🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २२🛑
⭕ चालुक्य घराणे ⭕
==================================
🧿 बदामीचे चालुक्य घराणे 🧿
१) ♦️ पुलकेशी पहिला ♦️ ( इ.स.५३५ ते ५६६)
🔘विजापूर जिल्ह्यातील बदामी ( प्राचीन वातापी )येथे पुलकेशी पहिला याने राजधानी वसविली.
🔘 याने अश्वमेध यज्ञ केला.
२) ♦️ कीर्तीवर्मन ♦️ ( इ.स.५६७ ते ५९७)
🔘 पुलकेशी पुत्र कीर्तीवर्मन राजा झाला.
🔘 कीर्तीवर्मन याने कोकण विजय केला.
३) ♦️ मंगलेश♦️
🔘 कीर्तीवर्मन यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा दुसरा पुलकेशी अल्पवयीन असल्याने कीर्तीवर्मन यांचा भाऊ चालुक्य घराण्याचा राजा झाला.
🔘 यांच्या काळात बदामी येथे विष्णूचे प्रसिद्ध मंदिर,दगडात कोरण्यात आले.
🔘 अखेर कीर्तीवर्मन याचा मुलगा दुसरा पुलकेशी वयात आल्यानंतर गादीसाठी चुलत्या- पुरण्यात ( दुसरा पुलकेशी व मंगलेश ) तुंबळ यादवी. त्यात मंगलेश ठार झाला. इसवी सन ६०९ मध्ये दुसरा पुलकेशी सत्तारूढ झाला.
४) ♦️ दुसरा पुलकेशी ♦️ ( इ. स.६०९ ते ६४२)
🔘 प्रदीर्घ काळ राज्य करणारा दुसरा पुलकेशी हा चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय.
🔘 दुसरा पुलकेशी हा सम्राट हर्षवर्धन यांचा समकालीन होता.
🔘 हा स्वतःला सत्याश्रय, परमेश्वर, पृथ्वीवल्लभ ,परममाहेश्वर ही बिरूद लावत असे.
🔘 याचे साम्राज्य दक्षिण गुजराथ ते थेट वेंगी आणि अरबी समुद्र पासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत होते.
🔘 इसवी सन ६४२ मध्ये पल्लव राजपुत्र नरसिंहवर्मन यावे दुसरा पुलकेशी याला युध्दात ठार केले.
५) ♦️ विक्रमादित्य पहिला♦️ ( इ. स.६५५ ते ६८०)
🔘 दुसरा पुलकेशी यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा विक्रमादित्य पहिला हा चालुक्य घराण्याचा राजा झाला.
६) ♦️विनयादित्य♦️
🔘विक्रमादित्य पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा विनयदत्त व नातू विजयादत्त यांना सतत पल्लवांशी संघर्ष करावा लागला.
७) ♦️ विक्रमादित्य दुसरा ♦️ ( इ. स.७३३ ते ७४७)
🔘 विजयादत्त यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा विक्रमादित्य दुसरा हा चालुक्य घराण्याचा राजा झाला.
🔘 याने पल्लवांची राजधानी कांची लुटली. कांचीच्या कैलासनाथ मंदिरातील एका स्तंभावर विक्रमादित्य दुसरा याने तीनदा कांची जिंकल्याचा कानडी भाषेत लेख कोरविला.
🔘 विक्रमादित्य दुसरा याने पांड्य व चोळ राजांना पराभूत करून भारताच्या दक्षिण तटावर विजयध्वज उभारला.
८) ♦️ कीर्तीवर्मन दुसरा ♦️ ( इ. स.७४७ ते ७५३)
🔘 चालुक्याचा मांडलिक असलेला वेरूळचा राजा
' दन्तिदुर्ग ' याने इ. स ७५३ च्या सुमारास कीर्तीवर्मन दुसरा याचा संपूर्ण पराभव करून बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. ह्या नंतर दक्षिणेत राष्ट्रकूट सत्ता प्रबळ झाली.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: १ मे २०२०, शुक्रवार.
🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा