत्ता संपुष्टात आणली.
_________________________________________

🛑कुशाण🛑

◼️कुशाण लोकांचा मूळ प्रदेश चीन चा वायव्य भाग होय.

♦️कुजूल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला♦️
( इ.स.१५ ते इ.स.६५ )

◼️याने भारताच्या वायव्य भागात सत्ता स्थापन केली.

♦️विम कॅडफिसस उर्फ कॅडफिसस दुसरा♦️
(इ.स.६५ ते ७५ )

◼️विम कॅडफिसस उर्फ कॅडफिसस दुसरा हा कुजूल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला याचा मुलगा.
◼️याने भारतात वाराणशी पर्यंत कुशाण सत्ता स्थापन केली.
◼️याच्या नाण्यांवर एका बाजूला  ' महेश्वर ' अशी अक्षरे व दुसऱ्या बाजूला शिवमुद्रा आणि शिवलिंग .
◼️हा शिवभक्त होता.
◼️विमचे प्रचंड साम्राज्य पश्चिम दिशेला रोमन व पूर्वेला चीन साम्राज्याला भिडलेले होते.
◼️याच्याच काळात परकीय कुशानांचे भारतीयकरण होण्याच्या प्रक्रियेला वेग प्राप्त झाला.

♦️सम्राट कनिष्क ( इ. स.७८ ते इ. स.१०१)◼️

◼️विम कॅडफिसस उर्फ कॅडफिसस दुसरा याच्या मृत्यू नंतर राजसत्ता साठी संघर्ष.
◼️या सत्तासंघर्षात मथुरेचा सरदार कनिष्क विजयी झाला.
कल्हणाच्या ' राजतरंगिणी ' वरून कनिष्क च्या काश्मीर विजयाची माहिती मिळते.
◼️याने कश्मिर मध्ये कनिष्कपूर नवीन शहर वसविले.

🔵कनिष्क याचा साम्राज्यविस्तार🔵

◼️अफगाणिस्तान,बॅक्ट्रिया इथपर्यंत होता.
◼️पेशावर,रावळपिंडी,मथुरा,सारनाथ,बनारस,याठिकाणी यांच्या कारकीर्द विषयी शिलालेख सापडले आहेत.
◼️कनिष्क याच्या विशाल साम्राज्याची राजधानी पुरुषपूर उर्फ पेशावर होती.
◼️इ. स.१०१ मध्ये कनिष्क आजारी असताना त्याच्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला ठार केले.

♦️वशिष्क♦️

◼️कनिष्क याच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा वशिष्क राजा झाला असे मथुरा व सांची येथील सापडलेल्या ताम्रपट वरून दिसते.

♦️हुविष्क♦️

◼️इ.स.१०८ मध्ये कनिष्कचा दुसरा मुलगा हुविष्क कुशानांचा सम्राट झाला.
◼️याने कश्मिर मध्ये ' हुविष्कपूर ' वसविले.

♦️वसुदेव ♦️

◼️हा कुशानांचा शेवटचा प्रसिद्ध राजा.
◼️हा इ. स.१५२ मध्ये सत्तेवर आला.
◼️याची राजधानी मथुरा होती.
◼️याच्या नाण्यांवर नंदी सह शिवमुद्रा आढळते.
◼️याच्याच कारकिर्दीत कुशानांच्या सत्तेला उतरती कळा लागली.
◼️अशा रीतीने इ. स.दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात कुशाण
सत्ता समाप्त झाली.

==================================

🔵वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵दिनांक:  १४ एप्रिल २०२०, मंगळवार

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा