आमचे गाव आमची माणसं..!
" रोखठोक स्वभावाचे ,बंधुतुल्य व्यक्तिमत्व..! "
'अंबादास भाऊ घोडके '
==================================
आदरणीय ,ज्येष्ठ बंधुतुल्य अंबादास भाऊ घोडके ,आपणास काल दिनांक १ मे २०१८ रोजी साजऱ्या झालेल्या जन्मदिनाच्या आज दिनांक २ मे २०१८ रोजी मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹
तुमचा वाढदिवस काल दिनांक,१ मे २०१८ रोजी मोठ्या आनंदात साजरा झाला..!तुमचे अभिष्टचिंतन माझा खूप जिवलग बालमित्र डॉ गणेश वाणी याने केले खूप..खूप आनंद झाला..!
आपण आमच्या कुटुंबातील प्रत्येक सुख,दुःखात सहभागी सहभागी होऊन आम्हाला वेळोवेळी जो मानसिक आधार दिलेला आहे, तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे..!
तुम्ही, मोठ्या कष्टाने,जिद्दीने पालखेड सारख्या मोठ्या गावात स्वतःचे सामाजिक,आर्थिक,व्यावसायिक अस्तित्व निर्माण केले आहे..!त्या कष्टाला ,जिद्दीला व व्यावसायिक निष्ठेला माझे त्रिवार वंदन..!
तुम्ही माझ्या थोरल्या बंधूचे, सूनीलराव भाऊ जाधव यांचे जिवलग बालमित्र..!त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळा तुमच्या व आमच्या कुटुंबात आपोआप निर्माण झाला..!
जे मुलं स्वतच्या आयुष्याचे सार्थक झाल्यानंतर बऱ्याचदा जन्मदात्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात,त्यांच्यासाठी तुम्ही एक आदर्शवत शिकवण आहात..!
तुम्ही तुमच्या आई वडिलांची अगदी वृध्दापकाळापर्यंत अंतर्मनाने सेवा केली,या तुमच्या नैतिकदृष्ट्या बहुमूल्य आचरणाला माझ्या कडून...विनम्र वंदन..!🙏🙏🙏
जे मुलं आई,बापाच्या जीवावर आयतं बसून जगतात,त्यांच्यासाठी तुम्ही एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहात..!तुम्ही तुमच्या अंगी असलेल्या कला, कौशल्यशिस्तबद्धता व गुणांना वेळीच हेरून आज
" ओमराज फॅब्रिकेशन ,पालखेड " च्या माध्यमातून एक व्यावसायिक प्रतिष्ठा निर्माण केली आहे..! त्याचा आमच्या संपूर्ण कुटुंबाला सार्थ अभिमान वाटतो..!
अंबादास घोडके भाऊ, तुम्ही मुळात स्पष्टवक्ते स्वभावाचे..!अशी माणसं..मनाने अतिशय निर्मळ असतात..!अर्थात हा मनाचा निर्मळपणा ओघओघाने तुमच्या अंगी आलाच आहे..! आज तुम्ही पालखेड सारख्या मोठ्या गावातील ग्रामपंचायत चे सन्माननीय सदस्य आहात; ही तुमच्या सामाजिक जिव्हाळ्याची ,समाजाने दिलेली प्रेमाची पावती आहे..!
आधुनिक पद्धतीने व नियोजनबध्द शेती कशी करावी यासाठी तुम्ही इतर अन्नदात्यांकरिता मार्गदर्शक बळीराजा आहात..!
आपल्या पालखेड गावात,जातीपातीचा विचार न करता स्वर्गवासी झालेल्या प्रत्येकाच्या अंत्य संस्कार पूर्वी करावयाच्या प्रत्येक तयारी करिता तुम्ही झोकून देऊन फार फार मोठे सामाजिक कार्य करत आहात त्याला माझ्याकडून सलाम..!🙏
आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!
पुन्हा एकदा आमच्या कौटुंबिक जीवनात आदराचे स्थान असलेले अंबादास घोडके भाऊ आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!🌹
शूभेच्छूक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले व परिवार.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
वाढदिवस दिनांक: १ मे २०१८
शुभेच्छा दिनांक : २ मे २०१८
वंदे मातरम्..!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा